Covid रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शिवसेना आमदाराने उघड केला कंत्राटदाराचा प्रताप

Covid रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण, रुग्णालयात उपचार घेणाऱ्या शिवसेना आमदाराने उघड केला कंत्राटदाराचा प्रताप

संबधीत कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून कारवाई करण्याची मागणी कल्याणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.

  • Share this:

नांदेड, 23 एप्रिल : कोविड रुग्णालयातील (Covid Hospital) रुग्णांना निकृष्ट दर्जाचे जेवण (bad quality food) दिले जात असल्याचा प्रकार शिवसेनेच्या आमदाराने उघड केला आहे. शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर (Shiv Sena MLA Balaji Kalyankar) कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. गेल्या सात दिवसांपूर्वी बालाजी कल्याणकर यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. तेव्हा पासून ते नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना शासनातर्फे जेवणाची सोय करण्यात आली. पण संबंधित कंत्राटदार रुग्णांना वेळेवर जेवण देत नाही. सकाळी आठ वाजता नाष्टाची वेळ असतांना दहा वाजेपर्यंत रुग्णाना नाष्टा दिला जात नाही. जेवणाचे डबे न पाठवता एका कॅरीबॅगमध्ये जेवण पाठवलं जात आहे. जेवण देखील निकृष्ट दर्जाचे असते. हा सगळा प्रकार पहिल्यावर कोविड पॉझिटीव्ह रुग्ण असलेले आमदार बालाजी कल्याणकर यांनी कंत्राटदाराला कोविड रुग्णालयात बोलावून चांगलेच खडे बोल सुनावले.

संबधीत कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करून कारवाई करण्याची मागणी कल्याणकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. रुग्णांना वेळेवर जेवण मिळत नाही. अनेकवेळा उशिरा जेवण मिळतं. आपण स्वतः हा अनुभव घेतला. हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे संबधीत कंत्राटदाराला बोलावून दम दिल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले.

वाचा: राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच; दोन दिवसांत 1,34,481 रुग्णांची नोंद तर 1136 मृत्यू

स्वत: आमदार रुग्णालयात दाखल असतांना त्यांच्या बाबतीत जर असा प्रकार घडत असेल तर सामान्य रुग्णाबाबत कंत्राटदाराचा व्यवहार कसा असेल याची कल्पना न केलेली बरी. सामान्य रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक याबाबत तक्रार करत नाहीत .याचाच गैरफायदा कंत्राटदार घेत असल्याचे दिसते. दरम्यान आपल्या तक्रारीची जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांनी गांभीर्याने दखल घेतली असून कंत्राटदाराविरोधात कारवाईचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यानी दिल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले. आता त्या कंत्राटदारावर प्रशासन काय कारवाई करते हे पहावे लागेल.

First published: April 23, 2021, 9:42 AM IST

ताज्या बातम्या