मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : छोट्या वादाचे होणार मोठे परिणाम; तुमचा दिवस कसा जाणार पाहा राशिभविष्य

Daily Horoscope : छोट्या वादाचे होणार मोठे परिणाम; तुमचा दिवस कसा जाणार पाहा राशिभविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

सूर्यराशीनुसार 08 डिसेंबर, 2022 रोजीचं राशिभविष्य.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 8 डिसेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे.

मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19)

गुंतवणुकीवरचा परतावा लवकरच मिळेल, मग ती भावनिक गुंतवणूक असो किंवा आर्थिक. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तींना योग्य वेळी नकार देण्याची कला तुम्हाला शिकून घेणं आवश्यक आहे. तुम्हाला कोणी कशासाठी तरी दोष देत असेल, तर तुम्ही ते फारसं गांभीर्याने घेऊ नये.

LUCKY SIGN - A clay pot

वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20)

तुम्ही बराच काळ स्वतःतच रममाण राहता. त्यामुळे तुम्हाला आजूबाजूच्या अनेक घटना-घडामोडींबद्दल कळत नाही. स्वीकारण्यासारखी एखादी ऑफर तुमच्यासमोर येऊ शकते. मुलं हे ताणाचं नवं कारण बनू शकतं; मात्र ते तात्पुरतं असेल.

LUCKY SIGN - A yellow crystal

मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून)

वाईटात वाईट काय घडेल, यासाठी तुम्ही स्वतःला तयार ठेवलं आहे; मात्र तेही काही वेळा आरामदायक ठरतं. आर्थिक क्षेत्रात काम करत असलेल्या व्यक्तींसाठी ताणाचा काळ पुढे येत आहे. अ‍ॅकेडमिक्स क्षेत्रात असलेल्यांसाठी बिझी राहण्याचा काळ येत आहे. मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांसाठी वृद्धीचा काळ आहे.

LUCKY SIGN - A rainbow crystal

कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै)

जुने पॅटर्न्स हळूहळू बदलत आहेत. उत्साहाची नवी लाट आल्याचं तुमच्या लक्षात येईल. सध्याचा काळ तुम्हाला तुमच्या तज्ज्ञतेच्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवून देईल. ताठर भूमिका घेतल्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवचिक राहण्याचा प्रयत्न करा.

LUCKY SIGN - A moonstone

सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट)

छोट्या वादाला वेगळं रूप मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाद लवकरात लवकर मिटवण्याचा प्रयत्न करा. कला क्षेत्रात असलेल्या व्यक्ती चांगले पैसे कमावू शकतील. रिटेल बिझनेसमध्ये असलेल्या व्यक्तींनाही नफा होत असल्याचं दिसेल.

LUCKY SIGN - A gooseberry

कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर)

जिथून अत्यंत कमी अपेक्षा ठेवली होती, तिथून बिझनेसची संधी येण्याची शक्यता आहे. घरी किंवा कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कोणी डॉमिनेट करत असल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही ते लवकरच बोलून दाखवायला हवं. एखादं छानसं गेट-टुगेदर होण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A cash box

तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर)

तुम्ही एव्हिएशन किंवा सरकारी नोकरी आदी क्षेत्रांत असलात, तर तुमच्यासाठी नव्या संधी खुल्या होण्याची शक्यता आहे. लोकप्रिय ठिकाणाहून तुम्हाला निमंत्रण मिळालं असेल, तर तुम्ही त्याचा विचार करायला हवा. ब्रेकअपचे संकेत आहेत. त्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या कणखर राहायला हवं.

LUCKY SIGN - A butterfly

वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर)

दोन मित्र बऱ्याच काळानंतर भेटतात, तेव्हा तो अनुभव जादुई असतो. तुम्ही तो अनुभव लवकरच घेणार आहात. भूतकाळात तुम्ही कशामुळे दुखावले गेला असाल, तर त्याबद्दल व्यक्त होण्याचा काळ आता आला आहे. तुम्हाला लवकरच चांगला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A large park

धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर)

आजं सारं काही सुरळीत असल्याचं दिसत आहे. प्रलंबित कामं, विसरून राहिलेली कामं आदींवर कृती करायला हवी. घरच्या जबाबदाऱ्यांना आज मुख्य प्राधान्यक्रम नसेल.

LUCKY SIGN - A marigold flower

मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी)

कामाच्या ठिकाणी एखाद्या ज्युनिअर व्यक्तीने एखादा काळजीचा मुद्दा तुमच्याकडे उपस्थित केला, तर त्या समस्या सोडवण्यासाठी वेळ काढा. स्टॉक मार्केटमध्ये सक्रिय असलात, तर तुम्हाला अचानक काही धनलाभ होण्याची शक्यता आहे.

LUCKY SIGN - A neon light

कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी)

लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये काही अडचण येऊ शकते; मात्र हा तात्पुरता टप्पा आहे. कामाच्या ठिकाणचा ताण नेहमीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. संगीत ही चांगली थेरपी ठरू शकते.

LUCKY SIGN - Retro music

मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च)

ग्रुप म्हणून तुम्ही कशाचं नियोजन करत असलात, तर त्याला आता आकार येण्याची शक्यता आहे. कारण ते आतापर्यंत बराच काळ पुढे ढकललं जात होतं. लवकरच तुमच्यासाठी थोडा फन टाइम येण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती वेगाने चांगली होत असेल.

LUCKY SIGN - A glass door

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya