मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /राशीभविष्य: या राशींसाठी आहे आजचा दिवस शुभ, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

राशीभविष्य: या राशींसाठी आहे आजचा दिवस शुभ, जाणून घ्या 12 राशींचे भविष्य

आज सोमवार दिनांक 23 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण कृष्ण प्रतिपदा. वाचा तुमच्या राशीचं भविष्य

आज सोमवार दिनांक 23 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण कृष्ण प्रतिपदा. वाचा तुमच्या राशीचं भविष्य

आज सोमवार दिनांक 23 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण कृष्ण प्रतिपदा. वाचा तुमच्या राशीचं भविष्य

आज सोमवार दिनांक 23 ऑगस्ट 2021. तिथी श्रावण कृष्ण प्रतिपदा. दिवसभर चंद्राचे भ्रमण कुंभ राशीतून राहील.

जाणून घेऊया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज दिवस लाभ देणारा असून गुरू चंद्र शुभ योगाची फळे मिळतील. मन आनंदी राहील. पंचमातील मंगळ चंद्र संततीसाठी शुभ. मित्र मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. तुमचा नाव लौकिक वाढेल. शुभ दिवस.

वृषभ

आज तुम्ही आपल्या कामात रमणार आहात. धाडसाने काही निर्णय घ्याल. तुमचे  वरिष्ठ कौतुक करतील. आर्थिक बाजू ठिक राहील. प्रकृती पण चांगली राहील. घरातील व्यक्तींना वेळ द्या. दिवस शुभ आहे.

मिथुन

भाग्य स्थानात गुरू चंद्र, तुम्हाला  खूप सुखद अनुभव देणार आहेत. प्रवास, कार्य सिद्धीस जाईल.  सिंह रवि आणि कुंभ  गुरू प्रति योग करीत आहेत. प्रतिष्ठा  वाढेल. आनंदी काळ. दिवस  शुभ आहे.

कर्क

आज काही नवीन गूढ शास्त्राचे वाचन किंवा अभ्यास करा. धनस्थानातील मंगळ व अष्टमात गुरू आध्यात्मिक प्रगती होईल. पण मन थोडे अस्वस्थ राहील. थकवा जाणवेल. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस मध्यम आहे. गुरु उपासना करावी.

सिंह

तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येणारा दिवस आहे. त्यासाठी थोडा खर्च करायला हवा. कार्यक्षेत्रातील बदल फायद्याचे ठरतील. व्यावसायिक निर्णय योग्य ठरतील. दिवस उत्तम आहे.

कन्या

षष्ठ स्थानातील गुरू चंद्र प्रकृती उत्तम ठेवतील. आज नोकरी व्यवसाय आणि त्यासंबंधी काही बोलणी असतील तर  यशस्वी होतील. नवीन संधी मिळतील. खरेदी होईल. दिवस चांगला जाईल.

तुला

पंचम स्थानातील गुरू चंद्र अतिशय शुभ असुन वैचारिक बैठक मजबूत करतील. उत्तम, लिखाण वाचन अभ्यास यासाठी आजचा दिवस फार चांगला आहे. मुले तुम्हाला आनंद देतील. शुभ दिवस..

वृश्चिक

आज  वृश्चिक राशीचे लोक  घरात रमतील. उत्तम सजावट ,घरात काही विशेष  पुजा यात मन रमेल. आर्थिक बाजू चांगली. आरोग्य ही साथ देईल. अनावश्यक खर्च टाळा. दिवस चांगला आहे.

धनु

महत्त्वाचा फोन, नोकरी साठी मुलाखत, छोटा प्रवास असा आजचा दिवस आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. वाहन अगदी जपून चालवा.  प्रकृतीकडे लक्ष द्या. दिवस  शुभ आहे.

मकर

आज अर्थ प्राप्तीचे योग आहेत. पुजा किंवा धार्मिक कार्य यासाठी खर्च होऊ शकतो. तुमच्या मनाचा कल अध्यात्माकडे वळेल. वाणी मधुर, कुटुंबाशी संबंध उत्तम असतील. तुमचा आर्थिक फायदा होणार आहे. दिवस शुभ.

कुंभ 

राशीतील गज केसरी योगातील गुरू चंद्र मान प्रतिष्ठा  वाढवणारे आहे. मन स्थिर,आनंदी राहील. मुलांबद्दल शुभ समाचार मिळतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. शनि उपासना करावी. दिवस उत्तम आहे

मीन

आज व्यय स्थानातील ग्रह  फारसा लाभ  मिळू देणार नाहीत. काही  धार्मिक खर्च  समोर उभे राहतील. राशी स्वामी गुरू चंद्रा सोबत असून दिवस  मार्गी  लावण्यास  मदत करतील. गुरु जप करावा.

First published:
top videos

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya