मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /कुंभ राशीत शनीचा होणारा अस्त अडचणी वाढवणार! या 3 राशीच्या लोकांसाठी जिकीरीचे दिवस

कुंभ राशीत शनीचा होणारा अस्त अडचणी वाढवणार! या 3 राशीच्या लोकांसाठी जिकीरीचे दिवस

शनीचा कुंभ ग्रहात अस्त

शनीचा कुंभ ग्रहात अस्त

शनीची स्थिती काही राशींसाठी धोक्याची घंटा देखील ठरू शकते. शनीच्या अस्तामुळे कर्क राशीसह तीन राशींना सतर्क राहण्याची गरज आहे. या राशीच्या लोकांसाठी धनहानी होण्याचीही शक्यता आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 10 जानेवारी : जानेवारी महिन्यातील 17 तारखेला शनीचे राशी परिवर्तन होणार आहे, त्यानंतर 30 जानेवारी रोजी शनिदेव कुंभ राशीत आपल्या घरी अस्त करत आहेत. याआधी 17 जानेवारीला कुंभ राशीत शनीचे संक्रमण होणार आहे. या शनीच्या राशी बदलाचा सर्व राशींवर परिणाम होईल, शनीची स्थिती काही राशींसाठी धोक्याची घंटा देखील ठरू शकते. शनीच्या अस्तामुळे कर्क राशीसह तीन राशींना सतर्क राहण्याची गरज आहे. या राशीच्या लोकांसाठी धनहानी होण्याचीही शक्यता आहे. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्णकुमार भार्गव यांनी शनिच्या संक्रमणाचा कोणत्या राशींवर परिणाम होणार याविषयी दिलेली माहिती जाणून घेऊया.

शनि अस्ताचा राशींवर प्रभाव

कर्क: शनीच्या अस्तामुळे कर्क राशीच्या लोकांसाठी करिअर, आरोग्य आणि घराच्या आघाडीवर अनेक आव्हाने येतील. तुम्हाला सतर्क राहावे लागेल. तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा नोकरी करत असाल तर तुम्हाला गुंतवणुकीचे निर्णय काळजीपूर्वक घ्यावे लागतील.

कामही सावध राहूनच करावे लागेल, कारण या काळात तुमची धनहानी होण्याची शक्यता आहे. या काळात, आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या जोडीदाराशी वाद टाळा, अन्यथा मानसिक तणावामुळे तुम्हाला समस्या येऊ शकतात. या काळात कोणालाही कर्ज देऊ नका.

सिंह: सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे आणि सूर्य शनीचे जमत नाही. शनीचा अस्त तुमची आर्थिक स्थिती डळमळीत करू शकतो, तुम्ही उधळपट्टीवर नियंत्रण ठेवले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. आर्थिक संकटात अडकू शकता.

अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करावे लागेल. शनीच्या अस्तामुळे तुमचे प्रेम जीवन किंवा वैवाहिक जीवन प्रभावित होऊ शकते. या काळात तुम्ही नवीन काम सुरू न करणे चांगले राहील.

वृश्चिक : शनीचा अस्त वृश्चिक राशीच्या लोकांना सावध करणार आहे. तुमच्या राशीच्या लोकांनी या काळात कुणालाही पैसे देऊ नयेत कारण ते पैसे बुडण्याची दाट शक्यता असते. तुम्हाला ते पैसे परत मिळणार नाहीत.

शनिदेवाच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या आईचे आरोग्य बिघडू शकते. आईची काळजी घ्या. शनि संक्रमणाचा प्रभाव तुमच्या करिअरवरही दिसून येईल. तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची संधी मिळेल, परंतु काही कारणास्तव प्रकरण अडकू शकते.

शनि रक्षा कवच पाठ -

ज्या लोकांवर शनिदेवाचे जास्त दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे, अशा लोकांनी शनी रक्षा कवचचे पठण करावे. याआधी शनिदेवाची विधिवत पूजा करावी, त्यानंतरच शनि रक्षा कवच पठण करावे.

हे वाचा - या 2 दिवशी घरात अगरबत्ती न लावलेलीच बरी! भोगावे लागतील हे अशुभ परिणाम

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Horoscope, Rashibhavishya