Home /News /astrology /

दैनंदिन राशीभविष्य: 'तूळ'साठी भाग्यकारक दिवस, 'धनु' व्यक्तींना भागिदारीत मिळेल यश

दैनंदिन राशीभविष्य: 'तूळ'साठी भाग्यकारक दिवस, 'धनु' व्यक्तींना भागिदारीत मिळेल यश

दैनंदिन राशीभविष्य: आज दिनांक 18 जानेवारी 2022. वार मंगळवार. दोन राशींच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस ताण वाढवणारा ठरेल. पाहा तुमच्या राशीत आज कसे आहेत ग्रह?

मुंबई, 18 जानेवारी - आज दिनांक 18 जानेवारी 2022. वार मंगळवार. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करणार असून, शनी सूर्याशी प्रतियोग करेल. आज पौष कृष्ण प्रतिपदा आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य (Rashi bhavishya). मेष आज तुम्हाला दिवस शुभ असून, सूर्य आणि चंद्र योगाचे फळ मिळेल, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. अविवाहित व्यक्तींसाठी लवकरच छानसा प्रस्ताव येईल. गृहसौख्य उत्तम. दिवस शुभ. वृषभ आज चंद्र भ्रमण सुखद आहे. राशीतील राहू, थोडी नकारात्मक मानसिकता देईल. पण तुम्ही प्रयत्‍नपूर्वक त्यावर विजय मिळवाल. आर्थिक बाजू ठीक राहील. दिवस चांगला आहे. मिथुन आज धन स्थानातील चंद्र भ्रमण अनुकूल फळ देणार आहे. संभाषण चातुर्य आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व देईल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस शुभ. कर्क राशीतील चंद्र तुम्हाला धाडस आणि फिरण्याची आवड निर्माण करेल. शनी चंद्र प्रतियोग नैराश्यवादी स्वभाव होईल. काळजी घ्या. आर्थिक नियोजन व्यवस्थित करा. दिवस शुभ. सिंह आज  मंगळ शुक्र संतती चिंता, दाखवत आहे. दिवस कामात व्यस्त असा जाईल. काहीतरी हुरहुर लावणारा दिवस आहे. राशी स्वामी रवी  व्यस्तता देईल. कन्या राशी स्वामी बुध मकर राशीत असून, तुम्हाला उत्तम बुद्धिमत्ता प्रदान करेल. चंद्र मंगळ केलेल्या कष्टाचे फळ मिळू देईल. प्रकृती ठीक राहील. दिवस मध्यम. तूळ आज ऑफिसमध्ये भरपूर काम असणार आहे. मात्र त्यात तुम्हाला आनंद मिळेल. भाग्यकारक दिवस आहे. नोकरी व्यवसायात नवीन संधी मिळतील. दिवस चांगला आहे. वृश्चिक आज दिवस उत्तम असून, नवीन संधी, प्रवास, आप्तकुटुंबीयांची भेट करून देणारा ठरेल. घरात शांतता व आनंद राहील. छोटीशी मेजवानी आयोजित कराल. शुभ दिवस. धनू आज दिवस प्रतिकूलता वाढवणारा आहे. दोन दिवस जाणवणारा  ताण वाढेल. भागिदारीमध्ये चांगले यश मिळेल. आर्थिक त्रास मात्र जाणवेल. मकर आजचा दिवस व्यवसायपूरक आहे. काही  निर्णय होतील, जे फायद्याचे ठरतील. पती-पत्नी एकमेकांना समजून घेतील. नोकरीत नवीन संधी मिळतील. दिवस शुभ आहे. कुंभ आज प्रकृती अस्वस्थ आहे असे वाटेल. पण काम करावे लागेल. मात्र थोडा वेळ स्वतःला द्या. थोडा आराम करा. मानसिक ताण जाणवत असेल तर काही उपाय करा. दिवस मध्यम आहे. मीन मुलांना नवीन खरेदी करण्याची इच्छा होईल. तुम्ही ती आनंदाने पूर्ण करणार आहात. काही विशेष अध्यात्मिक साधना करण्यासाठी फार शुभ दिवस असून दिवस आनंदात घालवा.
Published by:News18 Web Desk
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या