Home /News /astrology /

Daily Horoscope : मानसिक तयारी ठेवा! तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याचा होणार THE END

Daily Horoscope : मानसिक तयारी ठेवा! तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या टप्प्याचा होणार THE END

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

Daily horoscope 10 May 2022 : 10 मे 2022 या दिवसासाठीचं बारा राशींचं भविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 10 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) भूतकाळातली एखादी गोष्ट नव्या उत्साहामुळे पूर्ण होऊ शकेल. एखादा जुना सहकारी पुन्हा भेटू शकेल आणि तुमच्याशी पुन्हा जोडला जाऊ शकेल. जी प्रत्येक गोष्ट सांगितली जात असेल, ती अंमलात आणली जातच असेल असं नाही. LUCKY SIGN - A sandstone वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) पैसे मिळवण्यासाठीची एखादी चांगली संधी तुमच्या वाटेत येईल. एखाद्या संवादाचा प्रभाव तुमच्यावर पडू शकतो आणि तुम्ही त्यानुसार स्वतःमध्ये बदल कराल. एखाद्या नव्या मैत्रीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Constellation मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्यापैकी काही जण एखादी ट्रिप आयोजित करू शकतात; मात्र उशीर झाल्याचा अनुभव येऊ शकतो. विनाकारण त्रास होऊ शकतो. ही तात्पुरती स्थिती आहे. तुमची आतली ऊर्जा तुम्हाला दीर्घ काळपर्यंत कार्यरत ठेवील. LUCKY SIGN - A synchronized number plate कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादा भावनिक क्षण येईल किंवा तुम्ही तुमच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचा विचार करू शकाल. ज्यांना आत्मविश्वास कमी वाटतोय, त्यांनी बारकाईने लक्ष ठेवावं. दिवसाच्या उत्तरार्धात काहीसा दिलासा मिळेल. LUCKY SIGN - A red flag सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखाद्या इंटरेस्टिंग, मात्र Manipulative व्यक्तीशी तुमची भेट होऊ शकेल. तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या काही गोष्टींना उशीर होत आहे, त्यामागे काही कारणं आहेत. कामाच्या ठिकाणी एखादा ट्विस्ट अनुभवाला येईल. त्यामुळे तुम्ही मांडलेलं समीकरण योग्य ठरेल. LUCKY SIGN - Mud pot कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमच्यापैकी अनेक जणांना आळसावल्यासारखं वाटेल; मात्र सावध/जागृत राहिल्यास तुम्ही त्याला प्रतिबंध करू शकता. कामाचा चांगला प्रवाह अपेक्षित आहे आणि काम पूर्ण करण्यासाठी साध्या पद्धती प्रभावी ठरू शकतात. LUCKY SIGN - A neon signboard तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमचा वेग आत्तापुरता संथ असेल; मात्र त्याचा अर्थ असा नाही की त्या श्रमांना काही अर्थ नाही. विनाकारण तुम्हाला कोणी एखादी गोष्ट करण्यास भाग पाडत असेल, तर तुमचं मत व्यक्त करा. तुमचा आवाज ऐकून घेतला जाईल, अशा रीतीने ग्रहांची साथ आहे. LUCKY SIGN - An iron gate वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) पैशांचे मुद्दे अचानक उफाळून वर येतील. सध्या निगडित असलेल्या एखाद्या गोष्टीबद्दलचा दृष्टिकोन बदलल्याचा अनुभव येऊ शकेल. छोट्या गोष्टींबद्दलही वचन देणं कठीण वाटू शकेल. LUCKY SIGN - Chessboard धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) अडकून पडलेल्या कायदेविषयक प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही स्वतःसाठी शोधत असलेल्या एखाद्या गोष्टीवर बाहेरचा प्रभाव असू शकतो. भावनाचं थोडं नाट्यमय प्रदर्शन केल्यास तुम्हाला हवं ते मिळू शकतं. LUCKY SIGN - A basil plant मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) दुसरं कोणी तरी शिफारस करत असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला अनुकूल ठरेलच असं काही नाही. एखादी नवी गोष्ट मान्य करताना सर्व गोष्टी दोनदा तपासून घ्या. मृदू, नम्र संभाषण केल्यास तुम्हाला हवी ती गोष्ट साध्य होऊ शकेल. LUCKY SIGN - A kite कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुमच्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा, उत्तम टप्पा कदाचित कोणतीही पूर्वसंकेत न देता संपुष्टात येऊ शकेल. तुम्ही कोणत्याही गिल्टशिवाय त्याचं कौतुक करण्यास, ते स्वीकारण्यास शिकलं पाहिजे. तुम्ही स्वतःला जितकं त्यापासून दूर व्हाल, तितके वेगवेगळे अनुभव तुम्हाला येऊ शकतील. LUCKY SIGN - A clay statue मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) दिवस थोडासा भ्रमाचा असेल. ही तात्पुरती स्थिती असेल. एखादी वरिष्ठ किंवा वयाने ज्येष्ठ व्यक्ती तुम्हाला चुकीचं आणि बरोबर याविषयी मार्गदर्शन करील. दिवसाच्या उत्तरार्धात तुम्ही मनोरंजनासाठी घराच्या बाहेर पडाल. LUCKY SIGN - A wooden board
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या