सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 11 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
तुमची एखादी जबाबदारी तुमच्याकडून प्रलंबित असल्यास ती तुम्ही पुढाकार घेऊन पूर्ण केली पाहिजे. काहीशा सस्पेन्समुळे गोंधळ होऊ शकतो. आजचा दिवस तसा आरामदायी असेल.
LUCKY SIGN from above – क्रिस्टलची फुलदाणी (A crystal vase)
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
मूळ योजनेपासून विचलीत झाल्यास ते पुन्हा करण्याची वेळ येऊ शकते. जर तुम्ही फिरायला जाण्याचं नियोजन करत असल्यास ते पक्कं करा, ज्यामुळे विलंब टाळता येईल. एखाद्या गोष्टीबद्दलची उत्सुकता तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही.
LUCKY SIGN – पिवळा क्रिस्टल (A yellow crystal)
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
एखादा आश्चर्याचा धक्का देणारी घटना घडू शकते. आजचा दिवस गंभीर घडामोडी आणि व्यग्र ठेवणारा असेल. कामावरची एखादी व्यक्ती तुमच्यावर बारकाईने लक्ष ठेवू शकते. एखादं महत्त्वाचं गुपित उघड होऊ शकतं.
LUCKY SIGN – ब्लू पॉटरी मग (a blue pottery mug)
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुम्हाला एखाद्या गोष्टीची राग आला असल्यास मन मोकळं करा. कारण मनात भावना रोखून धरल्यास त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी नव्या संधी येताना लक्षात येतील. तुमच्या भावंडाला एखाद्या वाटाघाटींसाठी तुमची मदत लागू शकते.
LUCKY SIGN – दोन पिसं (Two feathers)
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुमच्या मूळ विचारांना कोणताही पर्याय असू शकत नाही. एखादी नवीन गोष्ट स्वीकारण्याआधी मनाची तयारी करा. एखाद्या गोष्टीमुळे तुम्हाला नव्याने काहीतरी करण्याची प्रेरणाची मिळेल. आरोग्यासंबंधीच्या तक्रारी जाणवू शकतात.
LUCKY SIGN – पिरॅमिड (a pyramid)
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुम्ही एखाद्या बाबतीत वचन दिलं असल्यास त्यावर ठाम राहावं लागू शकतं. तुमच्या मनाजवळच्या एखाद्या प्रोजेक्टसाठी सूचना येऊ शकतात. तुमच्या संवाद कौशल्याचा जास्तीतजास्त वापर करा. विचारपूर्वक खा.
LUCKY SIGN – स्टीकर (A sticker)
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
तुमच्याशी कुणी स्पर्धा करत असेल तर तुमची डेडलाईन चुकण्याची शक्यता आहे. म्हणजे ती व्यक्ती पुढे निघून जाईल. जे काही झालं असेल त्याबाबत प्रामाणिक राहणं चांगल ठरेल. जे काम अपूर्ण राहिलं असेल ते पुन्हा सुरू करावं लागू शकतं. एखादा जुना मित्र पुन्हा संपर्क करू शकतो.
LUCKY SIGN – जुनी गाडी (old car)
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
अनौपचारिकरित्या केलेले प्रयत्न अपेक्षेप्रमाणे गंभीर परिणाम देऊ शकत नाहीत. तुम्ही बऱ्याच काळापासून एकाग्रतेच्या समस्येचा सामना करत असण्याची शक्यता आहे. तुमच्या भावंडाचा मित्र तुम्हाला प्रेरणा देऊ शकतो. बाजारपेठेच्या ठिकाणी घालवलेला दिवस फलदायी ठरू शकतो.
LUCKY SIGN – धूसर फोटो (a blur image)
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
तुम्ही फक्त गृहीत धरलेली एखादी गोष्ट खरी ठरण्याची शक्यता आहे. कौंटुबिक इतिहासातून काही नव्या गोष्टी समोर येऊ शकतात. कामापेक्षा आज कुटुंबाला प्राध्यान्य द्याल. एखादा गुंतागुंतीचा प्रश्न आज तुम्ही सोडवू शकाल.
LUCKY SIGN – सिरल बाऊल (A cereal bowl)
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
जे तुम्ही बदलू शकत नाही ते सोडून दिलेलंच बरं. आज निर्णय घेताना स्वतःच्या बाजूने किंवा विरूद्ध अशी अवघड परिस्थिती उद्भवू शकते. आजचा दिवस विवकाने वागा. एखादी छोटी सहल तुमच्यासाठी चांगला बदल ठरू शकते.
LUCKY SIGN – लाकडाची फ्रेम (a wooden frame)
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
जर तुम्हाला कोणतेही परिणाम मिळणार नसतील तर ती गोष्ट सोडून दिलेलीच बरी. कामाच्या ठिकाणी कोणीतरी तुमची माहिती वापरू शकतं. त्यामुळे सावधानता बाळगा. एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. उर्जेनुसार सकारात्मक बदल लवकरच दिसून येतील.
LUCKY SIGN – साखरेचं भाडं (a potful of sugar)
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुमच्या जवळच्या मित्रांकडून बऱ्याच दिवसानंतर संपर्क होऊ शकतो. मनापासून संवाद साधल्यास जुन्या समस्या सुटतील. जर तुम्ही धीर धरल्यास अजून काहीवेळ वाट पाहण्याचा संकेत आहे. कोणत्याही निर्णयांपर्यंत पोचण्याणाधी सर्व गोष्टींची नीट चाचपणी करून घ्या. ध्यानधारणा करा.
LUCKY SIGN – लवेंडर फूल (a lavender flower)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Cancer, Lifestyle, Rashibhavishya, Wellness, Zodiac signs