सितारा- द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 10 फेब्रुवारी 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.
मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)
आज स्वतःला सक्षम करण्याचा आणि काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा दिवस आहे. अशा काही गोष्टीवर तुम्हाला त्वरित लक्ष केंद्रित करावं लागेल. आईच्या प्रकृतीकडं थोडं लक्ष द्यावं लागेल.
LUCKY SIGN - दिवा (Lamp)
वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)
आज कदाचित तुम्हाला भूतकाळातील काही क्षण पुन्हा जगण्याची संधी मिळू शकते. तुमच्या ऑफिसात तुम्हाला आणखी कामांची पूर्तता करण्याची गरज आहे. विवाहाचा निर्णय तुमच्या कुटुंबात आश्चर्य घेऊन येऊ शकतो.
LUCKY SIGN – पिसं (Feather)
मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)
एखादं काम पूर्ण व्हायला वेळ द्यावा लागू शकतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की ते पूर्ण होणारच नाही. तुम्ही प्रयत्न करा आणि धीर धरा. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर टीका होऊ शकते. प्रवासाचं नियोजन केल्यास विलंब होऊ शकतो.
LUCKY SIGN - हेलिकॉप्टर (Helicopter)
कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)
तुमच्या जबाबदाऱ्या तुम्हाला कठोर टाइमलाइनची आठवण करून देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाची गती वाढवावी लागेल. नवीन संधीमुळे काम करण्यास नवीन उत्साह निर्माण होऊ शकतो. विश्रांती महत्वाची आहे.
LUCKY SIGN - पांढरा गुलाब (White Rose)
सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)
तुम्ही ज्या गोष्टी धरून ठेवण्याचा प्रयत्न करत आहात त्या सोडून देण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही रागाला आवर घातला नाही तर तुमची मानसिक शांती नष्ट होऊ शकते. एखादा मैत्रीपूर्ण भाव तुम्हाला दिवस चांगला करण्यास मदत करू शकतो.
LUCKY SIGN - नोटपॅड (Notepad)
कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)
तुम्ही स्वत:साठी कमावलेल्या एखाद्या गोष्टीसाठी सेलिब्रेशन करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या योजना आता कार्यान्वित होत आहेत. तुम्ही घेतलेल्या निर्णयांवर विचार आणि चिंतन करण्यासाठी थोडा वेळ काढा.
LUCKY SIGN - होलोग्राम (Hologram)
तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)
जर एखादी गोष्ट तुमचं लक्ष विचलित करत असेल, तर याला तुम्हीच कारणीभूत आहात. तुमच्या जोडीदाराकडे उत्पन्नाचा नवीन स्रोत निर्माण करणारी कल्पना असू शकेल. जर तुम्ही सहलीची योजना आखत असाल तर ती काही काळासाठी रेंगाळू शकते.
LUCKY SIGN - सकाळचा सूर्यप्रकाश (Morning Sunshine)
वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)
आज तुम्ही स्वतःला नशिबवान समजू शकता. दिवसभरात तुम्ही ठरवलेली सर्व कामं पूर्ण होऊ शकतात. स्टॉक फायनान्समध्येदेखील तुमच्या बाजूने कल येऊ शकतात. तुम्हाला एखाद्या कठीण विषयावर चर्चा करावी लागू शकते.
LUCKY SIGN - मेणबत्ती स्टँड (Candle Stand)
धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)
जर तुम्ही एखाद्या विचारापासून दूर पळत असाल, तर तो तुमचा पिच्छा सोडणार नाही. एखादी अत्यंत महत्त्वाची गोष्ट करण्यासाठी तुम्हाला धैर्याची कमतरता जाणवू शकते. हा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल आणि तुम्ही कामं लवकर संपवू शकणार नाही.
LUCKY SIGN - मातीचं भांड (Clay Pot)
मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)
अचानक अनेक सरप्राईजेस मिळू शकतात. त्यापैकी काही तुम्हाला आवडणार नाहीत. तुमच्या वृत्तीमुळे एखादी व्यक्ती दुखावली जाऊ शकते म्हणून तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. किरकोळ चोरीच्या घटना घडू शकतात त्यामुळं काळजी घ्या.
LUCKY SIGN - काचेची बरणी (Glass Jar)
कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)
परीक्षेचा निकाल अपेक्षेप्रमाणं लागणार नाही. थोडंसे चातुर्य आणि मुत्सद्देगिरी तुम्हाला तुमचे काम पूर्ण करण्यास मदत करतील. हा एक थकवणारा दिवस असू शकतो, परंतु शेवट मात्र, चांगला होईल. रॅश ड्रायव्हिंग टाळा.
LUCKY SIGN - कँडीची बरणी (Candy Jar)
मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)
तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या व्यक्तीकडून प्रेरणा मिळाल्यासारखं वाटू शकतं. आज अंतर्मुख होणं उपयुक्त ठरणार नाही. कामावर कोणीतरी तुमच्यावर अनावधानानं आरोप करू शकतं. तुमचा दिवस थोडा खडतर असू शकतो.
LUCKY SIGN - निरभ्र आकाश (Clear Sky)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope, Cancer, Lifestyle, Rashibhavishya, Wellness, Zodiac signs