ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 जानेवारी 2023चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
#नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज शुभ अंकांच्या एकत्र संयोजनामुळे भावनिक स्थिरता मिळेल. मास कम्युनिकेशन, व्यक्त होणं आणि इतर कौशल्ये विकसित कराल. स्पर्धेला सामोरं जाणं किंवा मुलाखतीची तयारी करा. पण, आज योजना अंमलात आणण्यासाठी इतरांचा पाठिंबा घेतला पाहिजे. आज तुम्हाला सर्व प्रकारची बक्षिसे मिळतील. कंपनीमध्ये मिळणारी प्रसिद्धी किंवा उद्दिष्ट साध्य करण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल की इतरांना तुमचा हेवा वाटेल. नकारात्मक प्रभाव टाळण्यासाठी, संध्याकाळी चंद्राचा जप करणं आणि त्याला दूधाचं पाणी अर्पण करणं गरजेचं आहे. ऑफिसमध्ये नेतृत्व स्वीकारा आणि कौतुकाचा आनंद घ्या.
शुभ रंग: Off White and blue
शुभ दिवस: रविवार
अंक: 2
दान: आज गरिबांना सूर्यफुल तेल दान करा.
#नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज दुपारच्या जेवणात पांढऱ्या रंगाचे पदार्थ खा. दुधाच्या पाण्यानं आंघोळ करून दिवसाची सुरुवात करा. कॉन्ट्रॅक्ट्स, अॅग्रीमेंट्स, टेंडर्स, पार्टनरशीप करण्यासाठी किंवा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. भागीदारांवर वर्चस्व ठेवू नका कारण भविष्यात अंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. आज पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं योग्य ठरेल. चंद्रासाठी विशेष पूजा विधी केले पाहिजेत. वैद्यकीय उत्पादनं, हिरे, रबर, क्रीडा उत्पादनं, द्रव पदार्थ, पुस्तकं, स्टेशनरी आणि शिक्षण क्षेत्रातील व्यवसायांना आज पैसा आणि यश मिळेल.
शुभ रंग: White and sky blue
शुभ दिवस: सोमवार
शुभ अंक: 2
दान: भिक्षेकऱ्यांना किंवा गुरांना दूध दान करा.
#नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुम्हाला आज विजय आणि आघाडी या दोन्ही गोष्टी मिळतील. त्यासाठी तुम्ही तुमचं प्रतिभा आणि कौशल्य प्रदर्शित दाखवणं गरजेचं आहे. तुमच्या सभोवतालचं ज्ञान मिळवण्याचा आणि त्याचा वापर करण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. भूतकाळातील सर्व वाद विसरा आणि दिवसाचा सदुपयोग करण्यासाठी मनापासून संवाद साधा. तुमच्या मित्रांना प्रभावित करण्यासाठी आणि लोकांमध्ये मिसळण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही अध्यापन, गायन, अकाउंटिंग, डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय किंवा ऑडिटिंग क्षेत्रामध्ये असाल तर तुमचं टॅलेंट दाखवण्याची वेळ आली आहे. इनडोअर गेम्स, फायनान्स आणि सरकारी परीक्षांमधील विद्यार्थ्यांना आज त्यांच्या गुणांचा आनंद साजरा करता येईल.
शुभ रंग: Peach
शुभ दिवस: गुरुवार
शुभ अंक: 3 and 9
दान: मंदिरात चंदन दान करा.
#नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
दिवसाच्या पूर्वार्धात ध्येयहीन वाटेल; पण उत्तरार्धात वेगाने घडामोडी होण्याची शक्यता आहे. क्लायंट्सचं प्रेझेंटेशन छान आणि कौतुकास्पद असेल. समुपदेशन आणि मार्केटिंग करण्यासाठी जास्तीतजास्त वेळ घालवायला हवा. यंत्रे, बांधकाम, समुपदेशन, अभिनय किंवा माध्यमांशी व्यवहार करत असल्यास लेखी संभाषणादरम्यान काळजी घ्या. वैयक्तिक संबंधांमध्ये गोंधळ न राहता ते सामान्य होतील. मन निरोगी ठेवण्यासाठी केशर मिठाई आणि लिंबूवर्गीय खाद्यपदार्थ खाणं गरजेचं आहे. आयुष्यात समृद्धी आणण्यासाठी हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवणं आवश्यक आहे.
शुभ रंग: Sky Blue
शुभ दिवस: मंगळवार
शुभ अंक: 9
दान: गरिबांना किंवा प्राण्यांना अन्नदान करा.
#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
पैसे किंवा नवीन मित्र मिळवण्यासाठी आजचा दिवस अतिशय चांगला आहे. तुमची धाडसी वृत्ती तुम्हाला जोखीम घेण्यास प्रवृत्त करेल. ही जोखीम तुमच्या दोघांसाठी योग्य आणि चांगली ठरेल. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. मुलाखती किंवा मीटिंगमध्ये अॅक्वा आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं फायदेशीर ठरेल. मुलाखती आणि प्रपोजल्ससाठी आनंदानं बाहेर जा. प्रवास करण्याची योजना आखा. मालमत्तेशी संबंधित निर्णय आज सुरळीत पार पडतील. प्रवासाची आवड असणाऱ्या व्यक्ती आज लाँग ड्राइव्हला जाऊ शकतात. आज खाण्यापिण्यात शिस्त असणं गरजेचं आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी समवयस्कांशी मिळून मिसळून वागलं पाहिजे. कारण, भविष्यात त्याची खूप मदत होईल.
शुभ रंग: Aqua
शुभ दिवस: बुधवार
शुभ अंक: 5
दान: अनाथांना हिरव्या भाज्या दान करा.
#नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
तुमचं भुरळ पाडणारं व्यक्तिमत्त्व सर्वांनाच प्रभावित करत आहे, म्हणून हाय प्रोफाइल मुलाखतीसाठी जाण्यास हरकत नाही. मजा करण्यात, संधी शोधण्यात, कमिटमेंट पूर्ण करण्यात आणि पार्टनरला प्रपोज करण्यात आजचा दिवस घालवला पाहिजे. आजचा दिवस आनंद आणि समृद्धीनं भरलेला असेल. त्यासाठी देवाचे आभार मानले पाहिजेत. कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्यानं तुम्हाला धन्य वाटेल. अभिनेते, डॉक्टर, प्रशिक्षण, आयात-निर्यात, कापड, रिअल इस्टेट आणि लक्झरी वस्तूंशी संबंधित व्यवसायांमध्ये आज नशिबाची विशेष साथ मिळेल. वाहन, घर, यंत्रसामग्री किंवा दागिने खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शेअर बाजार गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. रोमँटिक डेटमुळे तुमची संध्याकाळ आनंदी होईल.
शुभ रंग: Aqua
शुभ दिवस: शुक्रवार
शुभ अंक: 6
दान: गरिबांना दही दान करा.
#नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आजचा दिवस ऑडिट आणि पुनरावलोकन करण्यात जाईल. आज घेतलेले तर्कशुद्ध निर्णय व्यवसायातील जबाबदाऱ्या कमी करतील. आज भागीदार किंवा क्लायंटशी कोणत्याही प्रकराची तडजोड करू नये. आयात-निर्यात, स्टॉक मार्केट, ट्रॅव्हल एजन्सी, मीडिया एजन्सी आणि अभिनय क्षेत्राशी व्यवहार केल्यास तुम्ही नशीबान ठराल. विरुद्ध लिंगाच्या व्यक्तीकडून सूचना स्वीकारण्याचा प्रयत्न करा कारण त्यांचा तुम्हाला फायदा होईल. सीएचा सल्ला घेतल्यानं अकाउंट योग्य प्रकारे व्यवस्थापित करण्यात मदत होईल. लग्नाचे प्रस्ताव प्रत्यक्षात उतरतील. गणपतीच्या मंदिरात जाऊन अभिषेक केल्यानं यशासाठी आवश्यक असलेल्या नेपच्युन ग्रहाचे आशीर्वाद मिळतील.
शुभ रंग: Sea green
शुभ दिवस: सोमवार
शुभ अंक: 7
दान: गुरांना किंवा आश्रमात पिवळं धान्य दान करा.
#नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.).
आज तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा. विक्री किंवा शेअर बाजार, औषध, राजकारण आणि सट्टेबाजी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस जलद घडामोडींचा असेल. तर्कशुद्ध विचार आणि मृदू भाषण या बाबी आज यशापर्यंत पोहोचण्याची गुरुकिल्ली असतील. पैसा आणि ओळखींच्या बळावर आज कायदेशीर प्रकरणं सोडवली जातील. संवाद ही आज व्यावसायिक सौद्यांसाठी गुरुकिल्ली ठरेल. त्यासाठी कौटुंबिक कनेक्शनदेखील फायद्याची ठरतील. विद्यार्थ्यांनी जास्त फी भरल्यास परदेशात शिक्षण घेण्याचं त्यांचं स्वप्नं पूर्ण होण्यास मदत होईल. तुम्ही आज दिवसभर योजना अंमलात आणण्यात, पैसा आणि समाधान यांच्यात संतुलन राखण्यात व्यस्त असाल. आज गुरांसाठी दान करणं गरजेचं आहे.
शुभ रंग: Sea Blue
शुभ दिवस: शनिवार
शुभ अंक: 6
दान: गरजुंना चप्पल दान करा.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराप्रती तुमची निष्ठा सिद्ध करावी लागेल. तुमच्या जोडीदारासमोर किंवा जवळच्या मित्रांसमोर तुमची विश्वासार्हता दाखवावी लागेल. परस्पर विश्वास ही आजच्या दिवसाच्या यशाची गुरुकिल्ली आहे. प्रेमात असलेल्या व्यक्ती जोडीदाराला प्रपोज करू शकतात. व्यावसायिक संबंध, डील्स, कराराच्या कागदपत्रांवर सह्या, कार्यक्रम आयोजित करणं किंवा शस्त्रक्रिया यांना खराब वेळेमुळे उशीर होईल. राजकारण, द्रव पदार्थ, औषधे, डिझाइन, मीडिया, फायनान्स किंवा शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्ती मोठ्या बाबींची निवड करतील. बोलायला आणि वाद संपवायला आवडेल. खेळाडूंच्या पालकांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल.
शुभ रंग: Orange
शुभ दिवस: मंगळवार
शुभ अंक: 9
दान: घरकाम करणाऱ्या मदतनीसाला लाल रुमाल दान करा.
11जानेवारी रोजी जन्मलेले सेलिब्रिटी: राहुल द्रविड, कैलाश सत्यार्थी, अनु अग्रवाल, फातिमा सना शेख, शिबू सोरेन, अंजू महेंद्रु
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya