Home /News /astrology /

'या' राशीला अखेर लाइफ पार्टनर मिळणार; लग्न झालेल्यांनीही जरूर पाहावं आजचं राशिभविष्य

'या' राशीला अखेर लाइफ पार्टनर मिळणार; लग्न झालेल्यांनीही जरूर पाहावं आजचं राशिभविष्य

Daily Horoscope 26 June 2022 : आजचा दिवस सर्व राशींसाठी उत्तम आहे.

आज दिनांक 26 जून 2022. रविवार ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी. चंद्राचे भ्रमण वृषभ राशीतून होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य. मेष गुरू, चंद्र अध्यात्मिक उन्नती, शैक्षणिक लाभ दाखवत आहे. परदेशसंबंधी शुभ समाचार मिळतील. आर्थिक लाभ, प्रवास संभवतात. दिवस उत्तम. वृषभ लाभ स्थानात आलेला गुरू अतिशय शुभ असून संतती प्राप्तीसाठी अनुकूल फळ देईल. घरामध्ये शुभकार्य घडेल. मातृ पितृ सुख लाभेल. राशीतील चंद्र मानसिक समाधान देईल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ. मिथुन राशीच्या कर्म स्थानात येणारा गुरू घर आणि कार्यक्षेत्रात यश देईल. व्यय चंद्र खर्च वाढवेल. आईवडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. जोडीदाराला लाभ होण्याची शक्यता आहे. दिवस उत्तम. कर्क भाग्य स्थानातील गुरू अचानक सगळ्या क्षेत्रात यश, लाभ मिळवून देईल. अनेक दिवसापासून अडकलेली कामं मार्गी लागतील. आर्थिक हानी पासून जपावे. प्रकृतीत सुधार होईल. दिवस बरा. सिंह अष्टम गुरू प्रकृतीची चिंता निर्माण करेल. दशम स्थानातील चंद्र सामाजिक प्रतिष्ठा दाखवत आहे. संततीला वेळ द्या. दिवस शांतपणे व्यतीत करा. कन्या राशीच्या जातकांचे जोडीदारासोबत असलेले संबंध मधुर होतील. अविवाहित व्यक्तींना साथीदार मिळेल. नवीन पर्वाची सर्वात होईल. वृषभ चंद्र मन आनंदी ठेवेल. दिवस उत्तम आहे. तूळ अष्टम स्थानात आलेला चंद्र नोकरी, आर्थिक व्यवहार, कर्ज मुक्ती यासाठी शुभ असून मानसिक ताण कमी करणार आहे. प्रवास योग येतील. दिवस उत्तम. वृश्चिक संततीसाठी अतिशय शुभ फल देणारा गुरू उच्च शिक्षणात देखील मदत करेल. कार्यक्षेत्रात लाभ होतील. नवीन जबाबदारी येईल. सप्तम चंद्र जोडीदाराला आर्थिक लाभ होतील. दिवस उत्तम. धनु चतुर्थ स्थानात गुरू गृह सौख्य, नवीन वास्तू, वाहन मिळवून देईल. भाग्यकारक घटना घडतील. शुभ आणि अध्यात्मिक अनुभव येतील. दिवस शुभ. मकर देश विदेशचे प्रवास, भावंडांची भरभराट असा हा काळ आहे. वाणी तेजस्वी होईल. चंद्र भ्रमण संततीला जपून राहण्याचे संकेत देत आहे. कुंभ राशीच्या धनस्थानात येणारा गुरू कौटुंबिक, आर्थिक सुखात वाढ करेल. गृहसौख्य मिळेल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस उच्च प्रतीचे अनुभव देईल. मीन राशीमध्ये आलेला गुरू विचारी आणि स्थिर व्यक्तिमत्व देईल. विचार सुधारतील. तेजस्वी व्यक्तिमत्व होईल. चंद्र भ्रमण प्रवासात काळजी घ्या असं सुचवत आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या