मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Numerology: या 3 तारखांना जन्मलेल्या लोकांनी आज तणावमुक्तीसाठी आरोग्याची काळजी घ्या

Numerology: या 3 तारखांना जन्मलेल्या लोकांनी आज तणावमुक्तीसाठी आरोग्याची काळजी घ्या

अंकशास्त्र

अंकशास्त्र

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 3 फेब्रुवारी 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज संपूर्ण दिवस तुम्ही व्यग्र असाल; पण शेवटी तुम्ही बक्षिसं आणि ओळख मिळवून घरी परताल. कामाच्या ठिकाणी आणि नातेसंबंधातल्या व्यक्ती तुमचा आदर करतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वातली राजकीय बाजू प्रदर्शित करण्याचा हा दिवस आहे. संगीत मैफलींना उपस्थित राहण्यासाठी, कार्यक्रम आयोजित करण्यासाठी किंवा मुलाखतीला अर्ज करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. मालमत्ता खरेदी करणं आणि मालमत्ता विकणं या दोन्ही गोष्टींमध्ये तडजोड करावी लागेल. त्यामुळे ते टाळा. शाळा, रेस्टॉरंट, समुपदेशन, पुस्तकं, डिजिटल मार्केटिंग, धातू, क्रिएटिव्ह क्लासेस आणि क्रीडा अकादमींचे व्यवसाय आज उच्च मूल्य मिळवतील.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3

दान : भिकाऱ्यांना संत्री दान करा.

#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

खरं प्रेम आणि जोडीदार शोधण्यासाठी अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे. आज खूप लवचीक आणि ग्रहणशील बनणं टाळा. कारण, तुमच्या हळव्या स्वभावामुळे तुम्ही दुखावले जाल. कायदेशीर कमिटमेंट्स तडजोड न करता पूर्ण होतील. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला इतरांचं वर्चस्व आणि नियंत्रण दिसेल. विद्यार्थी आणि खेळाडूंनी वरिष्ठांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं. इतरांवर जबाबदाऱ्या सोपविण्यासाठी पैशाचा वापर करावा लागेल. आयात-निर्यात व्यवसाय आणि राजकीय नेत्यां आज डॉक्युमेंटेशन टाळलं पाहिजे. परदेशातले व्यवसाय, आयटी व्यावसायिक, उत्पादक, किरकोळ विक्रेते, दलाल आणि खेळाडूंना कामगिरीमध्ये सुधारणा पाहण्यासाठी आणखी वाट बघावी लागेल.

शुभ रंग : Aqua

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 2

दान : अनाथाश्रमात कपडे दान करा.

#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

शास्त्रज्ञ आणि संशोधकांचं भविष्य उज्ज्वल होण्याची आशा आहे. लेखक, संगीतकारांची विलक्षण सर्जनशीलता आणि कल्पनाशैली यामुळे त्यांचा दिवस सुंदर असेल. स्टॉकशी संबंधित गुंतवणुकीतून कमी परतावा मिळेल. प्रेमात पडलेल्यांना धन्य वाटेल. त्यांनी भेटवस्तूंद्वारे भावनांची देवाणघेवाण केली पाहिजे. सरकारी अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी आपल्या गुरूंचं नामस्मरण करण्यास विसरू नका.

शुभ रंग : Orange

शुभ दिवस : गुरुवार

शुभ अंक : 3 आणि 1

दान : घरकामात मदत करणाऱ्या महिला मदतनीसाला कुंकू दान करा.

#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

स्किन प्रॉडक्ट्स वापरणं टाळा. तणावमुक्तीसाठी आरोग्याची काळजी घ्या. त्यासाठी मेडिटेशनचा आधार घ्या. पैसे मिळतील, पण त्यासाठी अनेक जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातल्यांना प्रवासासाठी आजचा दिवस चांगला आहे. बांधकाम व्यवसाय आणि वैद्यकीय क्षेत्रात हळूहळू सकारात्मक बदल दिसून येतील. विद्यार्थ्यांनी मेडिटेशन केलं पाहिजे. यामुळे तणावमुक्तीसाठी मदत होईल. मार्केटिंग करणार्‍यांनी लक्षात ठेवावं, की जितका जास्त प्रवास तितकं जास्त यश मिळेल. महिन्याच्या शेवटी ते त्यांचं टार्गेट गाठण्याची शक्यता आहे. मांसाहार आणि मद्यपान टाळा.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शनिवार

शुभ अंक : 9

दान : भिकाऱ्यांना हिरवे किंवा लाल कपडे दान करा.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सकाळी गणपतीची पूजा करा. सार्वजनिक ठिकाणी जाताना खर्चावर नियंत्रण ठेवा. आज एकटेपणा कमी आणि सामाजिकता अधिक अनुभवाल. जोडीदार किंवा जवळच्या मित्राजवळ मनातल्या भावना शेअर करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी नफा मिळविण्यासाठी सक्षम असाल. लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. दिवसाच्या उत्तरार्धात नशीब आपली भूमिका बजावेल. त्यामुळे दिवस संपेपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. प्रेमात पडलेल्यांचं लक्ष विचलित होण्यासारखे अनेक प्रसंग घडतील. त्यांनी प्रामाणिकपणाला प्राधान्य दिलं पाहिजे.

शुभ रंग : Sea Green

शुभ दिवस : बुधवार

शुभ अंक : 5

दान : मंदिरात श्रीफळ दान करा.

#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज जास्त वेळ काम करावं लागेल. त्यामुळे आराम टाळा आणि काम करण्यासाठी उत्साह बाळगा. जोडीदार आणि मुलांसोबत वेळ घालवण्यासाठी आजचा दिवस चांगला. विद्यार्थी आणि राजकारकीय नेत्यांनी नवीन संधी हुशारीनं निवडल्या पाहिजेत. असं केल्यास त्या अनुकूल ठरतील. वैयक्तिक संबंधांमध्ये असुरक्षित आणि अस्वस्थ वाटेल. नवीन कारखाना सुरू करण्यासाठी मालमत्ता शोधणाऱ्यांना एक छान पर्याय निवडता येईल. प्रेझेंटेशन्समध्ये सहभागी होण्यासाठी किंवा खेळण्यासाठी बाहेर पडा. भूतकाळापासून दूर जाणं गरजेचं आहे.

शुभ रंग : Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : आश्रमात पांढरी मिठाई दान करा.

#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

घराच्या पूर्व दिशेला विंड चाइम लावा. हा दिवस सार्वजनिक व्यक्ती, राजकीय व्यक्ती, सॉफ्टवेअर-हार्डवेअर अभियंता, बांधकाम व्यावसायिक, ज्योतिषी, मेकअप आर्टिस्ट आणि खेळाडूंना एखाद्या हिरोप्रमाणे कामगिरी करण्याची नवी संधी देईल. कायदेविषयक प्रकरणांमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे. आज जोडीदाराशी वाद टाळा, ब्रेकअपची परिस्थिती उद्भवू शकते. वाद न घातल्यास संबंध पूर्ववत होतील. शहाणपण टिकवून ठेवण्यासाठी गुरुमंत्राचं वाचन आणि जप करणं आवश्यक आहे. खेळाडूंना बक्षीस आणि ओळख मिळेल. राजकीय नेते, अभिनेत्यांसाठी सार्वजनिक सभांना उपस्थित राहण्याकरिता, पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्यासाठी एक सुंदर दिवस आहे. सावकार आणि बँकर्स यांनी आज सावध राहावं.

शुभ रंग : Teal

शुभ दिवस : सोमवार

शुभ अंक : 7

दान : मंदिरात कच्ची हळद दान करा.

#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

भविष्यासाठी धोरणं आखण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मोसंबी खा. आयुष्यातली प्रगती वाढवण्यासाठी आज दान करा. आज वेळेवर काम पूर्ण करू शकाल. त्यामुळे जास्त लाभ मिळेल. ज्या देवाने तुम्हाला पैसा, प्रसिद्धी, बुद्धी, आदर आणि कुटुंबातल्या सदस्यांची आपुलकी मिळवून दिली आहे, त्या देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात गेलं पाहिजे. आज व्यग्र असाल. उद्दिष्टपूर्तीसाठी खूप काम करावं लागेल; मात्र तो प्रवास आरामदायी असेल. आयुष्य व्यग्र, गुंतागुंतीचं वाटेल; पण ते तात्पुरतं असेल. यशस्वी ऑपरेशन्ससाठी डॉक्टर आणि फायनान्सर्सचं कौतुक होईल. मनातल्या रोमँटिक भावना प्रत्यक्षात आणण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

शुभ रंग : Sea Blue

शुभ दिवस : शुक्रवार

शुभ अंक : 6

दान : भिकाऱ्याला कलिंगड दान करा.

हे वाचा - महत्त्वाच्या कार्याला हात घालताना हा 1 मुहूर्त पाहायचा; अडचण नसेल तर ओक्के होतं

#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सकाळी कपाळावर चंदन लावा. अभिनय, मीडिया, अँकरिंग, सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्यांना आज प्रसिद्धी मिळेल. निविदा आणि मालमत्तेसाठी मध्यस्थाची मदत घेण्यास योग्य दिवस आहे. खेळाडू, व्यापारी, शिक्षक, बँकर्स, संगीतकार, अभिनेते आणि विद्यार्थ्यांनी दस्तावेजीकरण केलं पाहिजे. ते अनुकूल ठरेल. स्टॉक मार्केटमध्ये असलात, तर आज मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करा. लाल आणि जांभळ्या रंगाचे कपडे घातल्यास भाग्य आणि स्थिरता वाढेल. डोळ्यांची काळजी घ्या. प्रवास टाळा. ऑनलाइन काम करण्याचा प्रयत्न करा.

शुभ रंग : Purple

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 3

दान : प्राण्यांना केळी खाऊ घाला.

3 फेब्रुवारी रोजी जन्मलेले सेलिब्रिटी : दुती चंद, रघुराम राजन, सिलंबरासन, दीप्ती नवल, गुरप्रीतसिंग संधू, धर्मेंद्र यादव

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Numerology