Home /News /astrology /

Shani vakri 2022 : पैसा, यश आणि बरंच काही...; या 3 राशींवर पुढील 2 वर्षे शनिदेवाची कृपा राहणार

Shani vakri 2022 : पैसा, यश आणि बरंच काही...; या 3 राशींवर पुढील 2 वर्षे शनिदेवाची कृपा राहणार

सुमारे 30 वर्षांनंतर शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. शनीचं भ्रमण सर्व राशींवर निश्चितच परिणाम करेल. परंतु तीन राशींवर मात्र शनी महाराजांची विशेष कृपादृष्टी राहणार आहे.

मुंबई, 09 जून : ज्योतिषशास्त्रात (Jyotish Shastra) नवग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. या सर्वांचा मानवी जीवनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होतो, असं अभ्यासकांचं मत आहे. ठरावीक कालावधीनंतर नवग्रह राशिपरिवर्तन (Transit) करतात. नवग्रहांमध्ये शनी (Shani) हा ग्रह मंद गतीने भ्रमण करतो. शनी सुमारे अडीच वर्षांनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. शनी सध्या कुंभ (Aquarius) या स्व-राशीतून भ्रमण करत आहे. सुमारे 30 वर्षांनंतर शनीने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. 5 जून 2022 रोजी शनी कुंभ राशीत वक्री (Retrograde) झाला आहे. कुंभेतलं शनीचं भ्रमण सर्व राशींवर निश्चितच परिणाम करेल. परंतु, तीन राशींवर मात्र शनी महाराजांची विशेष कृपादृष्टी राहणार आहे. कुंभेतल्या गोचर कालावधीत मेष, वृषभ आणि धनू राशीच्या जातकांना विशेष शुभ फलप्राप्ती होईल, असं अभ्यासकांचं मत आहे. शनी हा ग्रह सध्या कुंभ राशीत वक्री आहे. येत्या काही महिन्यांत शनी पुन्हा मकर (Capricorn) या स्वराशीत वक्री राहणार आहे. त्यानंतर पुन्हा शनी महाराज कुंभ राशीत प्रवेश करतील. त्यामुळे 2024 पर्यंतचा कालावधी सर्वच राशींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे; मात्र त्यातही मेष, वृषभ आणि धनू या तीन राशींसाठी हा कालावधी विशेष फलदायी ठरणार आहे, असं वृत्त झी न्यूज हिंदीने दिलं आहे. हे वाचा - SuryaParivartan: सूर्यदेव मिथुन राशीत करतायत प्रवेश; या 3 राशीच्या लोकांचे भाग्य चमकणार मेष (Aries) : मेष रास आणि मेष लग्न असलेल्या अशा दोन्ही जातकांसाठी शनीचं हे गोचर भ्रमण खूप लाभदायी ठरेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरदार व्यक्तींचा पगार आणि व्यावसायिकांचा नफा वाढेल. व्यावसायिकांना उत्तम व्यवसाय मिळू शकेल. नव्या मार्गानं उत्पन्न सुरू होईल. जॉब बदलण्यासाठी इच्छुक असलेल्यांना नवा जॉब मिळेल. निळं रत्न धारण करून शनीशी संबंधित उपाय केल्यास लाभ वाढू शकतो. वृषभ (Taurus) : वृषभ रास आणि वृषभ लग्न असलेल्या जातकांसाठी 2024 पर्यंतचा कालावधी उत्तम राहील. या कालावधीत शनी कर्मस्थानातून गोचर करणार आहेत. त्यामुळे करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. करिअरमधले सर्व अडथळे दूर होतील. एकामागून एक संधी मिळतील. मान-सन्मान, प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिकांना लाभ मिळेल. नव्या संकल्पनांवर काम करून मोठा लाभ मिळवू शकाल. हे वाचा - महिलांनो, तुमच्याही अंगावर `ही` चिन्हं असतील तर व्हाल यशस्वी; तुमच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही धनू (Sagittarius) : शनीचं गोचर धनू रास आणि धनू लग्न असलेल्या जातकांसाठी अगदी वरदान ठरेल. धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे प्रत्येक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सन्मान मिळेल. व्यापारी वर्गाचं कामकाज सुरळीत चालेल. शत्रूवर विजय प्राप्त कराल. (सूचना - या लेखात दिलेली माहिती सर्वसामान्य ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या