सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studiowww.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 4 नोव्हेंबर 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) काम आणि वैयक्तिक आयुष्य यांमध्ये संतुलन साधण्याचा तुमचा दृष्टिकोन आज मोठ्या प्रयत्नांनी यशस्वी होऊ शकेल. तुमच्या टीममध्ये एखादी वरिष्ठ व्यक्ती सहभागी झाल्याने टीमसाठी गरजेची असलेली लीडरशिप प्राप्त होईल. जुन्या अनुभवांमुळे विश्वास हा महत्त्वाचा मुद्दा बनेल. LUCKY SIGN - Good Humor वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमची दैनंदिन कामं आज अगदी सुरळीतपणे होतील. एखाद्या अनपेक्षित बातमीमुळे तुम्ही आडाखे बांधायला सुरुवात कराल. एखादा नवा खेळ किंवा अॅक्टिव्हिटी तुम्हाला आवडू लागेल. LUCKY SIGN - A hoarding मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमच्या भावंडाशी तुमचा वाद झाला असेल, तर तुम्ही सध्या तरी काही काळापुरती तुमची त्याबद्दलची मतं फार व्यक्त करू नयेत. छोट्या-छोट्या गोष्टींतून तुम्हाला आनंद मिळेल. उदा. दीर्घ काळ प्रलंबित राहिल्यानंतर झालेला संवाद. मित्र निवडण्याच्या बाबतीत तुम्ही चोखंदळ असाल. LUCKY SIGN - A silicon mould कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादं ठरावीक काम करावं की करू नये, याबद्दलचा सस्पेन्स अखेर संपेल. विचारांच्या स्पष्टतेला प्राधान्य द्यायला हवं. समाजातलं स्थान महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्ही आता तुमची उपस्थिती दिसण्याच्या अनुषंगाने काम कराल. LUCKY SIGN - A blue ribbon सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्हाला एकदम एनर्जेटिक आणि उत्साहपूर्ण वाटेल. हा कदाचित तुम्हाला मिळणं अपेक्षित असलेल्या सकारात्मक बातमीचा परिणाम असावा. तुमच्या कामाच्या क्षेत्रात तुम्हाला स्पर्धेला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Favorite dessert कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्हाला फ्रस्ट्रेटेड वाटत असल्याने तुम्ही तुमची दैनंदिन कामं वेळेत पूर्ण करू शकत नाही आहात. त्यामुळे कामांची विभागणी केल्यास फायदेशीर ठरेल. कोणाची तरी मदत घेणं उपयुक्त ठरेल. तुम्हाला इतरांनी योग्य प्रकारे समजून घ्यावं, यासाठी योग्य प्रकारे संवाद करणं गरजेचं आहे. LUCKY SIGN - A souvenir तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुम्ही भूतकाळात स्वतःलाच दिलेलं एखादं प्रॉमिस पूर्ण करण्याची वेळ आज आली आहे. काही वेळासाठी जुनाच पॅटर्न पुन्हा अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. तुमची बहीण किंवा भाऊ काही घरगुती समस्यांमधून जात असण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A copper bottle वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) एखादी गोष्ट अचानक तुमचं स्वप्न ठरली असेल, तर त्याकरिता अर्ज करण्यासाठी आजचा दिवस लकी आहे. तुम्ही ते प्राप्त करू शकाल, अशी शक्यता आहे. आपल्याकडे असलेली माहिती खूप जणांशी शेअर करणं टाळा. कारण त्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. LUCKY SIGN - A terracotta bowl धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमच्या सभोवती असलेल्या काही व्यक्तींचा तुमच्यावर नकारात्मक प्रभाव पडेल. कदाचित तुम्हाला आत्ता त्यांची संगत सोडणं शक्य होणार नाही. लाँग वॉक घेणं आणि नवं धोरण ठरवणं या दोन गोष्टी तुम्हाला तुमचं डोकं शांत करायला उपयुक्त ठरतील. LUCKY SIGN - A glass top table मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुम्ही घाईघाईत तयारी केली असलीत, तर ती कदाचित पुरेशी ठरणार नाही. शेवटच्या क्षणी अचानक चिंतित होणं अडथळ्याचं ठरेल. एका वेळी एकच गोष्ट करावी, हे योग्य. ध्यानधारणा करणं उपयुक्त ठरू शकेल. LUCKY SIGN - A Rubik’s cube कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) एखादं जुनं स्वप्न तुम्हाला दिवसभर तुमची पाठ सोडणार नाही. नव्या दिशेने आत्ता केलेले काही नवे प्रयत्न फायद्याचे ठरतील. तुमचा मित्र कदाचित तुमचा उपहास करण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - Chocolates मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखाद्या गोष्टीवरचं संतुलन ढळत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतील. आजचा दिवस पावसाळी असेल. त्यामुळे त्या दृष्टीने तयारीत राहा. एखाद्या आगामी संवादाबद्दल नर्व्हस असलात, तर काळजी करू नका. तो अनुकूल ठरेल. LUCKY SIGN - A new vehicle
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.