मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /

Aurangabad : रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराची हत्या, दोन्ही डोळे फोडून चेहऱ्यावरही केले सपासप वार

Aurangabad : रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराची हत्या, दोन्ही डोळे फोडून चेहऱ्यावरही केले सपासप वार

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराची हत्या, दोन्ही डोळे फोडून चेहऱ्यावरही केले सपासप वार

रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगाराची हत्या, दोन्ही डोळे फोडून चेहऱ्यावरही केले सपासप वार

Crime News Marathi : कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी मृतकाचे दोन्ही डोळे फोडल्याची माहिती समोर आली आहे.

सचिन जिरे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 10 नोव्हेंबर : औरंगाबाद (Aurangabad)मध्ये हत्येचं सत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. गेल्या 24 तासांत तीन हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. औरंगाबाद - जळगाव महामार्गावर रस्त्याच्या कडेला एका व्यक्तीचा मृतदेह सकाळच्या सुमारास आढळून आला. या व्यक्तीचे दोन्ही डोळे फोडून हत्या करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. मृत व्यक्तीची पोलिसांनी ओळख पटविली असून तो एका रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार (Criminal) असल्याचं तपासात समोर आलं आहे.

मृतकाचे नाव अबू बकर चाऊस (Abu Bakar Chaus) असे असल्याची माहिती समोर आली आहे. अबू बकर चाऊस हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात पविविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. इतकेच नाही तर त्याला तडीपारीची नोटीसही अनेकदा पोलिसांनी बजावली होती. पोलिसांनी अबू बकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास सुरू आहे.

आज सकाळच्या सुमारास जळगाव महामार्गावर रस्त्याच्या कडेला झुडपात एका व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. मृतकाचे दोन्ही डोफे फोडलेले होते आणि चेहऱ्यावरही चाकू ने प्रचंड वार केले होते. त्यामुळे मृतकाची ओळख पटवण्यात अडचणी येत होत्या. त्यानंतर पोलिसांनी आपल्या खबऱ्यांकडून माहिती मिळवली आणि त्या माहितीच्या तसेच इतर माहितीवरुन मृतकाची ओळख पटवली. तो कुख्यात गुंड असल्याचं समोर आलं आहे.

दरोडा टाकलेल्या घरात सोडला भलताच पुरावा; भामटा झाला गजाआड

औरंगाबाद शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीची एक विचित्र घटना समोर आली आहे. रविवारी रात्री बेगमपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण पाच घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एका घरात चोरी केल्यानंतर चोरट्याने आपला मोबाइल त्याच घरात विसरून गेला आहे. त्याची ही चूक त्याला भलतीच महागात पडली आहे. संबंधित मोबाइल पोलिसांच्या हाती लागल्यानंतर, पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

खरंतर, एखाद्या घरात चोरी केल्यानंतर चोरटा कोणताही पुरावा मागे ठेवत नाही. पण बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनेत चोरट्यानं भलतीच चूक केली आहे. ही चोरीची घटना समोर आल्यानंतर, शहरात ह्याच चोरीची चर्चा सुरू आहे. चोरट्यांच्या सावळागोंधळ पाहून पोलीसही हैराण झाले आहेत.

लग्न जुळत नसल्यानं आलं नैराश्य; परभणीत युवकाने उचललं धक्कादायक पाऊल

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथील एका युवकाने लग्न होत नसल्याच्या कारणातून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. युवकाने आपल्या राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी तरुणानं टोकाचं पाऊल उचलल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Aurangabad, Crime, Murder