मराठी बातम्या /बातम्या /aurangabad /Aurangabad: अर्ध्यावर मोडला संसार; वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Aurangabad: अर्ध्यावर मोडला संसार; वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Suicide in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Suicide in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

Suicide in Aurangabad: औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे.

बनोटी, 06 जुलै: औरंगाबाद जिल्ह्यातील बनोटी याठिकाणी एका 21 वर्षीय विवाहितेनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Married woman commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी  (5 जुलै) दुपारी घरात कुणी नसताना विवाहितेनं आयुष्याचा शेवट केला आहे. अवघ्या एका वर्षभरापूर्वी विवाह झाल्यानंतर आत्महत्या केल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

स्वर्णा अंबादास जाधव असं आत्महत्या करणाऱ्या 21 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. तिचं वर्षभरापूर्वी किन्ही येथील रहिवासी असणाऱ्या अंबादास जाधव या वकिलाशी झालं होतं. सोमवारी सकाळी पती वकील अंबादास जाधव सोयगाव येथे न्यायालयात गेल्यानंतर काही वेळानं घरातील अन्य सदस्य देखील शेतात गेले. दरम्यान घरात कुणी नसताना स्वर्णा यांनी घरातील छताच्या कडीला साडी बांधून गळफास घेतला आहे.

हेही वाचा-'आई-बाबा मला माफ करा...' चिठ्ठी लिहून दहावीच्या विद्यार्थ्यानं सपवलं जीवन

दुपारच्या सुमारास पुतण्या गौरव घरी आला. तेव्हा स्वर्णा यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आरडाओरडा केला, तेव्हा गल्लीतील काहीजणांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर स्वर्णा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला.

हेही वाचा-पिंपरीत महिला पोलिसाची आत्महत्या;पती परराज्यात ड्युटीवर असताना उचललं टोकाचं पाऊल

स्वर्णा यांनी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी लिहिली नाही, त्यामुळे आत्महत्येचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Suicide