• Home
 • »
 • News
 • »
 • viral
 • »
 • OMG! नाकाला जीभ लावणं सोडा आता जिभेने हे काम करून दाखवा; VIDEO पाहून चक्रावून जाल

OMG! नाकाला जीभ लावणं सोडा आता जिभेने हे काम करून दाखवा; VIDEO पाहून चक्रावून जाल

तरुणीने जिभेने असं काही करून दाखवलं आहे की तुम्हीही थक्क व्हाल.

 • Share this:
  मुंबई, 21 ऑक्टोबर : आतापर्यंत तुम्ही नाकाला जीभ (Tongue) लावण्याचं चॅलेंज तुम्हाला माहिती आहे. काही जणांची जीभ नाकापर्यंत पोहोचते तर काही जणांची नाही. नाकाला जीभ लावण्याचं हे चॅलेंज तुम्ही पूर्ण केलेलं असेल किंवा नसेल पण आता एका तरुणीने आपल्या जिभेनं असं काही करून दाखवलं आहे, जे चॅलेंज म्हणून घेण्यास आणि इतरांना चॅलेंज म्हणून देण्यास हरकत नाही (Woman tie a knot in thread with tongue). आता तुम्ही म्हणाल या तरुणीने जिभेने नक्की केलं तरी काय? तर तिने आपल्या जिभेने एका दोरीला गाठ बांधून दाखवली आहे. सामान्यपणे दोरीला गाठ बांधण्याचं काम आपण हाताने करतो. काही जणांना तर हातानेही दोरीला गाठ बांधता येत नाही. या तरुणीने तर तोंडात दोरी धरून जिभेने गाठ बांधून दाखवली आहे. तरुणीचं हे कौशल्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. व्हिडीओत पाहू शकता तरुणी आधी आपल्या तोंडातील जीभ काढून दाखवली आहे. तिच्या जिभेचा आकारही बऱ्यापैकी लांब आहे. त्यानंतर ती एक दोरी हातात घेते आणि जिभेवर ठेवते. दोरीचं टोक दोन्ही हातात धरून  जणू काही एखादं चॉकलेट चघळत राहावं तशी ही तरुणी दोरी चघळते. थोड्या वेळाने ती तोंड उघडते आणि जीभ बाहेर काढते. तेव्हा तिच्या जिभेच्या पुढील टोकावर दोरीला थोडीशी गाठ बसल्याचं दिसतं. तरुणी हळूच दोरी जिभेवरून काढते आणि दोरी हातात दोन्ही बाजूने खेचून गाठ घट्ट करते. हे वाचा - नारी तू लय भारी! डोळ्यावर पट्टी बांधून तलवारबाजी; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल होल्ड माय बिअर ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.
  Published by:Priya Lad
  First published: