सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 12 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
पूर्वी निराशाजनक वाटणाऱ्या एखाद्या गोष्टीत आता हालचाल दिसून येईल. समेट करणं हे दुर्बलतेचं लक्षण नाही. कोणी पुढाकार घेतला तर तुम्हीही पॅचअप करण्यासाठी सहकार्य करा. बाह्य परिस्थितीपेक्षा आंतरिक अनुभूतीला प्राधान्य देऊ शकता.
LUCKY SIGN – खडा (A pebble)
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
तुम्हाला कोणी तरी manipulate करत असल्यासारखं वाटेल; पण तसं दर वेळी असेलच असं नाही. तुमच्या आसपास काही व्यक्ती आहेत, ज्या खरं तर तुमचं भलं व्हावं अशी इच्छा करणारे असू शकतात. तुम्ही आधी ज्या गोष्टींचा पाठलाग करत होतात त्याबाबत आता पुनरावलोकन करण्याची गरज आहे.
LUCKY SIGN – निरभ्र आकाश (A clear sky)
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
तुमची व्यवस्थित तयारी झाली नसेल तर तुम्हाला तुमच्या क्षमतेबाहेर ताणल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे. आईवडील सपोर्टिव्ह आहेत आणि नातेवाईक तुम्हाला आश्चर्याचा धक्का देण्याचं नियोजन करू शकतात. तुम्हाला एखाद्या गोष्टीत रस नसल्यास तुम्ही नकार देऊ शकता.
LUCKY SIGN – a glass bowl
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
लवकरच किंवा नंतर तुम्हाला काय वाटतं हे इतरांना सांगावं लागू शकतं आणि तुम्ही राहण्यास खोटा मुखवटा परिधान करून राहण्यास नकार द्याल. कोणाच्याही पाठिंब्याची अपेक्षा ठेवू नका. कारण तुम्हाला तो मिळणारही नाही. भूतकाळात केलेली गुंतवणूक आता वरच्या दिशेने वाटचाल करताना दिसेल. आठवडाअखेर भरपूर आराम करा.
LUCKY SIGN – गुलाबी फूल (pink flower)
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
मौन हे चांगलं असतं आणि ते आज सिद्ध होईल. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या संभाषणात हस्तक्षेप करण्याची इच्छा होऊ शकते; पण ते प्रयत्नपूर्वक टाळा. भूतकाळातल्या तुमच्या कार्याबद्दल आता कौतुक होईल. एखाद्या गरजू व्यक्तीला नक्कीच आधार द्या.
LUCKY SIGN – रुबिक क्युब (Rubik’s cube)
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
आता तुम्हाला फिरण्याची प्रबळ इच्छा होत आहे. तुमचं नियोजन काही दिवसांतच आकार घेऊ शकतं. सध्याच्या व्यग्र शेड्युलमुळे तुम्हाला अजून काही कमिटमेंट करणं कठीण जाऊ शकतं. आर्थिक हालचाल होण्याची शक्यता आहे. नियमित व्यायामाची शिफारस केली आहे.
LUCKY SIGN – A wire mesh
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
सुबत्ता आणि विपुलता या गोष्टी हळूहळू तुमच्या जीवनाचा भाग होत आहेत. तुम्हाला तुमची कामं पूर्ण होताना दिसतील आणि ध्येयपूर्तीकडे वाटचाल करत असल्याचं निदर्शनास येऊ शकतं. एक भावनिक पोकळी निर्माण होण्याची शक्यता आहे; पण त्यावर काही दिवसांतच तुम्ही मात कराल. कृतज्ञ राहा.
LUCKY SIGN – निऑन साइनबोर्ड (neon sign board)
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
ग्राहकाकडून मिळालेली कौतुकाची पोचपावती तुमच्या मनोबलाला चालना देऊ शकते; पण तरीही आव्हानं कायमच राहतील. एक चांगलं धोरणात्मक संघकार्य तुमच्या वैयक्तिक क्षमता वाढववण्यास मदत करू शकतं. आता तुम्हाला तुमचं कौशल्य सुधारण्याची गरज भासू शकते.
LUCKY SIGN – लवंग (a clove)
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
आता तुम्हाला इतके दिवस दडपलेलं तुमचं पोटेन्शियल वापरायची इच्छा होऊ शकते. तुमच्या आईकडून तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी प्रेरणा मिळत असल्यास ती आता करा. आजचा दिवस हा काहीसा निवांत असेल. एखादा जुना मित्र महत्त्वाची माहिती आणू शकतो.
LUCKY SIGN – A soap dish
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
जर तुमच्या आयुष्यात कोणी हेतूपूर्वक द्वेष निर्माण केला असेल तर आत्ता जागे होऊन तो दूर करण्याची वेळ आहे. ज्या व्यक्तीने भूतकाळात तुम्हाला भावनिकरित्या इजा पोचवली असेल त्याला माफ करणं जड जाऊ शकतं. तुमच्या मनात दडपलेल्या भावनांना वाट करून दिल्यास बरं वाटू शकतं.
LUCKY SIGN – a sandstone
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
एखादी मोठी समस्या तूर्तास मागे ठेवता येईल, सध्या छोट्या समस्यांना आधी हाताळा. तुम्हाला उगाचच तणाव आल्यासारखं वाटू शकतं. आजचा दिवस वाद टाळलेलाच बरा. त्यामुळे स्वतःहून कोणत्याही वादात पडू नका. कामाच्या ठिकाणचं राजकारणही टाळा.
LUCKY SIGN – मिसळणाचा डबा (a box of spices)
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
दहापैकी दोनच प्लॅन्स आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुम्हाला थोडा चिडचिडेपणा आणि हरवल्याचं फीलिंग येऊ शकतं. तुमचा जोडीदार आज फार समजूतदारपणे वागू शकतो. संध्याकाळी घराबाहेर बाहेर पडलात तर तुम्हाला बरं वाटू शकतं. थोडाफार डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
LUCKY SIGN – पेस्टल पॅलेट (a pastel palette)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Cancer, Lifestyle, Rashibhavishya, Wellness, Zodiac signs