Home /News /aurangabad /

औरंगाबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार; अश्लील VIDEO शूट करत पीडितेच्या आई-वडिलांना पाठवले अन्...

औरंगाबादमध्ये डॉक्टर तरुणीवर बलात्कार; अश्लील VIDEO शूट करत पीडितेच्या आई-वडिलांना पाठवले अन्...

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Crime in Aurangabad: औरंगाबाद येथील एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केल्याच्या (doctor young woman rape) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    औरंगाबाद, 24 सप्टेंबर: औरंगाबाद येथील एका खाजगी दवाखान्यात प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टर तरुणीवर अनेकवेळा अत्याचार केल्याच्या (doctor young woman rape) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मुंबईत नोकरी देण्याचं आणि लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) अनेकदा पीडितेवर अत्याचार केला आहे. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही, तर आरोपीनं पीडित मुलीचे अश्लील व्हिडीओ शूट (Shoot obscene videos) करून दहा लाखांची मागणी (Demand 10 lakh) केली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने औरंगाबाद येथील सीटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR lodged) दाखल केला आहे. अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव अजहर अश्फाक शेख असून तो मुंबईतील घाटकोपर वेस्ट येथील रहिवासी आहे. पोलिसांनी अजहरसोबत ओसामा खान आणि हमजा पठाण यांच्याविरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींनी मुख्य आरोपीला गुन्ह्यात मदत केली होती. पीडित तरुणीचे बीडीएसचे शिक्षण झालं असून, ती एका खाजगी रुग्णालयात प्रॅक्टिस करते. काही दिवसांपूर्वी एका वर्गमैत्रिणीच्या लग्नात आरोपीची पीडितेशी ओळख झाली होती. त्याच वेळी आरोपीनं पीडितेचा मोबाइल क्रमांक घेतला होता. हेही वाचा-अत्याचारातून गरोदर राहिलेल्या मुलीची घरीच प्रसूती; 13 जणांवर गुन्हा दाखल आरोपीनं आपण एका विमान कंपनीत काम करत असून लवकरच सौदी एअरलाइन्समध्ये नोकरी लागणार असल्याचं सांगितलं होतं. पहिल्याचं भेटीत आरोपीनं पीडितेला 'तू मला खूप आवडते, आपण लग्न करू' अशी गळ घातली होती. तसेच तुलाही मुंबईत नोकरीला लावतो, असं आमिषही आरोपीनं दाखवलं होतं. यातूनच दोघांत मैत्री वाढत गेली. यानंतर आरोपीनं अनेकदा पीडितेवर अत्याचार केला आहे. हेही वाचा-सातारा: घरात घुसत मुलीचं तोंड दाबून चिरला गळा; एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट दरम्यान 21 नोव्हेंबर 2020 रोजी आरोपीनं पीडित तरुणीला औरंगाबाद येथील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलवलं होतं. याठिकाणी आरोपीने जबरदस्ती करत पीडितेवर बलात्कार केला. यावेळी आरोपीनं पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ देखील काढले. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेच्या आई - वडिलांना हे अश्लील फोटो आणि  व्हिडीओ पाठवून 10 लाख रुपयांची मागणी केली. या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित तरुणीने सिटी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी बलात्कार, खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Aurangabad, Crime news, Rape

    पुढील बातम्या