मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /NCBची मोठी कारवाई; एमडी ड्रग्ज, गांजासह 20 लाखांची रोकड जप्त

NCBची मोठी कारवाई; एमडी ड्रग्ज, गांजासह 20 लाखांची रोकड जप्त

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मुंबई आणि बदलापूर येथे कारवाई करत ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. यासोबतच लाखोंची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मुंबई आणि बदलापूर येथे कारवाई करत ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. यासोबतच लाखोंची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मुंबई आणि बदलापूर येथे कारवाई करत ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. यासोबतच लाखोंची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

मुंबई, 18 एप्रिल: एनसीबी (NCB) अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या पथकाने मुंबई (Mumbai) आणि ठाणे जिल्ह्यातील बदलापूर (Badlapur) येथे छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या पथकाने मुंबईतील आग्रीपाडा आणि बदलापूर येथे कारवाई केली. या कारवाईत एनसीबीने 220 ग्रॅम एमडी ड्रग्ज (MD drugs), 43 किलो गांजा आणि 20 लाखांहून अधिक रक्कम जप्त केली आहे. या कारवाई दरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील आग्रीपाडा परिसरामध्ये सरफराज कुरेशी उर्फ पप्पी या आरोपीच्या घरी धाड मारून तपासणी केली. या तपासणी दरम्यान आरोपीच्या घरातून 165 ग्रॅम एमडी अमली पदार्थ आणि 2 लाख 15 हजारांची रोकड आढळून आली. सरफराज कुरेशी याची चौकशी केली असता त्याला हे अमली पदार्थ नागपाडा येथील राहणाऱ्या समीर सुलेमान शमा तस्कराकडून मिळाले असल्याचे समोर आले.

वाचा: पुण्यातील हॉटेलमधील हायप्रोफाइल राडा; UPSC ची तयारी करणाऱ्या नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडलं

सुलेमान शमा या आरोपीच्या घरी मारलेल्या छाप्या दरम्यान 54 ग्रॅम एमडी आणि 17 लाख 90 हजारांची रोकड आढळून आली. दरम्यान समीर सुलेमान हा आरोपी फरार असून एनसीबीकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

बदलापूर येथून गांजाचा साठा जप्त

एनसीबीच्या पथकाकडून बदलापूर येथे करण्यात आलेल्या छापेमारी दरम्यान सनी परदेशी आणि अजय नायर या अमली पदार्थ तस्करांना अटक करून त्यांच्याकडून तब्बल 43 किलो गांजा हस्तगत करण्यात आलेला आहे. हा गांजा हात या अमली पदार्थ तस्करांना कुणाल कडू या व्यक्तीकडून मिळाला असल्याचे समोर आल्यानंतर अधिक तपास केला. यावेळी अशी माहिती समोर आली की, सदरचा गांजा अमली पदार्थ हे ओडीशामधून तस्करी करून आणण्यात आला होता.

First published:
top videos

    Tags: Crime, Drugs, NCB