सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 12 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दिवसाची सुरुवात कदाचित भावनिक ताणाने होऊ शकेल; मात्र नंतर लवकरच संतुलन साधलं जाईल. अलीकडेच मिळालेल्या नव्या असाइनमेंटसाठी तुमचे प्रयत्न कायम ठेवा. कामाला प्राधान्य दिलं जाईल. LUCKY SIGN – Golden mist वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) वचन दिलेलं एखादं काम स्वीकारून आणि ते पूर्ण करून तुम्ही स्वतःलाच सरप्राइज द्याल. इकडच्या-तिकडच्या काही आर्ग्युमेंट्समुळे तुमचं लक्ष काही काळ विचलित होईल. अर्थसाह्य किंवा कर्जासाठी अर्ज केला असेल, तर त्याला लवकरच मंजुरी मिळेल. LUCKY SIGN – A tapdole मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) वेळेचा माग ठेवणं उपयोगी ठरेल. बहुतांश कमिटमेंट्स तुम्ही डेडलाइनमध्ये अगदी आरामात पूर्ण करू शकाल. लवकरच नवी, आकर्षक संधी तुमच्या दिशेने चालून येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A fountain कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) काम प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी निकष ठरवणं गरजेचं आहे. काही महिला सहकारी तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडा अडथळा आणू शकतात. एखादी छोटी ट्रिप ठरवत असाल, तर ती आता पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – Floral design सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुमच्या आजच्या दिवसाची सुरुवात तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक ऊर्जावान असल्याच्या भावनेने होईल. तुमच्या प्लॅन्सचं सादरीकरण करण्यासाठी हा चांगला दिवस असू शकतो. प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची चर्चा करा. काहीही हातचं राखून किंवा सरप्राइज म्हणून ठेवून नका. LUCKY SIGN – A candle stand कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्या मनाचा आवाज ऐका. तो तुम्हाला पुढच्या पावलाबद्दल मार्गदर्शन करू शकेल. एखाद्या चर्चेत सदस्य म्हणून सहभागी झाला असाल, तर तुमच्या मताला किंमत असेल. क्लायंट तुमच्यावर अन्य कोणाहीपेक्षा जास्त विश्वास टाकायला सुरुवात करील. LUCKY SIGN – A pyrite crystal तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) काही गैरसमज आता दूर होतील. तुमचा दिवस बिझी आणि त्यात रूटीनच्या कामांनी भरलेला असेल. कामावरून काही बोलावणं आल्यामुळे तुमच्या सुट्टीच्या काळात अडथळा येईल. संसर्ग होण्याची शक्यता असल्याने स्वतःची काळजी घ्या. LUCKY SIGN – A swing वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) आजचा दिवस वरिष्ठांचा असेल. एखाद्या गोष्टीबद्दलचं तुमचं होमवर्क पुरेशा आधीच करणं तुम्ही शिकाल. गरज नसताना जोखीम पत्करू नका. वैद्यकीय मदतीची गरज भासेल; तथापि लवकर बरे व्हाल. LUCKY SIGN – A new billboard धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) नेहमीपेक्षा आजचा दिवस संथ असेल. रिअल इस्टेटच्या संदर्भात कोणी तरी तुमचं साह्य मागू शकेल. एखाद्या गोष्टीवर दीर्घ काळ काम करत असाल, तर तुम्हाला तुमचा दृष्टिकोन बदलावासा वाटेल. तुमच्या मनावरचं सावट दूर करण्यासाठी लाँग वॉक मदतीचा ठरेल. LUCKY SIGN – A green cover मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) दूर अंतरावर राहणाऱ्या तुमच्या मित्रांशी कनेक्टेड राहणं बिझनेससाठी उपयुक्त ठरेल. आजचा दिवस कामाचा आणि मजेचा असा संमिश्र असेल. तुमच्या सामानाची काळजी घ्या. अपचन किंवा अॅसिडिटीची समस्या उद्भवेल. LUCKY SIGN – A topaz कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला एखादी इम्प्रेसिव्ह आणि संशोधन करणं आवश्यक असलेली व्यक्ती भेटण्याची शक्यता आहे. घर आणि कामाचं ठिकाण या दोन्हीकडच्या गोष्टी सुरळीत राखण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. तुमच्या आईला चिंता सतावेल. तुम्हाला वैद्यकीय मदत किंवा थेरपीची गरज भासू शकेल. LUCKY SIGN – A crown मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखादं महत्त्वाचं काम आता कदाचित पूर्ण होऊ शकणार नाही असं वाटेल. तुमच्या आजूबाजूला गॉसिप होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करा. नेहमीप्रमाणेच कुटुंबीय तुम्हाला आधार देतील. व्यायाम करण्याची शिफारस करण्यात येत आहे. LUCKY SIGN – A painting
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.