मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या राशींच्या व्यक्तींना करावं डेट? कोणाशी पटेल आपलं?

कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या राशींच्या व्यक्तींना करावं डेट? कोणाशी पटेल आपलं?

file photo

file photo

लग्न जुळवण्याअगोदर मुला-मुलाची कुंडली जुळवून पाहिली जाते. लव्ह मॅरेज किंवा रिलेशनशिपमध्ये हा प्रकार फारसा दिसत नसला तरी Dating ला जाताना तुमच्या पार्टनरला समजून घेता येईल का हे तरी जाणून द्या.. जुळेल का तुमचं?

  दिल्ली, 18 मे: सध्या विज्ञानाचं युग आहे. मानवानं विज्ञानाच्या (Science) आधारे इतकी प्रगती केली आहे की, आपण थेट मंगळापर्यंत जाऊन पोहचलो आहोत. मात्र, तरीदेखील कधीनाकधी आपल्याला राशीभविष्य (Horoscope), ज्योतिषशास्त्र (Astrology), अंकशास्त्र (Numerology) यासारख्या गोष्टींवर विश्वास ठेवावासा वाटतो. काही लोक आपल्या दिवसाची सुरुवातच राशी भविष्य वाचून करतात. बहुतेक हिंदू कुटुंबांमध्ये तर काही कन्फ्युज्ड व्यक्ती राशीभविष्याचा आधार घेतात. हॅपी आणि हेल्दी रिलेशीपसाठी (Relationships) नेमकं काय केलं पाहिजे, हे माहीत नसेल तर राशींचा अभ्यास करून तुम्ही काही विशिष्ट लोकांना डेट (Date) करणं टाळू शकता. इंडिया डॉट कॉमनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  कोणत्या राशीच्या लोकांनी कोणत्या राशीच्या लोकांना डेट करणं टाळलं पाहिजे याची माहिती खाली देण्यास आली आहे.

  1) मेष (Aries): मेष हे अग्नितत्त्वाची रास आहे. या राशीतील व्यक्ती आत्मविश्वासपूर्ण, उत्कट आणि धाडसी असतात. हे लोक लवकर इमोशनली कनेक्ट होऊ शकत नाहीत किंवा त्यांचं रोमँटिक रिलेशनशीप जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे या राशीतील लोकांनी स्वतःच्या फायद्यासाठी कन्या आणि वृश्चिक राशीतील व्यक्तींना डेट करण्याचा प्रयत्न करू नये.

  2) वृषभ (Taurus): रिलेशनशीपच्या बाबतीत चंद्र राशी तूळ आणि धनु असलेल्या व्यक्ती या वृषभ राशीतील लोकांसाठी चांगले ऑप्शन्स नाहीत. वृषभ ही पृथ्वीतत्त्वाची रास आहे. या राशीतील व्यक्ती समजूतदार आणि विश्वासार्ह असतात. त्यांना रिलॅक्स राहून स्वतःची स्पेस एन्जॉय करण्यात आनंद मिळतो. तूळ राशीतील अत्यंत प्रेमळ स्वभाव आणि धनु राशीतील अतिमोकळेपणाचा स्वभाव वृषभ राशीतील व्यक्तींना रुचत नाही.

  3) मिथुन(Gemini): वृश्चिक आणि मकर या चंद्रराशींच्या व्यक्तींशी मिथुन राशीच्या व्यक्तींचं चांगलं जमत नाही. मिथुन वायूतत्त्वाची रास आहे. या राशीतील व्यक्ती नैसर्गिकरित्या स्मार्ट, व्हर्सेटाईल आणि प्रेमळ असतात. त्यामुळे, शक्तिशाली आणि वर्चस्व गाजवणारी वृश्चिक व दृढनिश्चयी आणि संघटित मकर राशीतील लोकांशी मिथुन राशीच्या व्यक्तींशी रिलेशनशीप ठेवणं योग्य ठरत नाही.

  4) कर्क (Cancer): धनु आणि कुंभ या चंद्रराशींतील व्यक्तींसोबत कर्क राशीतील लोकांनी रिलेशनशीप टाळावं. कर्क ही जलतत्त्वाची रास असून, ही मंडळी अत्यंत भावनिक, सहानुभूतीशील आणि अंतर्ज्ञानी म्हणून ओळखली जातात. मुक्तछंदी असलेल्या धनु आणि तर्कशुद्ध व सोशल असलेल्या कुंभसोबत कर्क राशीतील व्यक्तींचं पटत नाही.

  Job Tips: तुम्हालाही मनासारखा जॉब मिळत नाहीये? चिंता नको; 'या' स्मार्ट टिप्समुळे लगेच मिळेल नोकरी; वाचा सविस्तर

   5) सिंह (Leo): ग्रह-नक्षत्रांनुसार सर्जनशील, तापट आणि उदार असलेल्या सिंह राशीतील व्यक्तींनी मकर आणि मीन राशीतील व्यक्तींपासून दूर रहावं. सिंह ही एक अग्नितत्त्वाची रास आहे. त्यामुळे या व्यक्ती आक्रमक असतात. तर मीन राशीतील व्यक्ती काळजी घेणाऱ्या आणि अतिसंवेदनशील असतात. मकर ही जबाबदार, शिस्तबद्ध आणि व्यावहारिक आहे. म्हणून या दोन राशींतील व्यक्ती आणि सिंह राशीतील व्यक्तींचं रिलेशनशीप योग्य ठरत नाही.

  6) कन्या(Virgo): कुंभ आणि मेष या चंद्र राशीतील व्यक्ती कन्या राशीच्या लोकांसाठी अयोग्य आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीतील व्यक्ती मूळतः निष्ठावान, विश्लेषणात्मक आणि वास्तववादी असतात. कुंभ राशीतील व्यक्ती स्वतंत्र आणि मानवतावादी असतात आणि मेष राशीतील व्यक्ती सत्यवादी, उत्साही आणि धाडसी असतात.

  7) तूळ (Libra): तूळ राशीतील व्यक्ती स्वभावाने उत्कट, चैतन्यशील आणि रोमँटिक असतात. शक्य असल्यास अशा व्यक्तींनी मीन आणि वृषभ राशीतील लोकांच्या प्रेमात पडू नये. वृषभ राशीतील व्यक्ती सॉलिड, लॉयल आणि सोशलाईज होणाऱ्या असतात. तर, मीन राशीतील व्यक्ती अत्यंत संवेदनशील, सहानुभूतीशील आणि सर्जनशील असतात. त्यामुळे तूळ राशीतील व्यक्तींना जर रिलेशनशीपमध्ये गुंतागुंत नको असेल त्यांनी या दोन राशींची निवड करू नये.

  8) वृश्चिक (Scorpio): वृश्चिक राशीतील व्यक्ती शक्तीशाली, प्रेरणादायी आणि जगाची तीव्र समज असलेल्या असतात, असं मानलं जातं. ही एक जलतत्त्वाची रास आहे. त्यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचे मेष आणि मिथुन राशीतील व्यक्तींशी प्रेमसंबंध सुसंगत नसतात. मिथुन राशीतील व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या विचारी आणि आनंदी असतात तर मेष राशीतील लोक शूर आणि धैर्यवान असतात. त्यामुळे वृश्चिक राशीतील व्यक्तींनी या राशींना डेट करू नये.

  9) धनु (Sagittarius): अग्नितत्त्वाची रास असलेल्या धनु राशीतील व्यक्ती मुक्त, तत्त्वज्ञानी, उदार आणि उत्साही असतात. जर आपण स्वभावगुणांचा विचार केला तर, वृषभ (Taurus) आणि कर्क राशींतील व्यक्तींशी धनुला जुळवून घेता येत नाही. वृषभ राशीतील व्यक्ती स्थिर आणि एकनिष्ठ असतात तर, कर्क राशीतील व्यक्ती खूप भावनिक, प्रोटेक्टिव्ह असतात.

  10) मकर (Capricorn): मकर राशीतील व्यक्ती जबाबदार, शिस्तप्रिय, विश्वासार्ह, धैर्यवान आणि दृढनिश्चयी असतात. अशा व्यक्तींनी मिथुन (Gemini) आणि सिंह (Leo) राशींतील व्यक्तींना डेट करू नये. मिथुन राशीचे लोक बुद्धिमान आणि पद्धतशीर असतात. तर, सिंह राशीतील लोक प्रेरणादायी, प्रबळ इच्छाशक्ती, उदार आणि कलात्मक असतात. ग्रह-नक्षत्रांच्या मांडणीनुसार मकर राशीच्या लोकांसाठी मिथुन आणि सिंह राशीतील लोक सुसंगत ठरत नाहीत.

  Vastu Tips: घरात सकारात्मकता, संपन्नता राहण्यासाठी 'या' दिशेला लावावं निशिगंधाचं झाड

   11) कुंभ (Aquarius): दूरदृष्टी आणि माणुसकी हे गुणधर्म असलेल्या राशींमध्ये कुंभ राशीचा सर्वांत वरचा क्रमांक लागतो. या राशीतील व्यक्ती प्रगतीशील आणि समजूतदार असतात. वायूतत्त्वाची रास असल्याने ते पट्कन कुठेही जुळवून घेतात. असं असलं तरी कुभ राशीतील व्यक्तींचं कर्क (Cancer) आणि कन्या (Virgo) राशीतील व्यक्तींशी पटत नाही. कन्या राशीची मंडळी धाडसी, शूर, प्रामाणिक आणि उत्साही असतात तर, कर्क राशीचे जातक भावनिक, सहानुभूतीशील आणि मायाळू असतात.

  12) मीन (Pisces): मीन राशीच्या व्यक्ती अत्यंत संवेदनशील, रहस्यमय, सहानुभूतीशील आणि सर्जनशील असतात. मीन ही जलतत्त्वाची रास (Water Sign) आहे. म्हणून सिंह आणि तूळ रास असलेल्या व्यक्ती मीन राशीच्या जातकांसाठी योग्य मानल्या जात नाहीत. सिंह (Leos) राशीच्या व्यक्ती धाडसी, प्रेरक, दानशूर आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात. तर, तूळ (Libras) राशीतील व्यक्ती रोमँटिक असतात. त्यांना स्वातंत्र्य, साहस आणि उत्स्फूर्ततेचा आनंद घेण्याची सवय असते. अशा स्थितीमध्ये आपण त्यांच्या स्वभावाचा विचार केला तर मीन राशीच्या व्यक्तींचे सिंह आणि तूळ राशीच्या व्यक्तींशी हेल्दी रिलेशनशीप (Healthy Relationship) राहू शकत नाही.

  तुमचा जर राशिभविष्यावर विश्वास असेल तर रिलेशनशीप सुरू करण्यापूर्वी तुम्ही वरच्या गोष्टी विचारात घेऊ शकता. कदाचित त्याचा फायदा होऊ शकतो. डेटिंगमध्येच कशाला तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या राशी माहीत असतील तर तुम्ही वरची माहिती लगेचच पडताळून पाहू शकता. अर्थात निर्णय तुमचा आहे.

  First published:
  top videos

   Tags: Astrology and horoscope, Dating app, Relationship