मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत दिरानंच विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड, धक्कादायक कारण आलं समोर

मुंबईत दिरानंच विधवा वहिनीच्या चेहऱ्यावर फेकलं अ‍ॅसिड, धक्कादायक कारण आलं समोर

मुंबईत (Mumabai) एका दीरानं (Brother in Law) आपल्या वहिनीच्या (Sister in law) चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकल्याची (Acid attack) धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबईत (Mumabai) एका दीरानं (Brother in Law) आपल्या वहिनीच्या (Sister in law) चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकल्याची (Acid attack) धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबईत (Mumabai) एका दीरानं (Brother in Law) आपल्या वहिनीच्या (Sister in law) चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकल्याची (Acid attack) धक्कादायक घटना समोर आली आहे.

मुंबई, 10 जुलै: मुंबईत (Mumbai) एका दिरानं (Brother in Law) आपल्या वहिनीच्या (Sister in law) चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकल्याची (Acid attack) धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात आरोपी दिराविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर घाटकोपर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच आरोपी दिराच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पीडित महिला घराशेजारी असलेल्या एका दुकानात कामाला गेल्याच्या रागातून आरोपी दिरानं अ‍ॅसिड हल्ला केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. प्रबुद्ध कांबळे असं अटक केलेल्या 40 वर्षीय आरोपी दिराचं नाव आहे. तर पीडित महिला आरोपी तरुणाची वहिनी असून त्या विधवा आहेत. काही दिवसांपूर्वी पीडितेच्या पतीचं निधन झालं आहे.

हेही वाचा-अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; 15 दिवस भाड्याच्या खोलीत ठेवलं अन्...

पतीचं निधन झाल्यानंतर घरच्यांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी पीडित महिलेनं नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तिनं आरोपी प्रबुद्ध कांबळे यांच्या घराशेजारी असणाऱ्या सुदांशू प्रमाणिक यांच्या ज्वेलर्सच्या दुकानात नोकरीसाठी विचारणा केली. सुदांशू प्रमाणिक यांनीही त्वरित पीडितेला नोकरी दिली. पण वहिनीचा दुकानात काम करण्याचा निर्णय आरोपी दिराला आवडला नाहीय. त्यामुळे त्यानं विरोध केला.

हेही वाचा-धक्कादायक! अनैतिक संबधातून रचला कट; 6जणांनी घरात घुसून विवाहित महिलेला पाजलं विष

पण पतीचं निधन झाल्यानं पैसा कमवणं आवश्यक असल्यानं पीडितेनं ज्वेलर्सच्या दुकानात नोकरी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळं चिडलेल्या दिरानं गुरुवारी रात्री आपल्या वहिनीच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकलं. या दुर्दैवी घटनेत वहिनींचा चेहऱ्यासह शरीर अनेक ठिकाणी भाजलं आहे. स्थानिक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिराला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास घाटकोपर पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Crime news, Mumbai