मनमाड, 10 जून : कोरोनाच्या (Corona)महामारीत एकीकडे डॉक्टर (Doctors) आणि आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारने (MVA Goverment) ठरवून दिलेले नियम मोडत खासगी हॉस्पिटलकडून (Private Hospitals) रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा दर लावून लूट सुरूच आहे. मालेगावमध्ये मनमानी करणाऱ्या सिक्स सिग्मा आणि सनराईज या दोन हॉस्पिटलवर कारवाई करत महापालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईसाठी राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला होता.
मालवणी इमारत दुर्घटना: मृतांमध्ये 6 लहान मुलांचा समावेश, मृतांचा आकडा 11 वर
मालेगावातील सिक्स सिग्मा (Six Sigma Hospital) आणि सनराईज (Sunrise Hospital) या दोन हॉस्पिटलबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी काही दिवसांपूर्वी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले व त्यानी सर्व प्रथम मनपाच्या आरोग्य अधिकारी सपना ठाकरे यांचा पदभार काढून घेतला. त्यांनतर या दोन्ही हॉस्पिटलच्या संचालकांविरुद्ध पोलीस स्थानकात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील इतर 32 हॉस्पिटलला देखील नोटीसा देण्यात आल्या असून या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. सिक्स सिग्मा हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडून मनमानी पद्धतीने बिल वसूल केली जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी या हॉस्पिटलची झाडाझडती घेतली होती.
नव्या गाइडलाइन्सचं पालन करण्यासाठी सर्व प्रयत्न करणार, Twitterचं सरकारला आश्वासन
त्यावेळी दादा भुसे यांना या हॉस्पिटलचा जीवनदायी योजनेत समावेश असल्यामुळे रुग्णावर उपचार केल्याचे दाखवून शासनाकडून 2 कोटी रुपये तर घेतलेच शिवाय रुग्णाकडून देखील बिल वसूल केल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे भुसे यांनी महापालिका प्रशासन आणि पोलिसांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र तपासा करण्यास दिरंगाई केली जात असल्याचे पाहून भुसे यांनी थेट आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राज्याच्या कृषिमंत्र्यांनीच थेट इशारा दिल्यामुळे अखेर, पालिका प्रशासनाला नरमाईची भूमिका घ्यावी लागली. या हॉस्पिटलच्या दोन्ही संचालकांवर गुन्हा दाखल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.