Home /News /astrology /

Numerology : आज मांसाहार टाळा; या रंगाच्या पदार्थांचं सेवन ठरेल उत्तम

Numerology : आज मांसाहार टाळा; या रंगाच्या पदार्थांचं सेवन ठरेल उत्तम

Numerology 03 June 2022 : अंकशास्त्रानुसार या विशिष्ट जन्मतारखेच्या व्यक्तींनी आहाराबाबत आज काळजी घ्यायला हवी.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 3 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बोलण्याचं कौशल्य आणि मार्केटिंग स्किल असणाऱ्या व्यक्तींसाठी आज फायद्याचा दिवस आहे. आई, वकील, शिक्षक, बॉस किंवा प्रशिक्षकाचा सल्ला घ्या आणि त्यांच्यावर विश्वास ठेवा. प्रॉपर्टी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरळीत पार पडतील. खेळात जिंकण्याची शक्यता अधिक आहे. सौर ऊर्जा, संगीत, गायन, नृत्य, जिम्नॅशियम, बांधकाम, शेती, साहित्य, औषध आणि आर्थिक क्षेत्रांतल्या व्यक्तींना मोठा फायदा होऊ शकतो. लहान मुलांचं शिक्षक वा प्रशिक्षकांकडून कौतुक होईल. आज गुरूंचं पूजन करावं. रोज सकाळी त्यांचं नामस्मरण करावं. आज जेवणात पिवळ्या रंगाच्या पदार्थांचा समावेश केल्यास उत्तम. शुभ रंग : Peach and Blue शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना केळी दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या आवडत्या व्यक्तीकडे पत्रातून प्रेम व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. एखादी स्पर्धा असल्यास त्यात नक्की सहभागी व्हा. कायदेशीर वायदे आज पूर्ण कराल. एखादी व्यक्ती तुमचा स्वाभिमान दुखावू शकते, तेव्हा सावध राहा. महिलांनी वरिष्ठांशी जुळवून घेणं गरजेचं आहे. सरकारी कंत्राट मिळवण्यासाठी भूतकाळातल्या ओळखी कामी येतील. राजकीय व्यक्ती आणि एक्स्पोर्ट इम्पोर्ट क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 6 दान : कृपया मंदिरात दूध किंवा तेल दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कोणत्याही परिस्थितीमध्ये उत्तम काम करण्याचा तुमचा स्वभाव असल्यामुळे बॉसचे तुम्ही लाडके आहात. आजचा दिवस तुमची कौशल्यं, तुमचं ज्ञान दाखवून देण्याचा आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. संगीतकार आणि लेखकांनी आज घेतलेले सर्व निर्णय फायद्याचे ठरतील. आज केलेली गुंतवणूक भरपूर परतावा देईल. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला मनातल्या भावना बोलून दाखवाव्यात. सरकारी अधिकाऱ्यांचं नशीब जोरावर राहील. दिवसाची सुरुवात करताना कपाळावर चंदनाचा टिळा लावावा, तसंच गुरूंचं नामस्मरण केल्यास उत्तम. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 1 दान : कृपया गरीब मुलांना पुस्तकं किंवा पेन्सिल्स दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची इच्छाशक्ती हीच तुमची सर्वांत मोठी ताकद आहे. आज तुम्ही तुमच्या ध्येयापासून दूर न हटता, यश मिळवाल. आज वेळेचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. आज केलेल्या कष्टांचं फळ भविष्यात मिळणार आहे हे धरून चला. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रांतल्या व्यक्तींनी प्रवास टाळावा. बांधकाम किंवा स्टॉक मार्केट व्यवसाय मंदावतील. मेडिकल आणि शेती व्यवसायांमध्ये मात्र सकारात्मक बदल दिसून येतील. विद्यार्थ्यांनी आपली स्ट्रॅटेजी कागदावर उतरवून काढणं फायद्याचं ठरेल. मार्केटिंग क्षेत्रातल्या व्यक्तींचं टार्गेट पूर्ण होईल. कृपया आज मांसाहार टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : कृपया एखाद्या भिक्षेकऱ्याला चादर दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस मित्रांसोबत मौजमजा करण्याचा आहे. भूतकाळात केलेल्या चांगल्या गोष्टींचं फळ आज तुम्हाला मिळेल. एखादा मित्र वा नातेवाईक तुमच्याकडे मदत मागेल. त्याला टाळू नका. बँकिंग क्षेत्रातल्या व्यक्तींचं नशीब जोरावर राहील. सेल्स आणि खेळातल्या व्यक्तींनी जलद हालचाल करणं फायद्याचं ठरेल. विद्यार्थ्यांनाही आज मोठं यश मिळेल. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया हिरव्या पालेभाज्या दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं व्यक्तिमत्त्व आणि तुमची प्रोफेशनल लाइफ ही पहिल्यापासूनच एकमेकांविरुद्ध राहिली आहे. आजचा दिवस प्रवासासाठी, प्रेझेंटेशन देण्यासाठी, मास मीडियासमोर बोलण्यासाठी आणि यश साजरं करण्यासाठी उत्तम आहे. लहान मुलांसोबत वेळ व्यतीत करण्यासाठी चांगला दिवस. व्हिसाच्या प्रतीक्षेत असाल तर चांगली बातमी मिळू शकते. नवीन फॅक्टरीसाठी जागा पाहत असाल, तर आज चांगला पर्याय मिळेल. अभिनेते आणि माध्यम क्षेत्रातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Teal शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना नारळ दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्हाला काय हवं आहे यापेक्षा तुमच्यासाठी काय योग्य आहे हे लक्षात घ्या. तुमच्यासाठी योग्य असणारी गोष्ट भविष्यात तुम्हाला मिळेलच. कायदेशीर बाबींमध्ये संयम बाळगणं महत्त्वाचं. खेळ आणि शिक्षणामध्ये तुमच्या वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. नातेसंबंध अधिक खुलतील. विरुद्धलिंगी व्यक्ती तुमच्यासाठी नशीबवान ठरेल. आज वाणी मधुर ठेवल्यास भरपूर फायदा होईल. राजकारणातल्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्याचा आहे. गुरुमंत्राचा जप करणं उत्तम. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरात कुंकू दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कोणताही मोठा निर्णय घेताना घाई टाळा. कामाच्या बाबतीत असणारा निर्णयदेखील घरी येऊन, कुटुंबीयांशी चर्चा करून मगच घ्या. आज भरपूर कष्ट करण्याचा दिवस आहे; मात्र संध्याकाळपर्यंत नक्कीच त्याचा फायदा दिसून येईल. आज ज्ञानार्जनात भरपूर वेळ व्यतीत कराल. डॉक्टरांची एखाद्या सर्जिकल सर्व्हिसबद्दल किंवा सेमिनारमधल्या भाषणाबद्दल भरपूर प्रशंसा होईल. पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना संध्याकाळपर्यंत आर्थिक फायदा होऊ शकतो. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना लिंबूवर्गीय फळं दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या जोडीदारासाठी तुम्ही नेहमीच नशीबवान ठरता. तुम्ही नशीबवान असण्याचा आतापर्यंत तुमच्या कुटुंबीयांना भरपूर फायदा होत आला आहे. त्यामुळे कुटुंबात सर्व जण तुमच्यावर भरपूर प्रेम करतात. आजचा दिवसही भरपूर प्रगतीचा आणि कौतुकाचा आहे. अचानक मोठं यश वा आर्थिक फायदा होऊ शकतो. सरकारी ऑर्डर घेण्यासाठी उत्तम दिवस. खेळाडू आणि विद्यार्थ्यांनी आज कागदपत्रांसंबंधीची कामं उरकून घ्यावीत. अभिनेते, सीए, शिक्षक, खेळाडू आणि हॉटेल व्यवसायातल्या व्यक्तींना मोठं यश मिळेल. शुभ रंग : Red and Orange शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया घरगुती कामगारांना डाळिंबं दान करा. 3 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : सारिका, टी. हरीश राव, एम. करुणानिधी, जॉर्ज फर्नांडिस, तरला दलाल, स्टुअर्ट बिन्नी
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या