मुंबई, 08 फेब्रुवारी : ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत उपस्थित असलेले 9 ग्रह माणसाच्या जीवनावर परिणाम करतात. ग्रहांच्या स्थितीचा परिणाम माणसाच्या प्रत्येक क्रियेवर होत असतो. जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत येतात तेव्हा त्याला ग्रहांचा संयोग म्हणतात. वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्य हा आत्म्याचा कारक मानला जातो आणि गुरू हा ईश्वराचा कारक मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा या दोन ग्रहांचा संयोग होतो तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो.
सूर्य आणि गुरूच्या संयोगाने काही राशींना फायदा होतो आणि काही राशींना त्रासही होतो. या वेळी 2023 मध्ये सूर्य आणि गुरू 12 वर्षांनंतर मेष राशीत एकत्र येणार आहेत. 14 एप्रिल 2023 रोजी सूर्य आणि 22 एप्रिल 2023 रोजी गुरु मेष राशीत प्रवेश करेल. अशा प्रकारे 22 एप्रिल रोजी दोन्ही ग्रहांची युती/संयोग होईल. कोणत्या राशीच्या लोकांना या स्थितीचा फायदा होईल, जाणून घेऊया भोपाळचे ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना सूर्य आणि गुरूच्या संयोगाने लाभ होईल. कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल. कर्क राशीच्या दहाव्या घरात सूर्य आणि गुरूचा संयोग होणार आहे. असे झाल्याने कर्क राशीच्या लोकांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतील. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल. कोर्ट कचेरीशी संबंधित प्रकरणांमध्येही विजय मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि उधळपट्टी थांबेल.
सिंह
सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरूच्या संयोगाचा फायदा होणार आहे. सिंह राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग नवव्या भावात असेल, या दरम्यान सिंह राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल. जीवनात सकारात्मकता येईल. परदेशात जाण्याचे किंवा नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते प्रत्यक्षात येऊ शकते. या दरम्यान सिंह राशीच्या लोकांना ते जे काही काम हाती घेतील त्यात फायदा होईल. काही काम दीर्घकाळापासून रखडले असेल तर तेही पूर्ण होईल.
मीन
मीन राशीच्या दुसऱ्या घरात सूर्य आणि गुरूचा संयोग होणार आहे. मीन राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि गुरूचा संयोग फायदेशीर ठरेल. मीन राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारेल. जीवनात यश आणि समृद्धी येईल, अचानक आर्थिक परिस्थिती ठीक राहील पैशात वाढ होईल. तुम्ही तुमच्या संभाषणातून इतरांना प्रभावित करू शकाल.
हे वाचा - सोमवारी उपवास करण्याऱ्यांनी या चुका टाळा; महादेवाची कृपा नव्हे होईल अवकृपा
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.