दिल्ली, 17 मे: घरात सुख-शांती, समृद्धी नांदावी, असं प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी काही जण विशिष्ट पद्धतीनं घराची बांधणी करणं, घराची सजावट करणं आदी गोष्टी करत असतात. हे सर्व करूनही काही जण घरात पैसा टिकत नसल्याची आणि नकारात्मक वातावरण राहत असल्याची तक्रार करतात. या समस्या दूर करण्यासाठी वास्तुशास्त्र (Vastu Shastra) अभ्यासकांचा सल्लादेखील घेतात. काही छोट्या उपाययोजनांच्या माध्यमातून अशा समस्या दूर करता येतात. घरात आणि घराच्या परिसरात काही विशिष्ट वनस्पती (Plants) किंवा फुलझाडं लावली तर त्याचा फायदा होतो आणि वास्तुदोष दूर होतात, असं जाणकार सांगतात. रजनीगंधा म्हणजेच निशिगंधाच्या फुलांमुळे घरातल्या व्यक्तींमध्ये सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) तयार होते. त्यामुळे वास्तुशास्त्रात या झाडाला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. वास्तुशास्त्रानुसार कोणतीही वनस्पती किंवा झाड घरात, घराच्या परिसरात लावण्यापूर्वी त्याची योग्य माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. निशिगंधाचं झाड घरात योग्य दिशेला लावलं, तर त्यामुळे निश्चितच फायदा होऊ शकतो. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वास्तुशास्त्रानुसार, घरात वनस्पती, फुलझाडं लावणं महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे. काही वनस्पतींमुळे वास्तुदोष नाहीसा होतो आणि घरात सुख-समृद्धी येते. निशिगंधाचं झाड घरात लावल्यास घरातलं वातावरण सकारात्मक होऊ लागतं. घरातल्या व्यक्तींचं आर्थिक उत्पन्न (Earnings) वाढू लागतं. निशिगंधाची छोटी पांढऱ्या रंगाची सुगंधी फुलं घरातलं वातावरण पूर्णतः बदलून टाकतात. हे झाड ज्या घरात असतं, तिथं लक्ष्मीमातेचा वास असतो. घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण होत नाहीत, असं मानलं जातं.
वाचा - प्लास्टिक सर्जरीत शरीरात टाकलेल्या प्लास्टिकचं पुढे काय होतं? वाचून बसेल धक्का!वास्तुशास्त्र अभ्यासकांच्या मते, निशिगंधाचं झाड घराच्या पूर्व (East) किंवा उत्तर (North) दिशेला लावल्याने अनेक लाभ होतात. यामुळे घरात धनधान्य समृद्धी येते. घरावर लक्ष्मीची कृपा राहते. घरातल्या व्यक्तीचं जीवन या फुलांप्रमाणे बहरू लागतं. वैवाहिक जीवनाशी (Marital Life) संबंधित काही समस्या जाणवत असतील, तर निशिगंधाचं झाड खोलीच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावणं आवश्यक आहे. यामुळे नात्यात जिव्हाळा वाढतो. तसंच घरात सकारात्मकता आणि शांती राहते.
घरामध्ये कोणत्या वनस्पती लावाव्यात याचे काही नियम आहेत. काही वनस्पती, झाडं घरात लावल्यास मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात वनस्पती, झाडं लावण्यापूर्वी वास्तुशास्त्रातल्या नियमांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. निशिगंधाच्या बाबतीतदेखील या गोष्टी महत्त्वाच्या आहेत.