जाहिरात
मराठी बातम्या / राशीभविष्य / दैनंदिन राशिभविष्य : वैवाहिक, कौटुंबिक, गृहसौख्य लाभेल; या एका राशीचा मात्र जोडीदारासोबत होईल वाद

दैनंदिन राशिभविष्य : वैवाहिक, कौटुंबिक, गृहसौख्य लाभेल; या एका राशीचा मात्र जोडीदारासोबत होईल वाद

राशिभविष्य.

राशिभविष्य.

तुमच्या राशीत आज काय आहे पाहूया आजचे राशी भविष्य.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2022. वार रविवार. आज कार्तिक वद्य पंचमी. चंद्र आज मिथुन राशीत आहे. पाहूया आजचे राशी भविष्य. मेष तृतीय स्थानात आलेला चंद्र अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण करेल. गृहसौख्य मिळेल. मेहनत करून यश प्राप्त होईल. शुक्र आज विशेष खरेदीचे योग आणणार आहे. बरा दिवस. वृषभ धन स्थानात आलेला चंद्र शरीर स्वास्थ्य देणारा असून व्यय राहू अनेक खर्च व अडचणी देईल. स्वभावात तेज येईल. व्यवसायात त्रास होईल. संतती सुख मिळेल. दिवस उत्तम. मिथुन गुरू दशम स्थानात असून कार्य करण्यास तयार होईल. प्रवास, भेटीगाठी होतील. चंद्र राशी स्थानात आहे. घरामध्ये काम वाढेल. आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम. कर्क चंद्र व्यय स्थानात शनी जपून राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज व्यय स्थानात असून आर्थिक नुकसान व कार्यालयात विशेष घटना घडतील. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. दिवस उत्तम आहे. सिंह राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्र मंडळीपासून अनेक लाभ होतील. प्रकृती जपा. रवी बुध अधिकार प्राप्ती करून देतील. दिवस आर्थिक बाबतीत उत्तम. कन्या पंचम शनी आणि दशम चंद्र एकूण मध्यम फळ देतील. आर्थिक नुकसान संभवते. डोळ्यांची काळजी घ्या. एकूण थोडी निराशा वाटेल. पण फारसा त्रास करून घेऊ नका. दिवस मध्यम. तूळ आज दिवस उत्तम असून भाग्य साथ देईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल. खर्च होईल व्यवसाय आणि वैवाहिक जीवनासाठी शुभ दिवस आहे. वृश्चिक आज दिवस मध्यम आहे. गृह सौख्य, जोडीदार, संतती याबाबत मिश्र फळ देईल. मित्र भेट घडवेल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस चांगला आहे. धनु द्वितीय स्थानात वक्री शनी कुटुंबात मतभेद घडवून आणेल. लांबचे प्रवास योग येतील. भाग्योदय होईल. साहसी स्वभाव होईल. आनंदात दिवस घालवा. मकर आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ चंद्र मिथुन राशीत असून भावंडांची काही काळजी राहील. कौटुंबिक समारंभ होतील. वैवाहिक सुख मिळेल. दिवस उत्तम. कुंभ व्यय स्थानामध्ये शनी आहे. अचानक स्वभावात बदल होईल. प्रवास योग येतील. कार्य करण्याची इच्छा होईल. रवी बुध कार्य घडवून आणेल. आर्थिक घडामोडी होतील. दिवस मध्यम आहे. मीन चतुर्थ स्थानात चंद्र आणि राशीतील गुरू अशी ग्रहस्थिती लाभ आणि कौटुंबिक सुख दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील. आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम. शुभम भवतू!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात