जाहिरात
मराठी बातम्या / राशीभविष्य / Sankashti Chaturthi Horoscope : या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला काय फळ मिळणार; पाहा आजचं राशिभविष्य

Sankashti Chaturthi Horoscope : या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला काय फळ मिळणार; पाहा आजचं राशिभविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज आहे मार्गशीर्ष वद्य चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

आज दिनांक 11 डिसेंबर 2022. वार रविवार. आज आहे मार्गशीर्ष वद्य चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. आज चंद्र मिथुन राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्र कौटुंबिक क्षेत्रात आस्था निर्माण करेल. मतभेद होउ देऊ नका. भाग्य स्थानात आलेला शुक्र बुध योग आर्थिक घडामोडी करेल. दिवस शुभ. वृषभ नवम स्थानात शनी कार्यक्षेत्रात एखाद्या व्यक्तीमुळे मनस्ताप दाखवत आहे. एक प्रकारचा अडथळा प्रत्येक कामात येईल. प्रवास योग येतील. गृहसौख्यात अडथळा. दिवस बरा. मिथुन मिथुन लग्न आणि रास असलेल्या व्यक्तींनी दशम गुरूचा उत्तम काळ अनुभवावा. मंगळ जोरदार कार्यशक्ती देईल. शुक्र उत्तम आहे. शुक्र बुध योग दूरदृष्टी देईल. राशीतील चंद्र मानसिक क्लेश देतील. दिवस उत्तम. कर्क राशीच्या सप्तमात शनी व्यय चंद्र वैवाहिक जीवनात कष्ट देईल. प्रकृती सांभाळा. कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिक, सामाजिक लाभ मिळेल. दिवस चांगला. सिंह आजचे चंद्र भ्रमण लाभ स्थानात आहे. धार्मिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. काळ सावधगिरीने राहण्याचा आहे. आर्थिक भरभराट होईल. घराकडे विशेष लक्ष द्या. मध्यम दिवस. कन्या दशम स्थानात होणारे चंद्र भ्रमण कौटुंबिक आणि सामाजिक लाभ असे संकेत देत आहे. अष्टमात राहू आहे. स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. चतुर्थ स्थानात शुक्र शुभ घटनांची सुरुवात करेल. दिवस उत्तम. तूळ गृह कलह, घरात मोठ्या दुरुस्त्या, खर्च असा हा काळ आहे. आर्थिक व्यय होईल. जोडीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. शुक्र खर्च वाढ करेल. दिवस आनंदी राहील. वृश्चिक संतती तुमच्यावर नाराज होईल. त्यांना काही समस्या येतील. भावंडांशी बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. प्रवास टाळा. आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम. धनु चंद्र आज उत्कृष्ट फळ देईल. मात्र शनी आर्थिकदृष्ट्या सांभाळून राहावं असं सांगत आहे. नोकरीमध्ये बाढतीचे योग. कुटुंबात काही समस्या निर्माण होतील. सावध राहा. दिवस बरा. मकर सर्वार्थाने जागरूक राहण्याचा काळ आहे. मंगळ, चतुर्थ राहू कुठल्याही कामात अडथळे आणतील. भांडणतंटा होऊ नये म्हणून सावध रहा. प्रवास योग येतील. वैवाहिक जीवन बरे राहील. दिवस मध्यम. कुंभ राशीच्या पंचम स्थानात चंद्र म्हणजे शिक्षण, परदेश गमन, कौटुंबिक जीवनात ताण राहील. दवाखान्याची भेट संभवते. तृतीय राहू महत्त्वाचे निरोप आणेल. दिवस उत्तम. मीन चतुर्थ चंद्र नुकसानीपासून सावध रहा असं सांगत आहे. संतान चिंता वाटेल राशीतील गुरू अचानक आर्थिक लाभ देतील. मन धार्मिक क्षेत्राकडे झुकेल. दिवस शुभ. शुभम भवतू.!!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात