औरंगाबादमधील बोगस कोविड रुग्ण प्रकरण: तपासणीत 'त्या' तरुणाचा अहवाल कोविड निगेटिव्ह

औरंगाबादमधील बोगस कोविड रुग्ण प्रकरण: तपासणीत 'त्या' तरुणाचा अहवाल कोविड निगेटिव्ह

Aurangabad bogus covid patient case update: औरंगाबादमधील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी चक्क बोगस कोविड रुग्णांना उपचारासाठी दाखल कऱण्यात आले होते.

  • Share this:

औरंगाबाद, 18 नोव्हेंबर : कोरोना बाधित रुग्णांच्या (Covid positive patient) ऐवजी दुसऱ्यांनाच उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये (Aurangabad Covid Center) दाखल करण्याचा प्रकार औरंगाबादमध्ये उघडकीस आला आणि एकच खळबळ उडाली. या प्रकरणाला आता वेगळे वळण लागताना दिसत आहे. कारण, या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी संबंधित कोविड पॉझिटिव्ह तरुणाला ताब्यात घेतले आणि त्याची कोविड तपासणी केली असता तो निगेटिव्ह असल्याचं समोर आलं.

औरंगाबादमध्ये कोविड पॉझिटिव्ह असलेल्या दोन जणांनी आपल्या जागी कोविड पॉझिटिव्ह नसलेल्या तरुणांना उपचारासाठी कोविड सेंटरमध्ये पाठवले. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी कोविड पॉझिटिव्ह असलेल्या तरुणास रात्री अटक करून त्याची तपासणी केली. तपासणीत संबंधित तरुण निगेटिव्ह आला आहे आणि त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे तो तरुण सांगत आहे. त्यामुळे पोलीस आणि आरोग्य यंत्रणा चक्रावले आहेत आहेत. आता या सर्व प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखा करीत आहेत.

वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी सलग दुसऱ्या दिवशी कोविड रुग्णांची नोंद

काय आहे संपूर्ण प्रकरण?

औरंगाबादमध्ये कोविड सेंटरमध्ये चक्क बोगस रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Covid positive) मोकाट फिरत असून त्यांच्याऐवजी बोगस रुग्णालयात उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आलाय.

बोगस कोरोना बाधित रुग्णांना कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होण्यासाठी 10 हजार रुपये दिले जात असल्याची माहितीही समोर आली आहे. औरंगाबाद महापालिकेच्या मेलट्रॉन कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर औरंगाबाद महानगरपालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. बोगस रुग्ण, तसेच पॉझिटिव्ह आलेल्या संबंधित रुग्णांच्या विरोधात मनपाकडून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वाचा : कोरोना रुग्णसंख्या वाढताच लसीकरणाचा 'हा' सकारात्मक परिणाम आला समोर

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादमधील एका उद्यानाच्या बाहेर कोरोनाची अँटीजेन टेस्ट केली असताना दोन रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्याचं कळालं. यानंतर या दोन्ही तरुणांनी आपल्या ऐवजी इतर दोन तरुणांना कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काम लावतो म्हणून जालना येथून आणलेल्या तरुणांना बोगस रुग्ण बनवत त्यांना रुग्णालयात दाखल केले.

ज्यावेळी या तरुणांच्या लक्षात आले की, आपल्याला कोविड रुग्ण म्हणून दाखल करुन उपचार सुरू केले आहेत त्यावेळी त्यांचाही गोंधळ उडाला. त्यानंतर त्यांनी कोविड सेंटरमध्ये गोंधळ घालत सुटका करण्याची मागणी केली. यानंतर रुग्णालय प्रशासनाच्याही हा प्रकार लक्षात आला.

Published by: Sunil Desale
First published: November 18, 2021, 3:06 PM IST

ताज्या बातम्या