पुणे, 14 जून: आज मंगळवार दिनांक 15 जून 2021. तिथी ज्येष्ठ शुद्ध पंचमी. दैनंदिन राशीभविष्याबरोबर आजपासून रोज एका राशी बद्दल, राशींच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडे अधिक जाणून घेऊ या. आज पहिली रास अर्थात मेष किंवा Aries बद्दल.. काल पुरुषाच्या कुंडलीतील ही प्रथम रास मेष. अग्नी तत्त्व, पुरुष, चर, शुभ रास. स्वामी मंगळ. या राशीचे चिन्ह मेंढा हे असून तेजस्वी व्यक्तिमत्त्व, आग्रही महत्त्वाकांक्षी असलेल्या व्यक्ती असतात. राशीचा अंमल डोक्यावर असतो. उतावळेपणा, चंचल, रागीट स्वभाव असतो. डोळे तीक्ष्ण, वर्ण लालसर, मध्यम-उंच बांधा असतो. कुठल्याही अडचणी वर मात करू शकतात. या राशीत शनी निच असतो. मंगळ व रवि अत्यंत शुभ मानले जातात. ओम अं.अंगारकाय नम: हा जप करणे फायद्याचे ठरते. उद्या पुढच्या राशीविषयी आणि राशीच्या व्यक्तिमत्त्वाविषयी. पुढे वाचा आजचं बारा राशींचं भविष्य.. मेष आज चंद्राचे भ्रमण कर्क राशीत होणार असून दिवस उत्तम आहे. घरासंबंधी काही निर्णय घ्या. अचानक घरातल्या वस्तूंची दुरुस्ती निघेल. त्यासाठी खर्च करावा लागेल. पराक्रमाची वाढ होईल. वृषभ राशी स्वामी शुक्र अणि धनस्थानाचा स्वामी बुध हे अन्योन्य योगात आहेत. चैनीसाठी, सजावटीसाठी खर्च करण्याची इच्छा असेल. एखाद्या समारंभाचे निमंत्रण येईल. दिवस शुभ असून हातून चांगले कर्म होईल. मिथुन राशीत होणारे सूर्य भ्रमण शनीशी षडाष्टक करेल. वडिलांचे आरोग्य सांभाळा. शुक्र सहयोग शुभ फळ देणारे आहेत. व्यक्तिमत्त्व तेजस्वी होईल. गोड शब्द बोला. शत्रूवर विजय नक्की आहे. कर्क आज दिवसभर तुमच्या राशीत असलेला चंद्र मंगळ योग आर्थिक बाजू सांभाळेल. आनंदात दिवस घालवा. फक्त राग आवरा. व्ययात येणारा सूर्य डोळ्यांची काळजी घ्या. असे सुचवतो. खर्च करण्याची इच्छा होईल. सिंह दिवसभर व्ययातून भ्रमण करणारे चंद्र मंगळ शनिच्या प्रति योगात असतील. थोडे सांभाळून राहण्याचे ग्रहमान आहे. आर्थिक, शारीरिक व्यय होण्याचे संकेत. पण गुरु पाठीशी आहे. फार काळजी नको. कन्या राशीच्या दशमात येणारा सूर्य कार्य क्षेत्रात प्रसिद्धी. नवीन संधी मिळवून देईल. लाभ होतील. प्रकृती चांगली राहील. मित्र मैत्रिणींना भेटायला सुंदर दिवस. तुला भाग्य स्थानातील ग्रहांची उपस्थिती तुम्हाला उत्तम भाग्य देणार आहे. परिश्रमाचे फळ नक्की मिळेल. दशमातील चंद्र मंगळ नवीन नवीन संधी मिळवुन देतील. फक्त काही विकार त्रास देत असतील तर दुर्लक्ष करू नका. वृश्चिक आज दिवस मध्यम जाईल .राशीच्या अष्टमात आलेले सुर्य शुक्र प्रकृतीची काळजी घ्या असे सांगतात. एनर्जी थोडी कमी राहील. दगदग करू नका. पण गृहसौख्य, भाग्य उत्तम राहील. धनु आज धनु राशीच्या व्यक्तीनी जपून राहावे. वाहन, अग्नीपासून सावध. जोडीदाराची अडचण त्वरित सोडवा. काही विशेष धाडस करायला जाऊ नका. व्ययातील केतू तुम्हाला साधनेची आवड निर्माण करेल. मंगळ जप करा. मकर समसप्तक योगात आलेले चंद्र मंगळ योग जोडीदाराशी विशेष चर्चा घडवतील. दोघं मिळून काही निर्णय घ्याल. प्रकृती सांभाळा. शनी उपासना करत रहा. दिवस चांगला जाईल. कुंभ आज कोणी तुमच्या वाटेला जाणार नाही. शत्रू वर कुरघोडी करणारच. गुरु महाराज तुमच्या बुद्धी चा उत्तम वापर करून घेतील. मन विचारी बनेल. मुलांकडे नीट लक्ष द्या. शनी जप करा. मीन गृह सजावट, उत्तम अभिरुची पुर्ण खरेदी, मुलांची काही तयारी, त्याचे प्लॅनिंग असा हा दिवस आहे. एकूण कुटुंब ही साध्या तुमची प्राथमिकता असेल. आनंदी रहा. गुरु उपासना करा. दिवस उत्तम. शुभम भवतु!! (लेखिका पुणेस्थित ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासक आहेत.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.