औरंगाबाद, 12 नोव्हेंबर: सध्या देशात अमली पदार्थ तस्करीच्या अनेक घटना समोर येत आहेत. कालच गुजरातमधील द्वारका याठिकाणी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. तसेच आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. असं असताना औरंगाबाद याठिकाणी नशेच्या गोळ्या कारमधून घेऊन (drug pills found in car) जाण्याची एक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारचालकाला अटक केली असून संबंधित कारही जप्त केली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता, संबंधित कार औरंगाबादेतील माजी नगरसेवकाच्या (Former Corporator) भावाची असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
सय्यद मंजूर असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. संबंधित आरोपी कारमधून नशेच्या गोळ्या घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांना गुरुवारी मिळाली होती. या माहितीच्या अधारे सीटी चौक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी औरंगाबाद येथील अण्णा भाऊ साठे चौक परिसरात सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा-तासाभराच्या अंतराने कपलने सोडला प्राण; जळगावात लव्ह स्टोरीचा हृदयद्रावक शेवट
यावेळी पोलिसांनी आरोपीकडून 260 नशेच्या गोळ्या जप्त (260 drug pills found in former Corporator's brother's car) केल्या आहेत. 13 स्ट्रीपमध्ये या 260 गोळ्या आढळून आल्या आहेत. पोलिसांनी आरोपी सय्यद मंजूर याच्याकडील गाडी जप्त करून अधिक तपास केला असता, संबंधित गाडी औरंगाबादमधील माजी नगरसेवक सय्यद मतीन याचे भाऊ सय्यद मोसीन यांची असल्याचं समोर आलं आहे. संबंधित नशेच्या गोळ्या वाहतूक करणारी गाडी नगरसेवकाच्या भावाची असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-पत्नीचा पाठलाग करत भररस्त्यात केले सपासप वार; थरारक घटनेनं मुंबई हादरली!
संबंधित चारचाकी गाडी आरोपी सय्यद मंजूरकडे कशी आली? नशेच्या गोळ्यांसाठी त्यांनी ही कार का वापरली? कुणाच्या सांगण्यावर अमली पदार्थांची तस्करी केली? यात आणखी कोणाचा सहभाग आहे? अशा विविध प्रश्नांबाबत सध्या गूढ निर्माण झालं असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Crime news