आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (3 डिसेंबर 2022) राशिभविष्य
मेष (Aries) : बिझनेसच्या ऑफिसमध्ये एखाद्या कर्मचाऱ्याकडून काही अडथळे आणले जाण्याची शक्यता आहे; मात्र तुम्ही समस्या सोडवू शकाल. तुम्ही केवळ तुमच्या रागावर आणि अति आत्मविश्वासावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. नोकरीतही कामाकडे दुर्लक्ष झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांचा क्रोध ओढवून घ्यावा लागेल.
उपाय : पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा.
वृषभ (Taurus) : तुमच्या बिझनेस अॅक्टिव्हिटीज गुप्त राहतील याची काळजी घ्या. अन्यथा कोणी तरी त्याचा चुकीचा वापर करून तुम्हाला त्रास देऊ शकतं. ऑफिसमध्ये हवे असलेले बदल होऊन नोकरदार व्यक्तींना दिलासा होईल.
उपाय : भगवान श्रीकृष्णाची पूजा करा.
मिथुन (Gemini) : तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या उत्पादनाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. चुकीमुळे एखादी मोठी ऑर्डर हातून जाऊ शकते किंवा डील रद्द होऊ शकतं. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्तींवर एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते.
उपाय : पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा.
कर्क (Cancer) : इतर कामांमुळे बिझनेसचं काम टाळू नका. बिझनेसमध्ये नव्या संधी असू शकतात; मात्र संधी गमावू नका. अन्यथा तोटा होईल. पार्टनरशिपशी संबंधित वाद सोडवले जातील. नातेसंबंध पुन्हा चांगले होतील.
उपाय : मुंग्यांना पीठ खाऊ घाला.
सिंह (Leo) : बिझनेसमधली अंतर्गत यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांशी योग्य समन्वय राखा. रखडलेल्या कामांमध्ये नोकरदार व्यक्तींना अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळालं, तर समस्या सोडवल्या जाऊ शकतात.
उपाय : श्री गणेशाला मोदक अर्पण करा.
कन्या (Virgo) : आज तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये नफा मिळेल. अचानक मोठी ऑर्डर मिळणं अधिक नफ्याचं ठरेल. बिझनेस करणाऱ्या महिलेला तिच्या बिझनेसमध्ये चांगलं स्थान प्राप्त होईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल.
उपाय : शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा.
तूळ (Libra) : व्यग्रतेमुळे तुम्हाला तुमच्या बिझनेसवर लक्ष देणं शक्य होणार नाही; मात्र घरी राहूनही बिझनेस अॅक्टिव्हिटीजची अंमलबजावणी होऊ शकते. क्रिएटिव्ह आणि माध्यमांशी निगडित बिझनेस महत्त्वाची अचीव्हमेंट करू शकतात. सहकारी आणि कर्मचाऱ्यांवर विश्वास ठेवण्यामुळे बिझनेसमधला नफा वाढेल.
उपाय : सरस्वती मातेची पूजा करा.
वृश्चिक (Scorpio) : बिझनेसमध्ये तुम्हाला अशी फायद्याची माहिती मिळेल, की जिची तुम्ही अपेक्षाही केली नव्हती. गुंतवणुकीशी संबंधित एखादं महत्त्वाचं प्रपोझल येईल. सरकारी नोकरीत असलेल्या व्यक्ती ऑफिसमध्ये वर्चस्व गाजवत राहतील.
उपाय : शिवचालिसा पठण करा.
धनू (Sagittarius) : बिझनेसच्या कामासाठी वेळ अनुकूल आहे. इन्शुरन्स आणि पॉलिसीशी संबंधित बिझनेसमध्ये नफ्याची स्थिती असेल. पार्टनरशिपच्या कामामध्ये तुमचे निर्णय फायद्याचे ठरतील. नोकरदार व्यक्तींसाठी प्रगतीचा प्रवास शक्य आहे.
उपाय : हनुमान चालिसा पठण करा.
मकर (Capricorn) : कामाच्या ठिकाणी आव्हानं येऊ शकतात. अधिक कष्ट करावे लागतील. अतिरिक्त स्पर्धेमुळे ताण असेल; मात्र तुम्ही यश प्राप्त करू शकाल. इंटरनेटशी संबंधित बिझनेसमध्ये नफ्याची स्थिती तयार होत आहे.
उपाय : शिवचालिसा पठण करा.
कुंभ (Aquarius) : कामाच्या ठिकाणी अंतर्गत व्यवस्था चांगली असेल. सहकारी मन लावून काम पूर्ण करतील. तुमची बुद्धिमत्ता आणि शहाणपणा यांच्या साह्याने तुम्ही महत्त्वाचं काँट्रॅक्ट मिळवू शकाल. नोकरीत उद्दिष्टपूर्ती करणं हे कष्टांच्या साह्याने नक्की शक्य आहे.
उपाय : पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा.
मीन (Pisces) : आज तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये नफा मिळेल. उत्पन्न वाढू शकेल. बिझनेसमध्ये कमिशन आणि टॅक्सशी संबंधित कामांमध्ये आज तुम्हाला नफा मिळू शकेल. नोकरदार व्यक्तींच्या सोयीनुसार काम पूर्ण होऊ शकेल.
उपाय : योगासनं, प्राणायाम करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya