मुंबई, 5 एप्रिल- अभिनेत्री ऋतुजा बागवे **(Rutuja Bagwe )**सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ तसेच तिच्या आगामी प्रोजेक्टसंबंधीत माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. ऋतुजा बागवे **(Rutuja Bagwe Latest Photos )**नेहमीच तिच्या हटके फोटोशूटनं सर्वांचे लक्षवेधून घेत असते.नुकतेच ऋतुजा बागवेने तिचे काही परकर पोलक्यातील फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे. मात्र या सगळ्यात अभिनेत्री हेमांगी कवीची कमेंट मात्र सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. ऋतुजा बागवेने केशरी रंगाच्या परकर पोलक्यातील तिचे काही फोटो शेअर करत म्हटले आहे की, flaunting my परकर पोलकं ..तिच्या या लुकचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे. चाहत्यांकडून या लुकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे. वाचा- ‘लोकांना वाटेल मी खोटं बोलतोय, पण…’ विशाल निकमचं सौंदर्यासोबत ब्रेकअप ऋतुजाच्या या लुकवर मात्र चाहत्यांच्या कमेंट लक्षवेधी ठरत आहेत. अक्षया नाईकनं म्हटलं आहे की, कमाल तर साक्षी महेशनं म्हटलं आहे की, आय्या…….या सगळ्या मात्र नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असलेली अभिनेत्री हेमांगी कवीची कमेंट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. हेमांगी कवीनं म्हटलं आहे की, मला दोन बेबी अॅप्स दिसल्या ..असं तिनं म्हटलं आहे. ऋतुजा बागवेच्या फिटनेसबद्दल सांगायचं झालं तर ती नेहमीच फिटेनेसकडं लक्ष देताना दिसते. तिचे काही फिटनेस व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करत असते.
सहजसुंदर अभिनय व लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे सा-यांचे लक्ष वेधून घेत असते. विशेष म्हणजे ‘नांदा सौख्य भरे’ मालिकेतून तिने छोट्या पडद्यावर एंट्री केली आणि तिने रसिकांचे मनोरंजन केले. याशिवाय ऋतुजा बागवेचा ‘अनन्या’ या नाटकातील अतुलनीय अभिनयासाठी तिचा बारा मानाच्या पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.याच 12 पुरस्काराची दखल ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसने’ही घेतली होती. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये मोस्ट अॅवॉर्डस फॉर अ परफॉर्मन्स इन द इयर या अंतर्गत ऋतुजाच्या नावाची घोषणा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली होती. .

)







