आज दिनांक 24 मे 2023. बुधवार. आज ज्येष्ठ शुक्ल पंचमी . चंद्र आज पुनर्वसु नक्षत्रात भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.
मेष
आज दिवस समाजा संबंधी भरीव कामगिरी करून घालवा . मानसिक स्वास्थ्य लाभेल. घरामध्ये सत्संग घडेल. जास्तीची जबाबदारी पार पाडाल. शारीरिक ताण कमी होईल. प्रवास. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या उत्तम दिवस.
वृषभ
प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. काहीसे नकारात्मक वातावरण राहिलं. काही आर्थिक लाभाचे प्रसंग येतील . कार्यालयीन कामा निमित्त प्रवास , नातेवाईक भेट संभवते. धनदायक चंद्र आहे .आनंदी रहा. दिवस शुभ.
मिथुन
चंद्र आज स्वस्थानात असून व्यावसायिक लाभ होतील. मंगळ कर्क राशी मध्ये आर्थिक व्यय करणार आहे . स्वभाव सौम्य होईल. कार्य सिद्धी होईल. कौटुंबिक दृष्ट्या बरा दिवस.
कर्क
चंद्र संतती बाबत काही संधी निर्माण करेल. कौटुंबिक जीवन मध्यम राहील. गुरूचे पाठबळ आहे . शनि नकारात्मक घडामोडी करेल . प्रकृती जपून काम करा. दिवस मध्यम.
सिंह
राशीच्या व्यय स्थानात चंद्र संतती बाबत चिंता, प्रवासात कष्ट दाखवीत आहे . राशीच्या समोर शनी जोडीदाराला त्रासदायक ठरेल. अष्टम स्थानातील ग्रहांचा प्रभाव मन :स्वास्थ्यावर होईल. आर्थिक दृष्ट्या मध्यम दिवस.
कन्या
समाज आणि शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. संतती सुख मिळेल . चंद्र जोडीदाराची भेट घडवून आणेल. तसेच आर्थिक लाभ होतील. . आरोग्याचे प्रश्न कमी होतील. दिवस उत्तम.
तूळ
शुक्र वैवाहिक जीवनात समेट घडवून आणेल. . गुरुचा प्रभाव जाणवेल. कार्य क्षेत्रात नवीन संधी मिळतील .जबाबदारी येईल. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस चांगला.
वृश्चिक
चंद्र भाग्य स्थानात आहे . त्यामुळे वृश्चिक व्यक्ती अनेक ठिकाणाहून फायदा प्राप्त करतील.. संततीसुख मिळेल.. वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. चंद्र प्रवास, व्यवसाय, बंधुभेट यासाठी उत्तम फळ देईल .
धनू
कुठल्याही संकटातून गुरू रक्षण करेल.. घर आणि वाहन सुख मिळेल. पंचम गुरू व्यवसाय व घरात जास्तीचे काम देईल .जवळपासचे प्रवास योग येतील. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रकृती ठीक राहील.. दिवस मध्यम.
मकर
सप्तम चंद्र आणि षष्ठ मंगळ यांच्या उपस्थिती मुळे परदेश प्रवास योग येतील.. रक्त विकार असतील तर काळजी घ्या. चंद्र भावंडं भेट घडवेल. प्रवास योग येतील . संतती आणि जोडीदारासोबत आनंदाने दिवस घालवाल.
कुंभ
शनी स्वामी असलेली कुंभ रास, आज चंद्र योगामुळे व्यावसायीक बाबीत विशिष्ट घडामोडी घडणार आहे .आर्थिक प्राप्ती वाढेल. प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल .यश मिळेल. लाभ होतील .व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.
मीन
राशी स्वामी गुरु बलवानआहे. शुक्राची चतुर्थ स्थानातील उपस्थिती मुळे आर्थिक लाभ, कला, सामाजिक जीवनात प्रसिद्धी असा हा काळ आहे. वैवाहीक जीवनात सुख मिळेल. गुरू आर्थिक बाबीत लाभ देईल. दिवस शुभ .
शुभ भवतू!!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Horoscope, Life18, Lifestyle, Rashibhavishya