मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Daily horoscope : मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरूवार कुणासाठी फलदायी ठरणार?

Daily horoscope : मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरूवार कुणासाठी फलदायी ठरणार?

Daily horoscope : आज मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरूवारी या राशींवर होणार गुरूकृपा.

Daily horoscope : आज मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरूवारी या राशींवर होणार गुरूकृपा.

Daily horoscope : आज मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरूवारी या राशींवर होणार गुरूकृपा.

आज दिनांक 30 डिसेंबर 2021. गुरुवार. मार्गशीर्ष कृष्ण एकादशी. आज चंद्र तुला राशीत भ्रमण करीत आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज दिवस अनुकूल आहे. मन आनंदी राहिल. आर्थिक बाजू ठिक आहे. धार्मिक समारंभ, मेजवानी आयोजित कराल. पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती जपा. दिवस अनुकूल.

वृषभ

आज व्यवसाय उत्तम फळ देईल. मानसिक ताण कमी होईल. घरात काही तरी समारंभ होईल. आर्थिक बाजू सांभाळा. दिवस चांगला आहे.

मिथुन

राशीच्या पंचम स्थानातील चंद्र भ्रमण मुलांकडे लक्ष असू द्या असं सुचवत आहे. नातेवाईक भेटतील. नोकरीत काम जास्त पडेल. दिवस चांगला जाईल.

कर्क

मुलांना आणि घरच्या लोकांना वेळ द्या. शिक्षणात उत्तम प्रगती, वाचन लिखाण यात वेळ जाईल. पोटाचे त्रास जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नका. आर्थिक घडामोडी होतील. दिवस बरा जाईल.

सिंह

शुक्र आणि तृतीय चंद्र घरांमध्ये भरपूर खर्च करवणार आहेत. मंगळ केतू भ्रमण काही विकार निर्माण करतील. घरात जास्तीचे काम पडेल. गुरुकृपा राहिल. दिवस शुभ.

कन्या

आज दिवस आर्थिक लाभ घडवून देणारा आहे. महत्त्वाचा निर्णय किंवा संभाषण होईल. कुटुंबात रमून जाल. पाहुणे भेट देतील. प्रकृती ठिक राहिल. दिवस चांगला जाईल.

तुला

राशीस्थानातील चंद्र भ्रमण अनेक लाभ मिळवून देईल. अनावश्यक धाडस करू नका. कुटुंबात काही छान घटना घडेल. मन शांत राहिल.  दिवस शुभ.

वृश्चिक

राशीच्या व्यय स्थानातील चंद्र गुरू दृष्टीत आहे. मन शांत राहिल. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. मेजवानी आयोजित कराल. धार्मिक कार्यासंबंधी शुभ दिवस.

धनु

लाभ स्थानातील चंद्र भ्रमण वाढलेला खर्च, दाखवत आहे. गुरु मात्र साथ देईल. वडील व्यक्तींची मदत होईल. प्रवास  घडतील. दिवस मध्यम जाईल.

मकर

राशीच्या दशम स्थानातील चंद्र प्रवास योग, गाठीभेटी आणि लाभकारक आहे. अध्यात्मिक साधना होईल. नातेवाईकांना भेट, कार्यक्षेत्रात नवीन संधी, इत्यादीचा लाभ घ्याल. दिवस शुभ.

कुंभ

कामाच्या ठिकाणी आज जास्तीचे काम, विशेष जबाबदारी पडेल. आर्थिक बाजू ठिक राहिल. भाग्य साथ देईल. प्रकृती ठिक राहिल. जोडीदार मदत करतील. दिवस अनुकूल.

मीन

राशीच्या अष्टम स्थानातील चंद्र भ्रमण आज आध्यात्मिक अनुभव देईल. तुमचा प्रभाव वाढेल. घरातील शांतता जपा. प्रकृती सांभाळा. काहींना प्रवास योग येतील. दिवस चांगला जाईल.

शुभम भवतु!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs