• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणतात; कुठल्या राशीच्या जोडीदाराशी पटेल वाचा..

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात म्हणतात; कुठल्या राशीच्या जोडीदाराशी पटेल वाचा..

महिला आपल्या EX बॉयफ्रेन्डला मनातल्या मनात आठवत असतात.

महिला आपल्या EX बॉयफ्रेन्डला मनातल्या मनात आठवत असतात.

तुमचा Soulmate कुठल्या राशीचा असेल? कुठल्या राशीच्या जोडीदाराबरोबर तुमचं मन खऱ्या अर्थाने जुळेल वाचा - कुंडली मीलनाची पहिली पायरी- राशीमीलन

  • Share this:
ज्योतिषशास्रानुसार काही जोडप्यांचं नातं हे अगदी त्यांची जोडी स्वर्गात जमल्यासारखंच असतं. त्यासाठी त्यांचे स्वभाव गुणधर्म जुळावे लागतात. आपल्या प्रत्येकाच्याच मनात एक जीवलग व्यक्ती असते तिच आपली आयुष्याची जोडीदार (Solemate) व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्यासाठी कुणीतरी प्राणसखा जगात आहे अशी आपल्याला खात्री असते आणि त्याला जेव्हा आपण भेटतो तेव्हा हे जगात आनंद भरून राहिलाय आणि आपल्या भवतालचं सारं विश्व सुंदर आहे असं आपल्याला वाटतं. प्राणसखा म्हणा किंवा जोडीदार. अनेकांना त्यांचा जोडीदार मिळून जातो आणि ते आनंदानी राहतात. पण काहींना मात्र तो मिळत नाहीत मग ते आपल्या योग्य जोडीदाराचा शोध घ्यायला लागतात. पण तुम्हाला असं वाटतं का की आपल्याशी मिळता-जुळता जोडीदार शोधणं हे एखाद्या खाद्यपदार्थाची रेसिपी (Recipe) जमून येण्यासारखं असतं? हो ही उपमा नक्कीच देता येईल एखादा पदार्थ करायची टॅक्ट जमली की कायमची जमून जाते. तसंच काहीसं लग्नाचं असतं एकदा तुम्हाला मनासारखा जोडीदार मिळाला की झालं जन्मजन्मांतरीचं नातं तयार होतं. हीच असते प्रेमाची रेसिपी (Recipe of love)! जरी एकमेकांवर प्रचंड प्रेम असलेलं, मनापासून आणि अगदी पॅशनेटली (Passionately)एकमेकांसाठी आपण बनलो आहोत असं म्हणणारं जोडपं (Couple) असलं तरीही ते काय प्रेमविवाहानंतर परस्परांचे उत्तम मॅच ठरतीलच असं सांगता येत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही सहजपणे राहू शकता, दररोजच्या आयुष्यातील नाटकं आणि भांडणं होऊनही तुम्ही ज्याच्याबरोबर अख्खं आयुष्य व्यतीत करू शकाल अशा व्यक्तीशी लग्न (Marriage) करणं कधीही चांगलं. सगळ्यात शेवटी काय लग्नाच्या जोड्या या स्वर्गात ठरलेल्या असतात असं म्हणतात तेच खरं. तुम्ही कुणाच्या प्रेमात असाल आणि जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल की ती व्यक्ती खरचं तुमच्या प्रेमात आहे की बहाणा करतीए तुम्ही तुमच्या आणि तिच्या राशीचा ज्योतिषशास्रातला (Astrology) ताळमेळ तपासू शकता. ज्योतिषशास्रानुसार तुमच्या राशीचं कुठल्या राशीच्या व्यक्तीशी लग्नासाठीचा संबंध उत्तम जुळेल हे सांगता येऊ शकतं. आपल्याकडे जसं लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतात अगदी तसा जोडीदार तुम्हाला या राशींच्या मार्गदर्शनातून मिळू शकतो. मग वाट कशाची बघताय मित्रांनो? जा आणि शोधा स्वर्गात ठरलेल्या म्हणतात तशा कुठल्या राशींच्या जोड्या असतात ज्या पृथ्वीवर अवतरतात आणि त्यातून तुम्हाला साजेसा जोडीदार मिळतो का बघा. मेष (Aries) – आगीशी खेळ राशिचक्रातल्या पहिल्या मेष राशीच्या व्यक्ती प्रचंड उत्साही आणि अमर्याद उर्जा असलेल्या तसंच सर्वोत्तमांत सर्वोत्तम होण्याची महत्त्वाकांक्षा उराशी बाळगणाऱ्या असतात. नरम दिलाच्या व्यक्तीनं मेष राषीच्या व्यक्तींना डेट करण्याचा प्रयत्नच टाळावा, सोप्या शब्दांत त्यांच्या नादीच लागू नये. अग्नितत्त्वाची रास असल्याने व्यक्तिमत्त्व पण आगीसारखंच असतं. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – मेषेच्या लोकांचं स्पष्टवक्त्या आणि संशोधक अशा मिथुन आणि कुंभ या वायुतत्त्वाच्या राशींशी उत्तम जमू शकतं. सिंह आणि धनु या अग्नितत्त्वाच्या राशी उत्साही असल्याने त्यांचंही यांच्याशी जमू शकतं. वृषभ (Taurus) : तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी माणसं वृषभ ही पृथ्वीतत्त्वाची रास आहे त्यांची सर्वांत महत्त्वाची ओळख म्हणजे कुठल्याही प्रश्नाची उकल प्रॅक्टिकल म्हणजे वास्तवाला धरून असलेल्या दृष्टिकोनातून करतात. कर्तव्यनिष्ठा, पाय जमिनीवर ठेवण्याची सवय आणि उत्तम वर्तणूक ही पण या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – पृथ्वीतत्त्वाच्या या राशीच्या लोकांचं जमतं ते जलतत्त्वाच्या कर्क आणि मीनयासरख्या राशींशी. कारण अगदी सरळ आहे पाणी जसं पृथ्वीचं पोषण करतं तसंच इथंही. वैवाहिक आयुष्य चांगलं जायचं असेल तर या राशींच्या जोड्या होणं फायद्याचं इतर पृथ्वीतत्त्वाच्या राशींसोबतही वृषभेच्या व्यक्तींचं जमतं. मिथुन (Gemini): सांभाळाव्या लागतात दोन्ही बाजू मिथुनेच्या व्यक्तीसोबत डेटिंग करणं म्हणजे रोलर कोस्टरची राईड केल्यासारखंच आहे. हा जीवनातला अद्वितीय अनुभव असतो. मिथुन राशीच्या चिन्हात दोन स्रिया आहेत त्यामुळे साहसी गोष्टी करणं आणि समाजात मिसळणं यासाठी कायम तयार असतात. माणसं जोडणं, लोकांशी बोलणं आणि संवाद साधणं यात त्यांचा हातखंडा असतो. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – इतर वायुतत्त्वाच्या राशी म्हणजे तुळ आणि कुंभ यांची आणि मिथुन राशीच्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धत सारखीच असते. हे लोक समोरच्याच्या चातुर्याचं कौतुकही करतात. पण मिथुन राशीच्या संपूर्ण विरुद्ध स्वभावाच्या धनु राशीत त्यांना त्यांचा जोडीदार सापडतो. इथं तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना ही म्हण बरोबर लागू होते. कर्क (Cancer) : भावनिक व्यक्तीशी डेटिंग कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र म्हणजे करुणा, संवेदनशीलता, रोमान्स, घनिष्ठ सख्य आणि अंतर्ज्ञानाची देणगी. या राशीच्या व्यक्ती भावनिक असल्याने कुणाशीही मोकळेपणाने बोलण्याआधी त्या व्यक्तीशी चांगली मैत्री होणं आणि त्यावर विश्वास बसणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. त्यानंतर कर्क राशीच्या व्यक्ती समोरच्याला त्याच्या खासगी मनोविश्वात प्रवेश देतात. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – वृश्चिक आणि मीन या दोन्ही जलतत्त्वाच्या राशींच्या व्यक्तीही अशाच भावनिक स्वरुपाच्या असल्याकारणाने कर्क राशीच्या व्यक्तीसाठी लग्न करायला या राशीच्या व्यक्ती उत्तम. पण पृथ्वीतत्त्वाची मकर ही रास कर्क राशीच्या व्यक्तीचा बचावात्मक स्वभाव जाणून त्याचा आदर करते त्यामुळे या राशीच्या व्यक्तीशी लग्न झालं तर ते ही उत्तम जोडपं ठरू शकतं. सिंह (Leo) : डरकाळी फोडणारा सिंह सिंह हा जंगलाचा राजा असतो आणि राशीचक्रातला राजा म्हणजे सिंह रास. त्यामुळे स्वावलंबन आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांची स्वभाववैशिष्ट्य असतात. त्यांना आपल्याकडे लोकांनी लक्ष द्याव असं सतत वाटत राहतं. साहस करण्याची त्यांना प्रचंड इच्छा असते आणि नाटकीय गोष्टींचीही आवड असते. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – सिंह राशीचं सगळ्या राशींशी सगळ्यांशी जमतं त्यामुळेच या राशीच्या व्यक्तींचंही तसंच जमतं. धाडसी गोष्टी करण्याची सिंहेची हौस लक्षात घेता त्यांचं पृथ्वीतत्त्वाच्या राशींशी चांगलं जमतं आणि ते संबंध दीर्घकाळ टिकतात. अग्नि तत्त्वाच्या सिंह राशीच्या व्यक्तीच्या तापट स्वभावाच्या अगदी विरुद्ध स्वभाव वायुतत्त्वाच्या कुंभ राशीच्या व्यक्ती उत्तम जमतं. जरी स्वभाव पूर्ण भिन्न असले तरीही जोडी जमू शकते. सिंह म्हणजे राजा-राणी आणि राज्यकर्तं कुटुंब आणि कुंभ म्हणजे जणू त्यांची प्रजाच त्यामुळे हे समीकरण उत्तम जुळतं. कन्या (Virgo) : परफेक्शनिस्टशी संसार कन्या राशीची लोकं बुद्धिमान असतात. तर्कसंगत विचार करणं आणि विश्लेषणाचं कौशल्य आणि वास्तवाचं भान ही या राशीची वैशिष्ट्ये. प्रचंड संवेदनशील आणि प्रत्येक गोष्टीचं आणि प्रत्येकाचं कल्याण व्हावं, आरोग्य चांगलं रहावं यासाठी या राशीचे लोक प्रयत्नशील असतात. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – पृथ्वीतत्त्वाच्या या राशीचं जलतत्त्वाच्या राशींशी म्हणजे चांगलं जमतं कारण पाणी जसं जमिनीला विकासात मदत करतं तसंच जलतत्त्वाच्या व्यक्ती कन्या राशीच्या व्यक्तीला पूरक असतात. त्याचबरोबर कन्या राशीच्या व्यक्तींचं पृथ्वीतत्त्वाच्या इतर राशींशीही चांगलं जमू शकतं. तूळ (Libra) : यांच्यात लपलाय एक बॉस कायम उत्साही राहून आनंदाचा अनुभव करणारी, माणसांत रमणारी आणि मुत्सद्दी लोकांची रास म्हणजे तूळ. या राशीचिन्हात न्यायनिवाड्याचा तराजू आहे त्यामुळे इतर कुठल्या राशीला आवडत नसेल इतकी शांतता यांना आवडते. त्यामुळे जर तुम्ही शांत व्यक्तीच्या शोधात असाल तर या राशीची व्यक्ती तुमच्यासाठी योग्य आहे. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – अग्नितत्त्वाच्या राशींच्या व्यक्तींचा स्वभाव तापट आणि त्या बुद्धिवान असतात आणि तुळेच्या माणसांना तेच खूप आवडतं. तसंच जर तुम्हाला शांत आणि सुंदर प्रेमळ नातं हवं असेल तर तुळ आणि इतर वायुतत्त्वाच्या राशींची जोडीही जमू शकते. वृश्चिक (Scorpio) : हे असतात कर्मठ, धीट कर्मठ, धीट म्हणजे आपल्या आयुष्यातील ध्येयं पूर्ण करण्यासाठी वृश्चिक राशीची लोकं कष्टही करतात आणि त्यांना अंतर्ज्ञानाच्या क्षमतेचाही फायदा होतो. आणि महत्त्वाचं म्हणजे हे लक्षात असू द्या की त्या समर्पित व्यक्ती असतात त्यामुळे ते तुमच्यावर जीवापाड प्रेम करू शकतात. सर्व जलराशींप्रमाणेच वृश्चिक राशीच्या व्यक्ती मानसिकदृष्ट्या खंबीर असतात. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – कर्क आणि मीन या राशींची आणि वृश्चिक राशीची उर्जा जवळजवळ सारखीच असते त्यामुळे जोडीदार म्हणून या राशींचं जमू शकतं. पृथ्वीतत्त्वाच्या राशी उत्साही वृश्चिकेच्या व्यक्तीला स्थिर करू शकतात आणि काही वेळेला वृश्चिक राशीला त्याची गरजही भासते. वृषभ ही श्रृंगारिक रास असते ती आणि वृश्चिक रास एकत्र आली तर ते जोडपं कामूक प्रेमाचा कळस गाठू शकतं. धनु (Sagittarius) : सातत्याने विकसित होणारी माणसं वायुतत्त्वाच्या धनु राशीच्या चिन्हात एक धनुष्यधारी माणूस आहे त्यामुळे हे खूप साहसी असतात. सहजच सांगायचं तर त्यांची विनोदी शैली, हजरजबाबीपणा हे वादातीत असतं. या राशीची माणसं एखाद्या घटनेतील उत्साह कमी होऊ देत नाहीत. ते मोकळेपणाने बोलणारे असतात. जोडीदाराकडून आपली दुसरी काय अपेक्षा असते. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – अग्नितत्त्वाच्या धनु राशीला इंधन पुरवणाऱ्या मेष आणि सिंह राशींशी यांचं उत्तम जमतं. मिथुन राशीच्या व्यक्तीनी धनु राशीच्या व्यक्तीशी लग्न केलं तरीही तो संसार चांगला चालतो. आयुष्याचा पूर्ण आनंद लुटायचा हे या दोन्ही राशींचं तत्त्व त्यामुळे ते एकमेकांना पाठिंबा देतात आणि परस्परांच्या साहसी जगण्यात सहभागी होतात. मकर (Capricorn) : सुरक्षिततेची भावना मकर राशीचे लोक महत्त्वाकांक्षी असतात आणि आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी कायम कष्ट करत राहतात. करिअर, नातेसंबंध आणि कौटुंबिक संबंध काहीही असो पृथ्वीतत्त्वाच्या मकर राशीचे लोक प्रत्येक बाबतीत पक्का पाया तयार करतात. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सहनशीलता. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – पृथ्वीतत्त्वाच्या वृषभ आणि कन्या या राशींच्या व्यक्तींचं या मकर राशीच्या व्यक्तींचा संसार चांगला होऊ शकतो. जरी लोकांचा विरोध असला तरीही कर्क आणि मकर राशीच्या व्यक्तींच्या प्रेम आणि आयुष्याबद्दलच्या कल्पना समान असल्याकारणाने यांचीही जोडी उत्तम ठरू शकते. कुंभ (Aquarius) : सावधपणे जीवन जगणारी रास वायुतत्त्वाच्या या राशीच्या लोकांची आकलनशक्ती जबरदस्त असते. समाजाला मदत करण्यासाठी कायम तत्पर असतात. त्यामुळेच त्यांच्या माणुसकीसाठी ते ओळखले जातात. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – मिथुन आणि तुळ राशीच्या व्यक्ती जोखीम पत्करायला तयार असल्याने त्यांचं कुंभेच्या व्यक्तींशी पटू शकतं. पण खरं सांगायचं तर सिंहेच्या व्यक्तीचं आणि कुंभ राशीच्या व्यक्तीची जोडी उत्तम संसार करू शकते. मीन (Pisces) : संघटित व्यक्तिमत्त्व मीन ही जलतत्त्वाची राशी आहे. या व्यक्तींना कलेची ओढ असते आणि ते प्रेमळ असतात. त्या मनाने रोमँटिक असतात पण त्यांना प्रॅक्टिकल विचार करण्याची सवय अजिबात नसते. त्यांच्या आयुष्यात शिस्त गरजेची असते. अनुरूप राशी (Compatible Zodiac Signs) – जलतत्वाची रास असल्याने त्यांचं जलतत्त्वाच्या कर्क आणि वृश्चिक राशींशी उत्तम जमतं. अनुरुपतेचा विचार केला तर मीनेच्या व्यक्ती जमिनीवर पाय ठेवून असतात म्हणजे त्यांना अहंकार नसतो त्यामुळे त्या लग्नासाठी अधिक अनुरूप ठरतात. मदत करण्याच्या आवडीमुळे मीन आणि कन्या या राशींचं उत्तम जमतं. तुम्ही जर तुमच्या भावी जोडीदाराबद्दलची अर्धवट माहिती घेतलीत तर ते फारसं फायद्याचं आणि अनुरूप ठरणार नाही. बरोबर? त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रेम आणि नातेसंबंधांची संपूर्ण माहितीच घेतलेली बरी. सारांश प्रेम हा तसा भुलवणारा आणि अप्रिय विषय आहे यात शंकाच नाही. कोणत्याही नात्याच्या सुरुवातीच्या दिवसात आपल्या प्रत्येकाच्या मनात काहीशी शंका असतेच आणि आपण अंधारात चाचपडत असतो. एखादा संकेत किंवा घटना आपलं प्रेम सशक्त करायला मदत करेल असं वाटून आपण त्याच्या शोधात असतो. आपल्याला प्रत्येकाला जाणून घ्यायची इच्छा असते की आपला जोडीदारच आपला सोलमेट म्हणजे प्राणसखा हे का? पण जर तुम्ही ज्योतिषशास्राची मदत घेतली तर राशींच्या आधारे तुम्हाला नक्कीच स्वर्गात निर्माण झालेल्या यशस्वी संसार करू शकणाऱ्या जोड्यांची माहिती कळू शकेल. त्यामुळे स्वत: लाच प्रश्न विचारा की तुम्ही योग्य व्यक्तीसोबत आहात का? तुमच्या सोलमेटबरोबर?
First published: