Home /News /aurangabad /

सर्वज्ञानी समजणाऱ्यांना अजूनही उच्च प्रतिच्या गांजाची नशा, चित्रा वाघांचा सरकारवर आरोप

सर्वज्ञानी समजणाऱ्यांना अजूनही उच्च प्रतिच्या गांजाची नशा, चित्रा वाघांचा सरकारवर आरोप

जगातील सर्व प्रश्नावर भाष्य (BJP leader Chitra Wagh criticizes government of dakait and rape case) करणारे सर्वज्ञानी बीडकिनमधील दरोडा आणि बलात्कार प्रकरणी गप्प का, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.

    औरंगाबाद, 20 ऑक्टोबर : जगातील सर्व प्रश्नावर भाष्य (BJP leader Chitra Wagh criticizes government of dakait and rape case) करणारे सर्वज्ञानी बीडकिनमधील दरोडा आणि बलात्कार प्रकरणी गप्प का, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांचं नाव न घेता चित्रा वाघ (Chitra wagh comment on Sanjay Raut) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बीडकिनजवळच्या तोंडोली शिवारातील वस्तीवर काही सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला करत पुरुषांना जबर मारहाण केली होती. काही महिलांवरही दरोडेखोरांनी शारीरिक अत्याचार केले होते. या घटनेनंतर चित्रा वाघ यांनी पीडितांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. राज्य सरकारवर टीकास्त्र राज्य सरकारचे माजी गृहमंत्रीच गायब असताना त्यांच्याकडून कायदा आणि सुव्यस्थेची काय अपेक्षा कऱणार, असा सवाल त्यांनी केला. दरोडा आणि अत्याचाराच्या प्रसंगामुळे सर्वत्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. यावेळी चित्रा वाघ यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज्यात मोगलाई आणि निजामशाही असल्याची सर्वसामान्यांची भावना झाल्याचा आरोप त्यांनी केला. सर्व विषयांवर ज्ञान झाडणाऱ्या सर्वज्ञानी लोकांची उच्च प्रतिच्या गांजाची नशा उतरली नाही का, असा सवाल करत त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला. आम्ही बोलतो, तेव्हा विरोधकांचे थोबाड फोडण्याची भाषा करणारे नेते आता गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी केला आहे. हे वाचा- OMG! नाकाला जीभ लावणं सोडा आता जिभेने हे काम करून दाखवा; VIDEO पाहून चक्रावाल काय आहे प्रकरण? तोंडोली शिवारातील वस्तीवर मंगळवारी रात्री 8 ते 10 दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला केला होता. त्यात अनेक पुरुष जखमी झाले होते, तर अनेक महिलांवर बलात्काराची घटना घडली होती. एका मजुराने गावात फोन करत याची कल्पना दिल्यानंतर गावकऱ्यांना ही बातमी समजली होती.
    Published by:desk news
    First published:

    Tags: BJP, Chitra wagh, Sanjay raut, Shiv sena

    पुढील बातम्या