पुणे, 23 जुलै: घरामध्ये झाडे लावल्याने वातावरण शुद्ध होते आणि मन प्रसन्न होते. आजकाल लोक घराच्या आतही झाडे लावू लागले आहेत. ज्यामुळे घराचे सौंदर्य तर वाढतेच पण वास्तुदोषही दूर होतात. घरातील सुख-समृद्धी ही झाडांशी जोडलेली असते, त्यामुळे घरात झाडे लावताना दिशेची विशेष काळजी घेतली पाहिजे. चुकीच्या दिशेला लावलेल्या झाडामुळे नकारात्मकता आणि घराच्या प्रगतीत अडथळे येतात. वास्तुशास्त्रानुसार कोणते झाडे घराच्या दक्षिण दिशेला लावू नयेत याबद्दल पुण्यातील ज्योतिषी राजेश जोशी यांनी माहिती दिली आहे. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये झाडे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. झाडे-रोपे योग्य दिशेने लावल्यास घरातील वास्तुदोष दूर होत असतात. तर चुकीच्या दिशेने लावलेली झाडे आणि रोपे नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. त्यामुळे दक्षिण दिशेला 5 झाडे लावली नाही पाहिजे, असं ज्योतिषी राजेश जोशी सांगतात.
कोणती झाडे? 1) शमीची वनस्पती वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोप दक्षिण दिशेला लावू नये. खर तर या दिशेला शमीचे रोप लावल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात. ही वनस्पती पूर्व किंवा ईशान्ये दिशेला लावावी. या दिशेला लावलेल्या शमीच्या रोपामुळे वास्तुदोष दूर होतात. 2) रोझमेरीची वनस्पती वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये रोझमेरीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. याशिवाय ही वनस्पती शारीरिक आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती दक्षिण दिशेला लावू नये.
घरात लावा पोपटाचा फोटो; होतील मोठे लाभ, विद्यार्थ्यांना मिळेल उत्तर
3) मनी प्लांट वास्तुशास्त्रानुसार घर आणि ऑफिसमध्ये मनी प्लांट लावणे शुभ असते. तसेच वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटचे रोप दक्षिण दिशेला लावू नये. आग्नेय कोनात म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला मनी प्लांटची लागवड करणे शुभ असते. 4) केळीचे झाड केळीचे झाड भगवान विष्णुला खूप प्रिय असते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला केळीचे रोप लावू नये. ते ईशान्ये दिशेला लावणे सर्वात योग्य आहे.
सावधान! शुक्र 43 दिवस उलट चालणार; ‘या’ राशीच्या व्यक्तींनी काळजी घ्या
5) तुळशीचे रोप तुळशी ही एक पवित्र आणि पूजनीय वनस्पती आहे. त्यामुळे लोक सहसा तुळशीचे रोप लावताना दिशेची विशेष काळजी घेतात. तुळशीचे रोप पूजनीय आणि पवित्र आहे, त्यामुळे दक्षिण दिशेला लावणे अशुभ आहे. ज्या घरात तुळशीचे रोप दक्षिण दिशेला लावले जाते त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही. वरील सांगितल्या प्रमाणे इतर चार झाडे देखील लावू नये. तुळशीचे रोप लावण्यासाठी पूर्व, उत्तर आणि पूर्व-उत्तर दिशा उत्तम मानली जाते, असं जोतिषी राजेश जोशी यांनी सांगितले. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)