Home /News /astrology /

राशीभविष्य: मेष, धनु, कुंभ राशीसाठी गुरुवार ठरणार शुभ, मिथुन राशीसाठी आहे सल्ला

राशीभविष्य: मेष, धनु, कुंभ राशीसाठी गुरुवार ठरणार शुभ, मिथुन राशीसाठी आहे सल्ला

या राशींच्या लोकांकडे असतो सगळ्यात जास्त पैसा

या राशींच्या लोकांकडे असतो सगळ्यात जास्त पैसा

दररोजच्या भविष्याबरोबर आपण राशीस्वभावांचीही माहिती घेत आहोत. आज जाणून घेऊ या मिथुन राशीबद्दल .

आज गुरुवार दिनांक 17 जून 2021.तिथी  ज्येष्ठ शुद्ध सप्तमी . आज चंद्र दिवसभर सिंह राशीतून भ्रमण करेल. दररोजच्या भविष्याबरोबर आपण राशीस्वभावांचीही माहिती घेत आहोत. आज जाणून घेऊ या मिथुन राशीबद्दल .
काल पुरुष  कुंडलीतील ही तिसरी वायू तत्त्वाची रास. द्विस्वभावी, जुळे  हे चिन्ह असलेली रास. राशी स्वामी बुध. मिथुन  राशीत बुध उच्चीचा होतो. अत्यंत हजरजबाबी, बोलक्या, मैत्री करण्यास  उत्तम अश्या व्यक्ती या राशीत असतात. निर्णय घेताना  द्विधा मनस्थिती, मध्यम बांधा, जलद चाल, पाणीदार डोळे. सुखी आणि शुभ रास. या राशीच्या व्यक्तींनी ओम बुं. बुधाय नम: हा जप  करावा.
आता आजचं बारा राशींचं भविष्य जाणून घेऊ .
 
मेष
आजही दिवस  चांगला असून  गृह, कुटुंब, संतती या बाबतीत  लक्ष घालण्याचा आहे. ज्येष्ठ व्यक्तीचे मन दुखावून चालणार  नाही. विद्यार्थ्यांना दिवस  अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या समाधानकारक.
 
वृषभ
राशिस्थानी असलेले राहु  व बुध  निर्णय  घेताना  थोडी द्विधा  मनस्थिती करतील. वैचारिक गोंधळ निर्माण होईल. भावंडाची काही तक्रार असेल तर  लवकर  लक्ष द्या. प्रकृती उत्तम राहील. घरकाम जास्त वेळ घेईल. दिवस  चांगला आहे.
 
मिथुन
आज  होणारे  प्रवास  फायदा करून देतील. गुरु  भाग्यस्थानात  शुभ  आहे अष्टमशनी  व धनस्थानातील मंगळ  आर्थिक व्यवहार सांभाळून करा हे सांगतात. प्रकृती जपा. राशिस्थानी  आलेला शुक्र नवीन कपडे, सौंदर्य प्रसाधन  खरेदी करायला लावेल. दिवस चांगला आहे.
 
कर्क 
आज राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण  शुभ संकेत  देत आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. अचानक धनलाभ संभवतो. व्ययस्थानातील सूर्य शुक्र अधिकारी  व्यक्तीशी  सांभाळून बोला. डोळ्याची काळजी घ्या.
दिवस अनुकूल आहे.
 
सिंह
राशीत असलेला चंद्र, लाभ  स्थानातील सूर्य शुक्र अनेक संधी निर्माण करतील. गुरु चंद्र दृष्टी योग शुभ आहे. व्ययात मंगळ नवीन खर्च उभे करायला तयार आहे. पण काळजी नको. गुरु उपासना  करावी.
 
कन्या
आज दिवस फारसा अनुकूल नाही. विचित्र अशी  हुरहूर  जाणवेल. मित्र  मैत्रिणीशी संपर्क होऊ शकतो. नवीन काम सुरू होईल. मुलांची  अवाजवी चिंता करू नका. गुरु जप करणे  योग्य ठरेल.
 
तुला
आज दिवस लाभदायक आहे. आवडत्या व्यक्तीला भेटावेसे वाटेल. केलेल्या कामाची प्रशंसा होईल. कार्यस्थळी  जास्त वेळ  जाईल. वडील व्यक्तींची काळजी  घ्या. त्यांना वेळ द्या. दिवस शुभ.
 
वृश्चिक
 आज ऑफिस मध्ये  तुमचा  मान वाढेल. तसेच काम ही वाढेल. जास्त ताण घेऊ नका. प्रकृतीच्या तक्रारी कडे दुर्लक्ष  करू नका. जोडीदाराला काही नवीन संधी प्राप्त होऊ शकतात. दिवस चांगला  आहे.
 
धनु
भाग्यशाली दिवस. ताण कमी  होईल. छोटे प्रवास, मौजमजेसाठी वेळ  जाईल. किंवा  त्यासंबंधी चर्चा होईल. तुमच्या बुद्धीचा उत्तम वापर करून  घ्या. भविष्याचे  आर्थिक नियोजन  करा.
 
मकर
मानसिक  ताणतणाव, आर्थिक नुकसान, संतती चिंता  असा हा दिवस आहे. पण  गुरु महाराज सगळ्यातून बाहेर  काढतील. विश्वास ठेवा. मधुमेही व्यक्तींनी जास्त काळजी घ्या. खाण्या पिण्याचे बंधन पाळा. दिवस  मध्यम .
 
कुंभ
दिवस आनंदी  आहे. मौजमजेसाठी वेळ काढा. फिरायला  जा. किंवा  घरात  काही विशेष  पुजा करा.शत्रू कडे  लक्ष असू द्या. साडेसाती  सुरू आहे.  शनी जप करा. दिवस  शुभ.
 
मीन
आज काही नवीन वास्तु संबंधी  विचार मनात येतील. किंवा  त्यासाठी खर्च करावा, कर्ज घ्यावे असे वाटेल. पण सावध.  कोणाला हेवा वाटेल
असे  सध्या काही करू नका. शांततेत आपले काम करत रहा  असे ग्रह सुचवतात. दिवस मध्यम ..
 शुभम भवतु!
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या