आज दिनांक 01 मे 2022. रविवार. आज वैशाख शुक्ल प्रतिपदा. आज चंद्राचं भ्रमण कृत्तिका नक्षत्रात होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचं भविष्य.
मेष
आज चंद्र वृषभ स्थानात असून आर्थिक, मानसिक ताण येईल. प्रकृतीची काळजी घ्या. राशीतील रवी कायद्याचं बंधन पाळा असं सांगत आहे. मध्यम दिवस.
वृषभ
राशी स्थानातील चंद्र आज भावंडांसंबंधी शुभवार्ता देईल. मित्रमैत्रिणींना भेटण्याचा, सामाजिक जीवनात आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे.
मिथुन
कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल. वडिलांशी संबंध सुधारतील. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्त्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. दिवस शुभ.
कर्क
भाग्यकारक दिवस असून धार्मिक गोष्टीत मन रमेल. संततीसंबंधी शुभ काळ. मेजवानीचा योग येईल. प्रवास होतील. एकूण दिवस समाधानात जाईल.
सिंह
आज भाग्य चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल. फार ताण घेऊ नका. जास्तीचं काम पडेल. शांत राहून दिवस घालवा.
कन्या
भाग्य स्थानातील चंद्र जीवनात गोडी निर्माण करेल. मौजमजेसाठी बाहेर जाण्याचं ठरेल. भावंडं भेटतील. आनंद आणि उत्साहात दिवस पार पडेल.
तूळ
आज चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. शिक्षणआणि कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. दिवस चांगला.
वृश्चिक
संततीसाठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. उच्च शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.
धनु
आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. चंद्र खर्चात वाढ करेल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. काळजी घ्या. दिवस शुभ.
मकर
प्रवास, घरामध्ये काही नवीन घटना, महत्त्वाचे फोन असा हा दिवस आहे. भावंडासोबत मजेत एकत्र घालवा. प्रवासाचे योग येतील.
कुंभ
आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. राशीतील गुरू सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. प्रकृती जपा. दिवस शुभ.
मीन
तृतीय स्थानातील चंद्र मानसिक स्वास्थ्य देईल. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. शिक्षण क्षेत्रात यशस्वी व्हाल. उत्तम असा दिवस आहे.
शुभम भवतू!!
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.