मेष (Aries): आज तुम्ही आनंदी राहाल. कोणत्याही विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देऊ नका. तुमचं काम करत राहा. तुम्हाला एक दिवस नक्की यश मिळेल. तुम्ही तुमच्या सामाजिक वर्तुळात संवाद वाढवू शकाल. मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे.
उपाय: श्रीकृष्ण मंदिरात मोराची पिसं दान करा.
वृषभ (Taurus): आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कार्यालयात अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. उद्योगासाठी एक सामान्य दिवस असेल. कोणत्याही नवीन डील्स अपेक्षित नाहीत.
उपाय: जेवणात काळी मिरी वापरा.
मिथुन (Gemini): आज तुम्हाला स्वतःमध्ये नवीन ऊर्जा आणि शक्ती जाणवेल. प्रेमप्रकरणाबद्दल तुम्ही खूप उत्सुक असाल. ऑफिसमध्ये तुम्हाला बढती मिळण्याची किंवा पगार वाढल्याची चर्चा असेल. तुमच्या उत्साहावर नियंत्रण ठेवा.
उपाय: रामरक्षा स्तोत्राचं पठण करा.
कर्क (Cancer): आज तुम्हाला ऑफिसमध्ये काही नवीन अधिकार दिले जाऊ शकतात. आज तुम्ही क्रिएटिव्ह कामात व्यस्त असाल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी मिळतील.
उपाय: गरिबांना जेवण द्या.
सिंह (Leo): आज ऑफिसच्या कामात व्यस्त राहाल. आजच्या कामामुळे भविष्यात आर्थिक लाभ होईल. कर्ज घेण्याची गरज आहे की नाही हे, बचतीनुसार ठरवावं. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. फायदेशीर डील मिळेल.
उपाय: माशांना खाद्य द्या.
कन्या (Virgo): आज तुम्ही तुमच्यावर असलेल्या जुन्या ऋणाची परतफेड करण्यात यशस्वी होऊ शकता. जीवनावश्यक वस्तू खरेदी करावी. तुमच्या खर्चाकडे लक्ष ठेवा. बजेट बिघडू शकतं. काही काळासाठी, लोकांना तुमच्या मूळ कल्पना आवडतील.
उपाय: हनुमानाची पूजा करा.
तूळ (Libra): ऑफिसमध्ये कामाचा बोजा अधिक राहील. तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या येतील. व्यावसायिकांची दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामं पूर्ण होतील. व्यवसायात जोखीम घेणं टाळा. गुंतवणूक करण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रं काळजीपूर्वक वाचा.
उपाय: लहान मुलींना मिठाई द्या.
वृश्चिक (Scorpio): आजचा दिवस आनंदानं भरलेला असेल. व्यवसायात कोणाचातरी सल्ला घ्यावा लागेल. प्रत्येक नवीन नोकरीतील कायदेशीर बाबींचा विचार करा. वादामध्ये तुमचा विजय होईल. जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा. वाहन जपून चालवा.
उपाय: गायीला हिरवा चारा द्या.
धनू (Sagittarius): आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याच्या अनेक संधी मिळतील. त्या संधी ओळखणं आणि त्यावर कृती करणं ही तुमची जबाबदारी असेल. व्यापारी वर्गानं कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी व्यवहार करण्यापूर्वी सखोल चौकशी करावी.
उपाय: मुंग्यासाठी पीठ ठेवा.
मकर (Capricorn): आज इतरांच्या भावना ओळखून काम करणं योग्य ठरेल. ऑफिसमध्ये टीमवर्कमुळे, तुम्ही कोणतीही कठीण समस्या सोडवू शकाल. व्यावसायिकांसाठी कठीण काळ असेल. पैसे अडकू शकतात. भविष्यातील योजना आत्ताच तयार करा.
उपाय: संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा.
हे वाचा - कमर्शियल कामात गती, बिझनेसमध्ये वाढेल नफा; 25 जानेवारीचं आर्थिक राशीभविष्य काय?
कुंभ (Aquarius): व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतील. कार्यालयात विरोधकांचा पराभव कराल. अधिकाऱ्यांशी संबंध चांगले होतील. वाहन-जमीन किंवा कोणतीही मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची योजना आखता येईल. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे.
उपाय: हनुमान मंदिरात ध्वज दान करा.
मीन (Pisces): आर्थिक बाबींमध्ये सावध राहण्याची गरज आहे. कोणाशीही पैशाचं व्यवहार करणं टाळा. गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक होऊ शकते. कार्यालयातील कोणतीही अवघड समस्या दूर होईल. ज्येष्ठांचा सल्ला घेणं योग्य ठरेल.
उपाय: सूर्याला अर्घ्य द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Money, Rashibhavishya, Republic Day 2023