सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co ) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 6 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
खिलाडू वृत्ती दाखवल्यास ताणातून बाहेर येण्यास मदत होईल. सहकाऱ्यांसोबत एखादी छोटीशी सहल घडेल. कोणत्याही प्रकारचं खडतर प्रशिक्षण घेत असलेल्या व्यक्तींसाठी आज काही तरी बक्षीस मिळण्याचा दिवस.
LUCKY SIGN – A Clear Sky
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
एखादी गोष्ट तुमच्यासाठी नाहीच हे लक्षात येताच ती सोडून देणं उपयोगाचं ठरतं. दिवसाच्या शेवटी एखादी आनंददायी गोष्ट घडेल. मुलाखतीसाठी चांगली तयारी करा. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये.
LUCKY SIGN – An Orchid
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
सकाळचं रूटीन ही तुमच्यासाठी एक नव्याने सापडलेली चांगली थेरपी असल्याचं सिद्ध होईल. आज सामाजिक कार्य करण्याची इच्छा होईल. एखादी व्यक्ती तुमच्याशी स्पर्धा करण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा.
LUCKY SIGN – A Dice
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
बऱ्याच प्रतीक्षेनंतर एखाद्या जुन्या सहकाऱ्याकडून काही मेसेज मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी झालेल्या वादामुळे तुमचा मूड खराब होईल. वेळेचं चांगल्या प्रकारे नियोजन करून तुम्ही स्वतःलाच आश्चर्यचकित कराल.
LUCKY SIGN – A Blue Bus
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
काही वेळा तुम्ही एक कठोर व्यक्ती म्हणून समोर येता; मात्र जास्त संवाद साधल्यास उपयुक्त ठरू शकेल. एखाद्या व्यक्तीचा मत्सर तुमच्या मनःशांतीवर विपरीत परिणाम करील. डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.
LUCKY SIGN – A Basketball
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
जे तुम्ही आधीच करायला हवं होतं, ते करण्याची वेळ आता आली आहे. तुमचा हा प्रवास अपेक्षेपेक्षा जास्त अध्यात्मिक ठरेल. तुमच्या जवळच्या मित्रांपैकी एकाला उदासवाणं वाटेल.
LUCKY SIGN – A Coffee Mug
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
वैयक्तिक आयुष्य आणि काम या गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये पर्फेक्शन असायलाच हवं असं नाही, हे लक्षात घ्या. चांगला श्रोता बनण्याचा प्रयत्न करा. आज दुपारचं जेवण अगदी खास असेल.
LUCKY SIGN – A Silver Bowl
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
भितीवर मात करून नव्याने सुरुवात करण्याची आता वेळ आहे, खासकरून तुम्ही भूतकाळात जे पूल उद्ध्वस्त केले असतील, ते पुन्हा उभारण्याची वेळ आली आहे. कुटुंबीयांचा तुम्हाला भक्कम पाठिंबा कायम राहील. लवकरच एखादा नवीन भागीदारी उपक्रम सुरू कराल. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच ठिकाणांपर्यंत पोहोचता येईल.
LUCKY SIGN – A Candy Store
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
आजचा दिवस अगदीच नाट्यमय ठरू शकतो. तुमच्या योगदानाबद्दल बऱ्याच काळानंतर तुम्हाला श्रेय मिळेल. आरोग्याच्या काही समस्या उद्भवू शकतात. संध्याकाळ अधिक दिलासादायक असू शकेल.
LUCKY SIGN – An Aqua Blue Cloth
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
अचानक बदललेल्या नियोजनामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल. एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल. आवडीची व्यक्ती आजूबाजूला असणं अधिक दिलासादायक ठरेल. शक्य झाल्यास संध्याकाळी विश्रांती घ्या.
LUCKY SIGN – Your favourite sweet
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
तुम्ही ज्या जागेला भेट देणार आहात ती तुमच्या अपेक्षेइतकी चांगली नसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची गरज आहे. आज लवकर काम संपवून एखादं चांगलं पुस्तक वाचा.
LUCKY SIGN – A red mobile cover
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
अनपेक्षित परिणामांमुळे तुम्ही स्वतःलाच लवकरच सरप्राइज देण्याची शक्यता आहे.
तुमच्याकडे युनिक टॅलेंट आहे. त्याचा साक्षात्कार झाल्यामुळे तुम्हाला शक्ती मिळते. सरकारी अधिकारी आणि ब्युरोक्रॅट व्यक्तींसाठी कठीण दिवस.
LUCKY SIGN – A Copper Vessel