मुंबई, 07 जुलै : विवाह (Planet effect on Marriage life), वैवाहिक जीवन (Marital life) याविषयी सातत्याने चर्चा होताना दिसते. वैवाहिक जीवनात समस्या निर्माण झाल्याने अनेक जोडपी घटस्फोटसारखा (Divorce) टोकाचा निर्णय घेत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढत आहे. विवाहबाह्य संबंध (Extramarital affair) हे यामागचं प्रमुख कारण मानलं जात आहे. विवाहबाह्य संबंधामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो आणि अखेरीस नातं संपुष्टात येतं. विवाहबाह्य संबंधांस काही वेळा ग्रह, नक्षत्रंही कारणीभूत ठरतात, असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे. काही ग्रहयोग, ग्रहांच्या युतीमुळे पती-पत्नी एकमेकांपासून दुरावतात. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत लग्न मंगळाचं (Mars) असेल आणि लग्नेश मंगळ बुधाच्या (Mercury) युतीत असेल, तर विवाहबाह्य संबंधाची शक्यता वाढते, असं अभ्यासकांचं मत आहे. याशिवाय कुंडलीतले काही अन्य ग्रहयोगदेखील विवाहबाह्य संबंध निर्माण होण्यासाठी पूरक ठरतात. त्यामध्ये प्रामुख्याने शुक्र, राहू, केतू यांचा समावेश आहे. हे वाचा - फक्त डाएट, एक्सरसाइझच पुरेसं नाही, हेल्दी राहण्यासाठी प्रेमातही पडायला हवं ज्यांच्या कुंडलीत शुक्र-मंगळ युती सप्तम लग्न म्हणजेच प्रथम किंवा दशम स्थानात असते, त्यांच्या जीवनात विवाहबाह्य संबंधाचे योग असू शकतात. याशिवाय दशम स्थानात तूळ (Libra) किंवा वृषभ रास (Taurus) असेल, तर पुरुष किंवा स्त्रीचे अन्य व्यक्तीसोबत संबंध असण्याची शक्यता असते. तसंच शुक्र, शनी आणि बुध दशम स्थानात असतील तर त्या व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध असू शकतात. याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत चंद्र (Moon) किंवा शुक्र (Venus) खूप मजबूत असतील, तर ही स्थितीदेखील चांगली मानली जात नाही. अशा व्यक्ती एकापेक्षा जास्त विवाह करण्याची शक्यता असते. शुक्र आणि मंगळाची युती कुंडलीत दशम स्थानात असेल, त्याचवेळी राहू किंवा केतू तूळ राशीत असेल, तर अशा व्यक्तीचे अनैतिक संबंध असू शकतात, असं ज्योतिषशास्त्रात (Jyotish shastra) सांगितलं आहे. हे वाचा - अहो खरंच! आपला मेंदू शरीरापेक्षा जास्त गरम असतो; पुरुष की महिला कोणाचं डोकं जास्त तापतं? रिपोर्ट नुसार ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत धनस्थानाचा अधिपती पापग्रह असून, त्याची सप्तमात पापग्रहासोबत युती असेल तर पुनर्विवाह योग तयार होतो. सप्तमेश निर्बली असून सप्तमात पापग्रहांसोबत त्याची युती असेल तरीदेखील हा योग निर्माण होतो. या योगामुळे एका विवाहानंतर संबंधित व्यक्ती दुसरा विवाह करते. एकूणच काही विशिष्ट ग्रहयोग, ग्रहांच्या युती विवाहबाह्य संबंध निर्माण होण्यास कारणीभूत ठरत असल्या, तरी कुंडलीतल्या अन्य ग्रहांचा अभ्यासदेखील या अनुषंगाने महत्त्वाचा ठरतो. त्याशिवाय कोणतेही निष्कर्ष काढता येत नाहीत. (सूचना - हा लेख सर्वसामान्य ज्योतिषशास्त्राच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.