आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (18 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : आज तुम्हाला रखडलेल्या कामाबद्दल चिंता वाटेल. तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला गुंतवणुकीच्या नव्या संधी मिळतील. नोकरदार व्यक्तींना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : श्रीसूक्ताचं पठण करा.
वृषभ (Taurus) : आज तुम्हाला ऑफिसच्या कामाबद्दल विनाकारण चिंता वाटेल. आज तुमचं चित्तही थोडं विचलित असेल. ताणमुक्तीसाठी तुम्ही छोट्या ट्रिपवर जाऊ शकाल. त्यामुळे आर्थिक प्रगतीची शक्यता आहे.
उपाय : भैरव मंदिरात ध्वज अर्पण करा.
मिथुन (Gemini) : तुमच्या बिझनेसमध्ये तोटा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीबद्दल चिंता वाटेल. आवश्यक नसलेल्या खर्चांसाठी तुम्हाला कर्ज घ्यावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे गरजेचे नसलेले खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. जमिनीत गुंतवणूक केल्यास तुम्हाला नफा मिळेल.
उपाय : शिवलिंगावर अभिषेक करा.
कर्क (Cancer) : आज आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. चांगल्या गुंतवणूक संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ट्रेडर्सनी सावधगिरी बाळगावी. अत्यंत सावधगिरीने निर्णय घ्यावेत.
उपाय : सरस्वती मातेची उपासना करा.
सिंह (Leo) : कौटुंबिक समस्या वाढू शकतील. त्यामुळे ऑफिसच्या कामावर विपरीत परिणाम होऊ शकेल. त्यामुळे घर आणि ऑफिस या दोन्ही बाबी वेगवेगळ्या ठेवणं गरजेचं आहे. ऑफिसचं काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ते पुढे ढकलू नका. रोजगाराच्या नव्या संधी आज उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
उपाय : प्राण्यांची पूजा करा.
कन्या (Virgo) : सातत्याने वाढणाऱ्या गरजा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणू शकतात. तुम्हाला कर्जही घ्यावं लागू शकतं. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ट्रेडर्सना लाभ मिळेल. तुमचा दृष्टिकोन योग्य पद्धतीने मांडा.
उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
तूळ (Libra) : तुमच्या ऑफिसच्या कामाकडे लक्ष द्या. कारण तोटा होण्याची शक्यता आहे. नव्या व्यक्तींवर विश्वास ठेवण्याआधी बारकाईने तपासणी करा. अन्यथा तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. आजचा दिवस गुंतवणुकीसाठी चांगला आहे; मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
उपाय : बुध ग्रहाशी निगडित वस्तू दान करा.
वृश्चिक (Scorpio) : आर्थिक समस्या टाळू इच्छित असलात, तर आज कोणताही नवा प्रोजेक्ट सुरू करू नका. कारण तोट्याची शक्यता आहे. सातत्याने येत असलेल्या अडचणींमुळे तुमचा उत्साह कमी असेल. ट्रेडर्सना दिवस फायद्याचा असेल.
उपाय : गोशाळेला दान करा.
धनू (Sagittarius) : आज तुम्हाला बिझनेसमध्ये नफा मिळेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.
उपाय : गणपतीला शेंदूर अर्पण करा.
मकर (Capricorn) : बिझनेसमध्ये अडचण येऊ शकते. ताण आलेल्या मनाने ऑफिसमध्ये कोणतंही काम करू नका. ऑफिसमधल्या कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. आज शेअर मार्केट किंवा क्रिप्टोकरन्सीमध्ये खर्च केल्यास कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे.
उपाय : सूर्याची उपासना करा.
कुंभ (Aquarius) : कोणत्याही कारणाशिवाय आज तुम्हाला चिंता सतावेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तुमच्या गरजांवर नियंत्रण ठेवा. अन्यथा खर्च खूप वाढतील. एकाच वेळी दोन प्रोजेक्ट्सवर काम करू नका.
उपाय : हनुमान मंदिरात जाऊन बजरंग बाण स्तोत्र म्हणा.
मीन (Pisces) : नोकरदार व्यक्तींना करिअरमध्ये यश मिळेल. उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. यशाबद्दल आनंदी, उत्साही असाल. तुमचा बिझनेस किंवा करिअरबद्दल मोठा प्लॅन आखाल. आर्थिक बाजू उत्तम असेल.
उपाय : काळ्या कुत्र्याला काही तरी गोड खाऊ घाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs