आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (4 नोव्हेंबर 2022) राशिभविष्य मेष (Aries) : तुमचा दृढ आत्मविश्वास आणि आजचं सोपं काम या दोन्हींच्या संयोगामुळे आज तुम्हाला बराच मोकळा वेळ मिळेल. आज काही व्यक्तींना जमिनीशी संबंधित प्रकरणांमध्ये पैसे खर्च करावे लागतील. उपाय : गुरुजन किंवा ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. वृषभ (Taurus) : महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये तुम्ही सावध असाल. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दुर्लक्ष करू नका. पेपरवर्कमध्ये सावधगिरी बाळगा. बिझनेस सर्वसाधारण असेल. शहाणपणाचा निर्णय घ्याल. संधींचा लाभ घेण्याचा विचार कराल. तयारी पुढे सुरू ठेवा. उपाय : सरस्वती मातेची पूजा करा. मिथुन (Gemini) : कामाचं वातावरण चांगलं राहील. गरजेची कामं पूर्ण कराल. व्यावसायिक शिक्षण घ्याल. आवश्यक असलेली माहिती मिळवू शकाल. मोठा विचार करणं हे बिझनेसमधल्या नफ्याचं लक्षण आहे. स्पर्धा वाढेल. संधी कायम राहतील. उपाय : पांढऱ्या वस्तू दान करा. कर्क (Cancer) : बिझनेसच्या कामात भावनिकपणा आणि निष्काळजीपणा टाळा. वेगवेगळ्या विषयांत तुम्ही कम्फर्टेबल असाल. स्वार्थ आणि इगो टाळा. शांत राहा, नियम पाळा. बिझनेसमधलं करिअर सक्रिय असेल. ऑफिसर क्लास सहकार्य करणारा असेल. उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळं दान करा. सिंह (Leo) : कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास कायम राहील. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. नफ्यात वाढ होईल. बिझनेसमध्ये मोठी उद्दिष्टं साध्य कराल. प्रोफेशनल अॅक्टिव्हिझम कायम राखाल. सार्वजनिक कामांमध्ये सहभागी व्हाल. बिझनेसचं काम ऐरणीवर येईल. तुमचं मत मांडायला कचरू नका. उपाय : असहाय व्यक्तींना अन्नदान करा. कन्या (Virgo) : करिअर-बिझनेसमध्ये चांगली बातमी मिळेल. पैशांमध्ये वाढ होईल. चांगलं काम अनुकूल ठरेल. संधींचा लाभ घ्याल. तुम्हाला काही तरी मौल्यवान गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. प्रत्येक जण मदत करील. प्रेमसंबंध मजबूत असतील. विश्वासार्हता, प्रभाव आणि लोकप्रियता यांमध्ये वाढ होईल. वैयक्तिक यशामध्ये वाढ होईल. उपाय : भगवान शिवशंकरांना जल अर्पण करा. तूळ (Libra) : बिझनेसमधल्या प्रत्येकाला कनेक्ट करण्यासाठी काम असेल. पार्टनर्स हे पार्टनर्सच असतील. कामाला प्रोत्साहन मिळेल. नफा अपेक्षेपेक्षा जास्त असेल. नव्या पद्धतींचा अवलंब कराल. इनोव्हेशन यशस्वी ठरेल. शक्ती वाढेल. बिझनेस अॅक्टिव्हिटीजना वेग येईल. तुम्हाला चांगल्या परफॉर्मन्सचा अनुभव घेता येईल. उपाय : श्री हनुमानाची आरती करा. वृश्चिक (Scorpio) : धोरणात्मक निर्णयांवर फोकस वाढेल. कायदेविषयक प्रकरणांमध्ये संयम राखा. रूटीन निश्चित करा. जोखीम पत्करू नका. वाद-विवादापासून दूर राहा. काम थांबू शकेल. व्यवहारांमध्ये दक्षतेचा अभाव नको. मितभाषी राहा. उपाय : हनुमान चालिसा पठण करा. धनू (Sagittarius) : जमिनीशी निगडित डील्सचं करारांमध्ये रूपांतर होईल. गुंतवणुकीपूर्वी आवश्यक तो सल्ला घ्या. बिझनेस अॅक्टिव्हिटीज सुरू ठेवाल. उद्दिष्टपूर्ती होईल. सर्वत्र यश मिळण्याचे संकेत आहेत. रूटीन चांगलं असेल. परीक्षा, स्पर्धेमध्ये तुमची कामगिरी उत्तम असेल. उपाय : गायीला चपाती खाऊ घाला. मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने पुढे जाल. काळजीपूर्वक, मेहनतीने काम कराल. भविष्यासाठी बनवलेले प्लॅन्स यशस्वी होतील. बिझनेस मॅटर्स सोडवले जातील. सगळ्या बाजूंनी ऑप्टिमायझेशन सुरू राहील. सर्वांमध्ये सहकार्याचं स्पिरिट असेल. करिअर-बिझनेसमध्ये अॅक्टिव्ह राहाल. उपाय : गरीब व्यक्तीला लाल फळं दान करा. कुंभ (Aquarius) : ऑफिसमधल्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला आणि सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतींत चांगली परिस्थिती असेल. कामाच्या ऑप्टिमायझेशनमध्ये वाढ होईल. शिस्त आणि व्यवस्थापन वाढवा. आयुष्यात नव्या अचीव्हमेंट्स असतील. बिझनेसमध्ये प्रगती होईल. कामाची गती चांगली असेल. उपाय : दुर्गामातेला मिठाई अर्पण करा. मीन (Pisces) : करिअरशी संबंधित निर्णय घेण्यापूर्वी उच्चाधिकाऱ्यांकडून सल्ला घ्या. कोणालाही पैसे कर्जाऊ देऊ नका. पैसे अडकू शकतात. गुंतवणुकीच्या नावाखाली घोटाळा असू शकेल. जमीन-बांधकाम आदींमध्ये रस घ्याल. महत्त्वाची कामं वेळेवर पूर्ण करा. उपाय : सुंदरकांडाचं पठण करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.