Home /News /astrology /

Numerology : तुमच्यासाठी हा रंग आहे शुभ; आज या रंगाचे कपडे घालणं ठरेल फायद्याचं

Numerology : तुमच्यासाठी हा रंग आहे शुभ; आज या रंगाचे कपडे घालणं ठरेल फायद्याचं

Numerology 11 May 2022 : जन्मतारखेनुसार ठरतं ते अंकशास्त्र; .यानुसार तुमचा शुभ रंग, शुभ दिवस पाहा.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 11 मे 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिवसाची सुरुवात आळसाने होईल; मात्र जसजसा दिवस पुढे जाईल तसं तुम्हाला स्पष्टता मिळत जाईल. बऱ्याच गोष्टींना आज उशीर होईल. एखादं कॉन्ट्रॅक्ट करणं, योजना बनवणं, नवीन संबंध तयार करणं किंवा मुलाखतीसाठी तयारी करणं अशा कोणत्याही गोष्टी वेळेवर होणार नाहीत. आज तुमचं कामाच्या ठिकाणी भरपूर कौतुक होण्याची शक्यता आहे. टार्गेट अचीव्ह केल्याबद्दल किंवा पैसे मिळवल्याबद्दल सहकारी तुमच्यावर जळतील. यश मिळवण्यासाठी ऑफिसातल्या वरिष्ठांशी हातमिळवणी कराल. खासगी आयुष्यात मात्र आज डिप्लोमॅटिक राहावं लागेल. तुमच्या हुशारीचा फायदा एखाद्या नव्या गुंतवणुकीत करून घ्याल. दिवसभरात सूर्यदेवाची प्रार्थना करायला विसरू नका. शुभ रंग : क्रीम आणि निळा शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 1 दान : कृपया आज पिवळी फळं दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजकाल तुम्ही ठरवलेलं काहीही नीट पार पडत नाहीये. आजचा दिवस पार्टनरसोबत शॉपिंग करण्यासाठी आणि संगीत शिकण्यासाठी योग्य आहे. तसंच, नवं कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी वा टेंडर भरण्यासाठीही आजचा दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी विरोधकांना मागं पाडायचं असेल, तर थोडं डिप्लोमॅटिक बोलणं ठेवा. आज आवडत्या व्यक्तींसोबत वेळ व्यतीत कराल. तुमची स्वप्नं आज पूर्ण होणार नाहीत, त्यामुळे थोडी सबुरी बाळगा. आज पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यास चांगले परिणाम दिसून येतील. भगवान शंकर आणि चंद्र देवाची पूजा केल्यास लाभ होईल. शुभ रंग : पांढरा (White) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया भिकाऱ्यांना वा गायीला दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) प्रॉपर्टीशी संबंधित काही निर्णय घेणार वा घेतला असाल तर त्यावर पुनर्विचार करा. आजचा दिवस हा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींपासून शिकण्याचा आहे. आज स्वतःबद्दल भरभरून सांगाल. मागचे अनुभव विसरून, अगदी मनापासून सर्वांशी संवाद साधा. सोशलाइज होण्यासाठी आणि तुमच्या मित्रांवर छाप पाडण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अ‍ॅक्टिंग, टीचिंग वा ऑडिटिंग या क्षेत्रांमध्ये काम करत असाल, तर आजचा दिवस तुमचं कौशल्य सर्वांना दाखवण्याचा आहे. फायनान्स क्षेत्रातले विद्यार्थी आणि सरकारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. शुभ रंग : पीच (Peach) शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज पैसे, बक्षीस आणि प्रसिद्धी कमावण्याचा दिवस आहे. क्लायंटसमोर केलेलं प्रेझेंटेशन चांगलं आणि कौतुकास्पद होईल. बिझनेस प्लॅन्स पूर्णत्वाला नेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. दिवसाचा अधिक वेळ मार्केटिंगमध्ये घालवल्यास फायदा होईल. प्रवास करताना किंवा मशीन्स हाताळताना काळजी घ्या. खासगी नातेसंबंधही सुरळीत राहतील. केशर घातलेले गोड पदार्थ आणि लिंबूवर्गीय फळं खाणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरेल. निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ व्यतीत करा. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना हिरवी धान्यं दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या पैशांचा आणि स्वातंत्र्याचा अतिवापर टाळा. सहकाऱ्यांपासून आज थोडं सांभाळून राहा. तुम्ही काय बोलता यावरही आज थोडा ताबा ठेवा. तुमच्या मतामुळे इतरांना वाईट वाटू शकतं. तुमच्या बोल्ड स्वभावाला थोडा आवर घाला. यामुळे एखादा जोखमीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. एखादी गुंतवणूक केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. सी ग्रीन रंगाचे कपडे घातल्यास मीटिंग्जमध्ये फायदा होईल. एकदम आनंदी मूडमध्ये मुलाखती किंवा प्रपोझल स्वीकारण्यासाठी जा. प्रॉपर्टीसंबंधी काही निर्णय घेण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. प्रवास आवडणाऱ्या व्यक्ती विदेशात जाण्याचं नियोजन करू शकतात. आज खाण्यापिण्याच्या बाबतीत नियम पाळण्याची गरज आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्यात अफाट एनर्जी आहे. ती एका वेळी एकाच कामासाठी वापरली, तर त्याचा जास्त वापर करून घेता येईल. आजचा दिवस दिलेल्या कमिटमेंट्स पूर्ण करण्याचा आहे. सहकारी आणि मुलांची साथ मिळाल्यामुळे आनंदी असाल. ग्लॅमर, ट्रेनिंग, एक्सपोर्ट-इम्पोर्ट, कापड, रिअल इस्टेट आणि लक्झरी वस्तूंशी संबंधी व्यवसायांमध्ये असलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. गाडी, घर, मशीनरी किंवा दागिने घेण्यासाठी उत्तम दिवस. शेअर मार्केटमधली गुंतवणूक फायद्याची ठरेल. संध्याकाळी होणारी रोमँटिक डेट तुम्हाला अगदी आनंदी करेल. शुभ रंग : अ‍ॅक्वा (Aqua) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरामध्ये पांढरी मिठाई दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पैशांसंबंधी व्यवहार पार पाडताना तुमची हुशारी आणि कॉन्टॅक्ट्सचा वापर कराल. आज घेतलेले निर्णय बिझनेसमधली लाएबिलिटी कमी करतील. आज पार्टनर किंवा क्लायंटसोबत कोणतंही कॉम्प्रोमाइज करू नका. वकिलांनी दिलेला सल्ला स्वीकारा, त्याचा फायदा होईल. लग्नाचे प्रस्ताव प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. आज शिव मंदिरात जाऊन अभिषेक केल्यास कुंडलीतला नेपच्यून ग्रह मजबूत होईल. यामुळे तुम्हाला यश मिळेल. शुभ रंग : Sea green शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया गरिबांना साखर दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) दिलेल्या असाइनमेंट्स पूर्ण करण्याची भरपूर क्षमता आजच्या दिवसात आहे. त्यामुळे कामात आणि अभ्यासात यश मिळेल. आवेग टाळण्यासाठी तुमचा अ‍ॅटिट्यूड फ्लेक्झिबल ठेवणं गरजेचं आहे. कायदेशीर प्रकरणं पैशांनी आणि संवादाने सुटू शकतील. सरकारी संबंधांचा वापर कराल. बिझनेस डील क्रॅक करण्यासाठी अंतर्मनाचा आवाज ऐका. तुमच्या साधेपणावर तुमचा जोडीदार भाळेल. विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात यश मिळेल. आजचा दिवस पैशांचे व्यवहार करण्यात जाईल; मात्र दिवसाच्या शेवटी समाधानी असाल. आज गायींना खाऊ घालणं फायद्याचं ठरेल. शुभ रंग : Sea blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज आपल्या मनाचं ऐकलंत, तर चांगलीच प्रसिद्धी मिळू शकेल. जुना वाद मिटवण्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. प्रेमात असलेल्यांनी आज बिनधास्त जाऊन आपल्या प्रिय व्यक्तीला प्रपोज करावं. तसंच, काही वाद सुरू असेल तर तो बोलून मिटवा. बिझनेस डील्स फायद्याची ठरतील. राजकारण, लिक्विड्स, औषधं, डिझायनिंग, मीडिया, फायनान्स आणि शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीचा आहे. पालक आणि खेळाडूंना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया मंदिरात लाल कापड दान करावं. 11 मे रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सदाशिव अमरापूरकर, पूजा बेदी, असफ अली, अदा शर्मा, सबरीना कारपेंटर
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या