जाहिरात
मराठी बातम्या / राशीभविष्य / Daily Horoscope : 'या' राशीने जपून राहा! भूतकाळातलं एखादं गुपित उघड होण्याची शक्यता

Daily Horoscope : 'या' राशीने जपून राहा! भूतकाळातलं एखादं गुपित उघड होण्याची शक्यता

राशिभविष्य (फोटो सौजन्य - Canva)

राशिभविष्य (फोटो सौजन्य - Canva)

18 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं सूर्यराशीनुसार भविष्य.

  • -MIN READ Trending Desk Delhi
  • Last Updated :

    सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 18 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) कॉन्शस लेव्हलला तुम्हाला एखाद्या गोष्टीत सुधारणा करावीशी वाटेल. फायनान्स हे तुमच्या काळजीचं कारण असेल, तर उत्पन्न मिळवण्याची एखादी नवी संधी येण्याची शक्यता आहे. छोट्या अंतरावरचा प्रवास होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A carved wood वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) आजचा दिवस संमिश्र भावनांचा आहे. सकाळी तुम्हाला थोडंसं त्रासल्यासारखं वाटेल; मात्र दुपारपर्यंत सारं काही सुरळीत होईल. अचानक ठरलेला आउटिंगचा प्लॅन तुम्हाला उत्साह देईल. दानधर्मासाठी आजचा दिवस चांगला आहे. LUCKY SIGN - A solar panel मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमची आर्थिक परिस्थिती पुन्हा रुळावर आल्यासारखी दिसत आहे; मात्र अशा अनेक संधी निर्माण करण्याची तुमची इच्छा धगधगती असू शकेल. तुमचा जोडीदार तुमच्याशी जुनं गुपित शेअर करण्याची शक्यता आहे. तातडीने कृती केल्यास तुमचा वेळ वाटेल. LUCKY SIGN - A red ribbon कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) प्रेमाची भावना उच्च पातळीवर आहे. तुम्हाला दुर्लक्ष केल्यासारखं वाटत असेल, तर त्या व्यक्तीकडे तुम्ही पोहोचलं पाहिजे. भविष्यातल्या मार्गाचं नियोजन सध्या करू नये. अचानक आलेला पैशांचा प्रवाह तुम्हाला आनंद देईल. LUCKY SIGN - A tumbler सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखाद्या नव्या बिझनेस प्लॅनची शक्यता आहे; मात्र तुमच्या आजूबाजूच्या कोणाशीही त्याबद्दल चर्चा करू नका. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबद्दलची टिप उपयुक्त ठरेल. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याकडे लवकरच लक्ष द्यावं लागण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A colored glass bottle कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) चांगली बातमी देणाऱ्या फोन-कॉलमुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. स्वतःला शिस्त लावण्याचं नियोजन करत असलात, तर सध्या त्यासाठी चांगला काळ आहे. कोर्टातल्या एखाद्या प्रकरणात किंवा प्रलंबित प्रकरणात पुढे काही तरी हालचाल दिसेल. LUCKY SIGN - A yellow sapphire तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) आजच्या दिवसावर संमिश्र भावनांचं राज्य असेल; मात्र तुम्ही त्यात फार गुंतून जाणार नाही याची काळजी घ्या. एखाद्या अर्थपूर्ण किंवा प्रॅक्टिकल बाबीकडे तुमचं लक्ष वळवण्यासाठी ते उपयुक्त ठरेल. लिहिणं हा तुमचा छंद असेल, तर तुम्ही आता तो जोपासू शकाल. LUCKY SIGN - Sandalwood powder वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या बदलांसाठी स्वतःला तयार करावं लागेल. ज्या व्यक्ती तुम्हाला मदत करत आहेत असं तुम्हाला वाटत आहे, त्या व्यक्ती वेगळं वागू शकतात. परदेशातून एखादी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A copper coin धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) खूप जुनी गुंतवणूक आता चांगले रिटर्न्स देण्याची शक्यता आहे. एखादा मोठा खर्च लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही तयार राहण्याची गरज आहे. एखादी वृद्ध महिला काही कामासाठी तुमच्याशी जोडलं जाऊ इच्छिते. LUCKY SIGN - A cola can मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमच्या भावंडांशी छोटासा वाद होण्याची शक्यता आहे; मात्र तो टाळता येण्यासारखा वाटत नाही. नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचा छंद हेच तुमचं मुख्य काम बनवणं शक्य असेल, तर ते उत्तम होईल. LUCKY SIGN - A silk scarf कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) सध्याच्या परिस्थितीत काही मित्र मदत करू शकतील. गरजेशिवाय कोणत्याही निष्कर्षांवर येऊ नका. सुपरव्हायझर तुमच्या कामावर संतुष्ट नसण्याची शक्यता आहे. भूतकाळातलं एखादं गुपित उघड होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A milestone मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) नियती तुमच्याकडे एखाद्या टाळता न येण्यासारख्या कर्तव्याची जबाबदारी देण्याची शक्यता असून, तुम्ही ती पूर्ण करण्याची गरज आहे. एखादा नातेवाईक तुम्हाला त्याची सातत्याने आठवण करून देत असण्याची शक्यता आहे. तुम्हाला जुन्या मित्राबद्दल तसंच वाटण्याची शक्यता नाही. एखादी शांत संध्याकाळ उपयुक्त ठरेल. LUCKY SIGN - A bunch of carnations

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात