डहाणू, 06 जुलै: डहाणू तालुक्यातील आंबोकी याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं (10th Grade student) गळफास घेऊन आत्महत्या (commits suicide) केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे राहत्या घरात गळफास घेत त्यानं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत (Suicide note) त्यानं आपल्या आई-बाबांना आणि मित्रांना भावनिक साद घातली आहे. तसेच आत्महत्या का करत आहे? याचं कारण देखील नमूद केलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस याचा तपास करत आहेत.
प्रदीप राज्या घरट असं आत्महत्या करणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. तो तवा येथील शासकीय आश्रमशाळेत दहावीच्या वर्गात शिकत होता. पण लॉकडाऊन सुरू असल्यानं त्याची शाळा बंद झाली. त्यामुळे शिक्षणात खंड पडला. तर दुसरीकडे कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्यानं मृत प्रदीप वसई शहरात कामासाठी गेला होता. याठिकाणी त्याला व्यवस्थापकाकडून मानसिक त्रास देण्यात आल्याचं त्यानं लिहिलेल्या चिठ्ठित नमूद केलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-पिंपरीत महिला पोलिसाची आत्महत्या;पती परराज्यात ड्युटीवर असताना उचललं टोकाचं पाऊल
मृत प्रदीपनं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आपल्या आई वडिलांना आणि मित्रांना भावनिक साद घातली आहे. तसेच काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यानं चिठ्ठीत लिहिलं की, 'आई-बाबा मला माफ करा, तुमची खूप आठवण येते, काळजी घ्या! मित्रांचीही खूप आठवण येते' असं भावनिक वाक्य लिहून दहावीत शिकणाऱ्या प्रदीपनं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. या घटनेचा पुढील तपास कासा पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Student, Suicide