आज दिनांक 11 डिसेंबर 2022. वार रविवार. आज चंद्र मिथून राशीत आहे. आज मार्गशीर्ष वद्य चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. अत्यंत पवित्र अश्या ह्या दिवसाच्या सर्व भाविकांना मंगल शुभेच्छा. या सप्ताहात गुरू मीनेत असून शनी मकर राशीत मार्गी झाला आहे. बुध, शुक्र, धनु राशीत आहेत. केतू तूळ राशीत असून राहू मेष राशीत भ्रमण करीत आहे. मंगळ वृषभ राशीत तर रवी वृश्चिक राशीत असून या सप्ताहाच्या सुरुवातीला चंद्र स्वगृही कर्क राशीत असून उत्तम फळ देईल. धनदायक अश्या या ग्रहस्थितीनुसार पाहूया साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी स्वामी मंगळाचा राशी बदल धन स्थानात झाला असून कुटुंबाकडून मदत मिळेल. गुरू लाभाचे अनेक मार्ग मोकळे करतील. बुध शुक्र महालक्ष्मी योग व्यावसायिक, धार्मिक बाबीसाठी उत्तम सिद्ध होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. रवी अधिकारी वर्गाची भेट होईल असे सुचवत आहे. प्रवास योग आनंद देतील. सप्ताह उत्तम फळ देईल. वृषभ भाग्य स्थानातील शनी मार्गी अवस्थेत असून बदलाचा काळ येणार आहे. अचानक एखादी नवीन संधी चालून येईल. ज्यात तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. नाव होईल. आनंद देणारा हा काळ आहे. व्यय राहू आणि केतू तसेच राशीतील मंगळ आरोग्य सांभाळा, असे संकेत देत आहे. भाग्यातील ग्रहामुळे काही मोठ्या पूजा वगैरे होतील. वडीलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. रवी अधिकारी वर्गाकडून लाभ मिळवून देईल. प्रकृती जपून रहा. तृतीय चंद्रामुळे पूर्वार्ध प्रवासात जाईल. सप्ताह उत्तम. मिथुन राशी स्वामी बुध सप्तम स्थानात शुक्रसोबत आहे. अधिकार प्राप्ती. प्रमोशन, अकल्पित लाभ असा हा काळ आहे. गुरू नोकरीत लाभ घडवील. प्रकृतीची तक्रार आता कमी होईल. अष्टम शनी नवीन संकटे आणू शकतो. मात्र धन स्थानातील चंद्र जोरदार आर्थिक लाभ करून देईल. उत्तरार्ध अनुकूल असून उपासना करा. कर्क राशीच्या भाग्य स्थानात गुरू असून तुम्हाला दैव आणि अधिकारी वर्ग मदत करेल. प्रमोशनचे योग येतील. आर्थिक लाभ होतील. जोडीदारसाठी त्रासदायक काळ आहे. प्रकृती सांभाळा. या काळात शिधा दान करा. प्रवास टाळणे योग्य राहील. दशम स्थानात आलेला राहू स्थान बदल करेल. गुरू बल असल्यामुळे आनंदी राहाल. शनी सप्तम आहे. व्यवसाय धंद्यात काळजी घ्या. सप्ताह चांगला जाईल. सिंह राशी स्वामी रवी चतुर्थ स्थानात असून अधिकारी वर्ग त्रास देईल. बढतीचे योग लंबतील. शनी कुटुंबात ताण पसरवेल. काही आर्थिक बाबतीत त्रास होतील असं सुचवत आहेत. नातेवाईकांना, मित्रांना भेटण्यासाठी संधी येईल. राहू मन अस्थिर ठेवेल. व्यय चंद्र असल्यामुळे सप्ताह मध्यम जाईल. कन्या राशी स्वामी बुध चतुर्थ स्थानात स्वतःची व जोडीदाराची भरभराट होईल. त्यांना अधिकार मिळेल. व्यवसाय धंद्यात चांगला लाभ होईल. संतती चिंता कमी होईल. गुरू महाराज शुभ फल देतील. मधुमेही व्यक्तींनी जपून रहा. आठवा राहू काही त्रास होण्याची शक्यता दाखवतो. काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. पंचम शनी मार्गी आहे. संतान चिंता कमी होईल. सप्ताह मध्यम जाईल. तूळ राशी स्वामी शुक्र तृतीय स्थानात असून बुधासोबत शुभ योग करेल. शनी चतुर्थ स्थानात वास्तू घेण्यासाठी उत्तम काळ. घर आणि वाहन खरेदी कराल. आर्थिक गणित जुळून येतील. रवी नवीन नोकरी मिळण्यासाठी उत्तम आहे. आर्थिकदृष्ट्या बरा काळ. अष्टम मंगळ आहे मन अस्वस्थ राहील. चंद्र भरामानानुकुल आहे. सप्ताह उत्तम. वृश्चिक राशी स्वामी मंगळ सप्तम स्थानात असून पुढील काही दिवस सावध राहण्याचे आहेत. शनी तृतीय स्थानात पराक्रम वृद्धी करेल. प्रवास संबंधी शुभ सूचना देईल. गृह कलह टाळा. संततीकडे लक्ष द्या. त्यांना उत्तम काळ आहे. या काळात काही समस्या निर्माण होतील. चंद्र जोडीदाराला उत्तम असून सप्ताह शुभ जाईल. धनु राशी स्वामी गुरू चतुर्थात असून घरामध्ये सुधारणा करील. प्रवास योग आणेल. भावंडाना शुभ फळ देईल. वाहन खरेदी होईल महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. व्यवसायात काही बदल कराल. नवीन वास्तूयोग येतील. ह्या काळात काही नवीन सुरुवात करू शकता. सप्ताह सर्व तऱ्हेने शुभ संकेत देईल. आर्थिकदृष्ट्या भक्कम राहील. मकर शनी आता मार्गी असून एक मोठा बदल घडून येईल. सप्ताहात मंगळ वृषभ राशीत असून संततीसाठी खर्च मोठ्या प्रमाणात होतील. तसेच जोडीदाराला त्रास देखील होतील. गुरू प्रवास योग आणेल. संततीकडे लक्ष द्या. चतुर्थ राहू स्थान बदलाचे योग आणेल. सप्ताह शुभ आहे. कुंभ व्यय शनी सावध राहण्याचे संकेत देत आहे. स्वभाव उग्र होईल. जोडीदाराशी जपून रहा. गैरसमज करू नका. आर्थिक बाजू भक्कम राहील. मंगळ चतुर्थ स्थानात उष्णतेचे विकार होतील. प्रकृती जपून राहा. उत्तम वस्तूंची खरेदी होईल. घरामध्ये शुभ कार्य होण्याचे संकेत आहेत. सप्ताह आनंदात जाईल. मीन गुरू महाराज राशी स्थानात आहेत. खर्च, चैनीच्या वस्तूची खरेदी होईल. पूर्वार्ध नवीन संधी मिळतील. जोडीदाराची भरभराट होईल. मंगळ पराक्रमात वाढ करेल. बुध शुक्र अधिकार हानी करतील. प्रकृती जपा. संतती सुख मिळेल. अचानक अर्थ प्राप्ती होईल. सप्ताह आनंदात साजरा कराल. शुभम भवतू,!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.