• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने घेतलं विष, बीडमधील घटनेने महाराष्ट्र हादरला

छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने घेतलं विष, बीडमधील घटनेने महाराष्ट्र हादरला

छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने घेतलं विष (प्रातिनिधिक फोटो)

छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने घेतलं विष (प्रातिनिधिक फोटो)

Minor girl attempt suicide over eve teasing: दररोजच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्य करण्याचा प्रयत्न केला आहे.

 • Share this:
  बीड, 23 ऑक्टोबर : महिलांवर अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत. छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने आत्महत्येचा प्रयत्न (girl attempt suicide over eve teasing) केला आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची असून विष प्राशन करुन तिने आपलं जीव संपवण्याचा निर्णय घेतला. बीड जिल्ह्यात (Beed district) घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील ही घटना आहे. पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिक्षण घेते. तिच्याच शाळेत शिक्षण घेणारा एक मुलगा वारंवार तिची छेड काढत असेल. या घटनेनंतर संतप्त झालेल्या पीडित मुलीने याबाबत आपल्या कुटुंबाला सांगितले. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्या मुलाला जाब विचारुन समजही दिली. वारंवार होत असलेल्या या छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीने शुक्रवारी विष प्राशन केले. या घटनेनंतर तिला उपचारासाठी बीडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने या प्रकरणात तिचा जबाब अद्याप नोंदवण्यात आलेला नाहीये. या प्रकऱणी पिंपळनेर पोलीस अधिक तपास करत आहेत. शिक्षणासाठी पैसे मागितल्याने पुण्यात नवऱ्याने पत्नीला ढकलले विहिरीत शिक्षणासाठी पैसे मागितल्याने पतीने पत्नीला विहिरीत ढकलून दिले आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आंबेगाव तालुक्यातील मंचर-घोडेगाव रस्त्यालगत ही घटना घडली आहे. पत्नीचं नशीब बलवत्तर म्हणून पत्नी बचावली आहे. या प्रकरणी आरोपी पती अनिल राठोड याच्या विरोधात मंचर पोलिसांत तक्रार दाखल कऱण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अनिल हा अवसरी पॉलिटेक्निक महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून काम करतो. पीडित वनिता यांनी आपला पती अनिल राठोड याच्याकडे शिक्षणासाठी पैसे मागितले होते. सोमवारी सकाळी वनिता राठोड यांनी पती अनिल यांच्याकडे शिक्षणासाठी आवश्यक असलेली फी मागितली. त्यावेळी त्याने पैसे देण्यास नकार दिला. तुझ्या माहेरावरून पैसे माग असे ही तो म्हणाला. त्यानंतर पती आणि पत्नी यांच्यात जोरदार वाद झाला. हा वाद सुरू असतानाच पत्नी वनिताने म्हटलं, तुम्ही मला फी भरण्यासाठी पैसे द्या किंवा माहेरी सोडा. यानंतर अनिल राठोड याने पत्नीला फिरायला जाऊया असे सांगत घराबाहेर नेलं. यमग तपनेश्वर मंदिराजवळून चालत जात असताना रस्त्याच्या शेजारी असलेल्या विहिरीत अनिलने विनाता ढकलून दिले. सुदैवाने यात वनिता बचावली आहे.
  Published by:Sunil Desale
  First published: